Skip to main content

प्रकटन

मु॑बई डायरी (नोव्हेम्बर ०८)

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी शुक्रवार, 28/11/2008 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
मु॑बईवरच्या हल्ल्याच्या बातम्या तुम्हीही पाहील्या असणारच. सगळेच हादरले आहेत. पण व्यक्तिशः मला खूपच धक्का बसला आहे कारण काही दिवसा॑पूर्वीच एका परीषदेच्या निमित्ताने मी चार दिवस मु॑बईत वास्तव्याला होतो. (बुधवार ते रविवार). विचित्र योगायोग म्हणजे अतिरेक्या॑नी जिथे जिथे हैदोस घातला त्या सर्व ठिकाणी मी त्याचवेळी (रात्री दहाच्या पुढे) मनमुराद भटकत होतो. जिवाची अक्षरशः मु॑बई केली होती व ती सर्व वर्णन॑ पुण्यातल्या मित्रा॑ना मारे मिटक्या मारीत करून त्या॑ना जळवल॑ होत॑. आणि गुरूवारी सकाळी टिव्हीवर बातम्या पाहता॑ना डोळ्या॑वर विश्वास बसत नव्हता. आमची परिषद कफ-परेड येथील वर्ल्ड ट्रेड से॑टर इथे होती.

अप्रकाशित...

लेखक सरपंच यांनी गुरुवार, 27/11/2008 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, कायदे तज्ञांच्या सल्लामसलतीनुसार काही सुरक्षिततेच्या कारणांकरता सध्या सुरू असलेल्या मुंबईच्या हल्ल्याशी निगडीत सर्व धागे व प्रतिसाद अप्रकाशित करण्यात येत आहेत... आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी या चर्चेत गांभिर्याने भाग घेऊन आपापली मते मांडली त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार... कृपया सहकार्य करावे... तात्या.

पेन्सिल रेखाटन

लेखक वर्षा यांनी गुरुवार, 27/11/2008 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
RAFFINE 2B Graphite pencil, Kneaded eraser, regular eraser वापरुन केलेलं रेखाटन. हिमाचल प्रदेशमधल्या एका मुलीच्या फोटोवरुन केलंय ..मला त्या मुलीचे टपोरे डोळे फार आवडले होते...

फुलटू माज

लेखक टारझन यांनी गुरुवार, 27/11/2008 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
कोणतीही गोष्ट कधीही कशीही आठवू शकते. .. आम्ही किती माजुरडे होतो, याची आठवण झाली. असं म्हणतात, नुकत्याच तरूण वयात जर व्यायाम/कसरत केली की अंगात 'माज' येतो. हा 'माज' नकारात्मक दृष्टीने नव्हे, अंगात अशी एक प्रकारची रग शिरते की ती ताकद कुठे तरी कशी तरी दाखवलीच्च पाहिजे अशी माणसिकता होते. आणि मी अशा माणसिकतेतूनच गेलोय, थोडंस मोकळं करतोच ...यावरून फक्त मला 'जज' करू नका हीच विनंती. कारण काळा नुसार माणूस बदलतोच. परिपक्व होतो (अपवाद सोडता). असो, तर लहाणपणापासून तोंडात लै जोर होता.

मिपाचे वैभव..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 27/11/2008 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो.. नुकताच मिपाकर सुनील यांनी 'मिपाचे बंद पडणे..' अशी तक्रार केली होती. त्या तक्रारीस तिथे आम्ही उत्तर दिले आहेच परंतु आमच्या उत्तराला सपोर्टिंग म्हणून आम्ही खाली काही चित्रे प्रकाशित करत आहोत.. या वरून मिपाची वाढती लोकप्रियता सहज लक्षात यावी.. आणि म्हणूनच आजूबाजूच्या संकेतथळावरील काही मिपाद्वेष्टी मंडळी मिपाच्या सर्व्हरवर अतिरिक्त कृत्रीम ताण आणून मिपा वारंवार बंद पाडत आहेत हे उघड आहे... असो, या बाबतीत शक्य ते सर्व प्रयत्न सुरू आहेत.

जगायचे जगायचे !

लेखक पल्लवी यांनी बुधवार, 26/11/2008 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
वि.सु : ही कविता माझा मित्र राजदीप जोशी ह्याची असुन त्याच्या वतीने व पुर्वपरवानगीने इथे मी प्रसिद्ध करत आहे. असेच धडपडायचे..पुन्हा पुन्हा उठायचे, मधेच डगमगायचे.. तरी उभे रहायचे ! व्यथेत गलबलायचे..पडायचे..रडायचे, करुन अश्रु कोरडे, लढायचे लढायचे ! घाव घालता कुणी.. फुटायचे..तुटायचे, असेच मोड-मोडता, जडायचे घडायचे ! कल्पनेच्या अंगणी..निमग्न रिमझिमायचे, पहाट-पालवी सवे सजायचे.. फुलायचे ! ताम्र अग्रजेपरी..क्षितीज पेटवायचे, [पण] चंद्रभान ठेवुनी निमूट मावळायचे ! हवे तिथे असायचे,नको तिथे नसायचे, दुरांत रम्य जीवना, जगायचे जगायचे ! ~राजदीप जोशी~
Taxonomy upgrade extras

यज्ञकर्मी' तृप्त झालो

लेखक पुणेरी मिसळ्पाव यांनी बुधवार, 26/11/2008 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
पेठकरकाकांनी यज्ञकर्म नावाचे रेस्तरॉं सुरू केल्याचे मि.पा. वर वाचले आणि कधी एकदा इथे भेट देऊन येतो असे झाले. शेवटी काल, सोमवारी सायंकाळी एकदाचा योग आला. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सहकुटुंब "यज्ञकर्म' ला गेलो. प्रथमभेटीतच नजरेत भरावी अशी यज्ञकर्मची रचना आहे. छानसे टेबलक्‍लॉथ अंथरलेली टेबलं, त्याला जुळणारी रंगसंगती असलेल्या खुर्च्या. टेबलवर काचेचे ग्लास, उंची क्रॉकरीच्या डिशेश, हातरुमाल व्यवस्थित मांडून ठेवलेले होते. बाजूला सुरेख मंद दिवे तेवत होते. विशेष म्हणजे नजरेत भरण्याजोगी अशी इथली स्वच्छता आहे. टेबलवर बसल्याबसल्या वेटरने सुबक मेन्यू कार्ड आणून दिले.

निरभ्र

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 25/11/2008 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
झाकोळल्या सावल्यांनी हुंकार असा का द्यावा डोळ्यांतला तुझा तो मज मारवा स्मरावा
कागदावर झरझर अक्षरं उमटत जातात... दिवसही एखादा असा येतो की आठवणी दाटून येतातच. सकाळच्या वेळी तर हमखास. दाटून येतात त्याही संध्याकाळच्याच आठवणी... 'काय करते आहेस?' आधी 'तू नभातले तारे...'ची गुंजारव. त्याच्या कॉलसाठी आपण लावून ठेवलेली. आणि त्यापाठोपाठ त्याचा प्रश्न. नेहमीचाच. वेळही नेहमीचीच. पश्चिमेला गुलाबी छटा येतात तीच. एक छोटासा संवाद आणि नदीकाठी पुलावरची भेट. नदीही साथ देणारीच. पूर्व-पश्चिम. त्यामुळे पुलाचे दोन्ही कठडे त्या दिशांना. आपण बसायचो तो पश्चिमेचाच.

हे नाक तुंबलेले (विडंबन)

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 25/11/2008 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न आहे. आभाळ थांबलेले..... कवि : चारुदत्त दिवाण प्रतिभा आभाळ थांबलेले, मातीही थांबलेली; तेजाचे गर्भ सभोती तेजात ओढलेले. . ध्रु. येते अशी घडी की ध्यानात रानवारा; तू भरिशी चित्र असे की तेजाचे किरण नहाले. . १. जाऊ नकोस आता, सोडू नकोस हाता; नुकतेच साधनेचे ते दीप चेतलेले. . २. तू असता असा सभोती.. मातीची तुटती नाती; श्वासांचे बंध गळोनी प्राणांचे प्राण मिळाले. . ३.
Taxonomy upgrade extras

पदर

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 23/11/2008 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे दोन महिन्यापुर्वीची घटना. संध्याकाळी ७ वाजता मोबाईल वाजला. दुस-या टोकाला एक मुलगी. आवाजावरुन काहीतरी किचकट प्रकरण आहे हे लक्षात आले. त्यांना लगेच भेटायला बोलवले. अर्ध्या तासात दरवाजावर आई आणि मुलगी हजर. आईचे डोळे तांबारलेले. बायकोने पाणी देउन भाजीच्या निमित्ताने पळ काढला. सर्व संभाषणात आई गप्प होती. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या त्या मुलीने सर्व कर्मकहाणी सांगितली. हे प्रसिद्ध घराणे. वाडा जाउन मोठी बिल्डींग बांधलेली. शेवट्च्या मजल्यावर १५०० फुटाचा ब्लॉक. घरात आजी आणि आजोबा. आजोबा दशग्रंथी ब्राम्हण. थोडक्यात सांगायचे म्हटले तर शुभं करोती संस्काराचे घर.