मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अशक्य केवळ

जयवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुझाच वावर मनात केवळ निभाव आता अशक्य केवळ नको अता ही उगाच जवळिक पुन्हा मनाचे दुभंग केवळ तुझ्यामुळे ही फितूर गात्रे अता गुलामी तुझीच केवळ तुझी जराशी झुळूक यावी कसे जगावे उन्हात केवळ नको नव्याने तुझी उधारी हिशेब नव्हते हिशेब केवळ जयश्री अंबासकर

वाचने 3778 वाचनखूण प्रतिक्रिया 19

क्रान्ति Wed, 03/25/2009 - 17:52
अप्रतिम गझल! सगळे शेर अगदी काबिल्-ए-तारीफ! खासच! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

In reply to by क्रान्ति

अनिल हटेला गुरुवार, 03/26/2009 - 12:12
सुंदर गझल !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

तिमा Wed, 03/25/2009 - 19:45
गझल का कविता आपल्याला काय कलत नाय, पन जे काई आलंय त्ये अगदी आतून आल्यासारखं वाटताय!

संदीप चित्रे Wed, 03/25/2009 - 19:50
>> नको अता ही उगाच जवळिक >> पुन्हा मनाचे दुभंग केवळ हे तर खूपच आवडलं जयश्री --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

प्राजु Wed, 03/25/2009 - 19:50
खत्तरनाक !! काय जबरदस्त लिहिलं आहेस जयूताई!!! एकदम फन्डू!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण Wed, 03/25/2009 - 20:34
व्वा...अप्रतिम !!! :) तुझी जराशी झुळूक यावी कसे जगावे उन्हात केवळ नको नव्याने तुझी उधारी हिशेब नव्हते हिशेब केवळ सॉलिल्ल्ल्ल्ल्ड... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

हेरंब गुरुवार, 03/26/2009 - 11:59
कविता लाखांत एक आहे. कवितेवरुन 'त्याचे' व्यक्तिचित्र असे वाटते, अशी कशी तू भोळीबावळ स्वार्थच होता हेतू केवळ भ्रमरवृत्ती मी चंचल केवळ ऊरात नसता नाटक केवळ किती मोजु मी संख्या केवळ हिशोब कसले निरोप केवळ!

जयवी गुरुवार, 03/26/2009 - 14:04
खुश कर दिया यारो.......!! तहे दिल से शुक्रिया :)

विसोबा खेचर गुरुवार, 03/26/2009 - 17:15
जयू, नेहमीप्रमाणेच सुरेख गझल.. तुझाच वावर मनात केवळ निभाव आता अशक्य केवळ या पहिल्याच ओळी अप्रतीम! जियो... आपला, (जयूचा फ्यॅन) तात्या.