तर्कशास्त्र
सुधारणा १: धनंजयने दिलेल्या प्रतिसादानंतर लेख विस्तारीत केला आहे. धनंजयच्या प्रतिसादाने खूप विचार करायला भाग पाडले.
त्यामुळे वाचकांनी धनंजयचा पहिला प्रतिसाद जो "एक चांगला विषय पण लेख नीट समजला नाही. येथे वाद म्हणजे "आर्ग्युमेंट" म्हणायचे आहे की "लॉजिक" म्हणायचे आहे? (म्हणजे हा मॅनेजमेंटशास्त्रातला लेख आहे की सत्यशोधनातला?)" ने सुरु होतो तो एक ह्या चर्चेचा एक आधीचा भाग ह्या संदर्भात पहावा.
सुधारणा २: कर्क आणि धनंजय ह्यांनी सुचविलेल्या बदलानंतर "पहिली शक्यता अशी असु शकते- वादाचा मुद्दा हा मुळातच एखाद्या अपुर्ण सत्यावर बेतलेला असेल" हे वाक्य "पहिली शक्यता अशी असु शकते- वादाचा मुद्दा हा मुळातच एखाद्या तथ्यांशावर बेतलेला असेल (उदा. एखाद्या घटनेच्या पुर्णज्ञानाअभावी). असे केले आहे.
संदर्भः धनंजयची प्रतिक्रिया- ""लेखक येथे ढोबळ अर्थाने शब्द वापरत आहे. त्यामुळे उदाहरणावरून आपण बोध करून घेऊया." व कर्क ह्यांच्या प्रतिसादाचे धागे हे ह्या चर्चेचा एक आधीचा भाग ह्या संदर्भात पहावा.
कर्क आणि धनंजय ह्यांना मनापासुन धन्यवाद. "लर्निंग कम्युनिटीचा" हा फायदा.
***************
तर्कशक्ती
एखादा मेकॅनिक इंजिन का सुरु होत नाही हे विचार करतो, एखादे कुटूंब सुटीत कुठे सहलीला जायचे ह्याचा वाद घालते, एखादी संशोधक चाचण्यांनंतर दिसणाऱ्या परिणामातून अन्वयार्थ काय काढता येईल हा विचार करते, विद्यार्थी परिक्षेतील प्रश्नाचे उत्तर काय असावे ह्याचा विचार करते, ह्या सगळयांच्या विचारप्रक्रिया त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कार्यकारणभावाचा (दुसरा मराठी शब्द- रिझनींग) व तर्कशक्तीचा (दुसरा मराठी शब्द- लॉजिक) वापर करुन काढताना दिसतात.
लेखातील संज्ञांचा अपेक्षित अर्थ
रिझन हा शब्द रेशो ह्या शब्दापासुन तयार झाला आहे [Origin: 1175–1225; ME resoun, reisun (n.) OF reisun, reson L ratiōn- (s. of ratiō) ratio- संदर्भ- http://dictionary.reference.com]. रेशो म्हणजेच समतोल (बॅलन्स, proportional relation). [ratiō- Origin: 1630–40; L ratiō a reckoning, account, calculation, deriv. (see -tion ) of the base of rērī to judge, think]
पुढील लेखात मी वाद [argument] हा शब्द अशा अर्थासाठी वापरला आहे-
argument:
- a discussion involving differing points of view; debate
- a process of reasoning; series of reasons
- A discussion in which disagreement is expressed; a debate.
- A course of reasoning aimed at demonstrating truth or falsehood
- the process of forming conclusions, judgments, or inferences from facts or premises.
- a basis or cause, as for some belief, action, fact, event, etc
- the mental powers concerned with forming conclusions, judgments, or inferences.
- to think or argue in a logical manner.
- पहिली शक्यता अशी असु शकते- वादाचा मुद्दा हा मुळातच एखाद्या तथ्यांशावर बेतलेला असेल (उदा. एखाद्या घटनेच्या पुर्णज्ञानाअभावी). (उदा. हिमकडा कोसळून आख्खी तुकडी गारद झाली हे सत्य पण ते नैसर्गिक आपत्तीमुळे झाले की, तुकडीच्याच एका फितूर सदस्याचा प्रताप होता की, शत्रूने केलेली चाल होती हे समजण्याचा काहीच मार्ग नसेल कारण जे काही झाले ते सांगणारा एकही जण जिवंत नाही. मग असे प्रकार पुन्हा घडू नयेत अशा चर्चेतून योग्य निष्कर्ष कसा काढायचा?)
- वादाचा मुद्दा अस्पष्टपणे व विस्कळीतपणे मांडला जात असेल ज्यामुळे चर्चेअंती त्यातून निघालेले निष्कर्ष खऱ्या मुद्द्यापासुन भरकटलेले असतील. (उदा. भारतातील लोकसंख्या वाढीची कारणे व त्यावर उपाययोजना असा एक वाद डोळ्यासमोर आणून पहा. अशा चर्चांसाठी प्रचंड माहिती हवी, ती योग्य स्रोतांपासून मिळवलेली हवी, मोठ्या कालावधीची असावी. पण तसे नसल्यास आहे त्या माहितीच्या आधारे वाद पुढे रेटला गोंधळ वाढायचीच शक्यता जास्त. तर मिळणारे निष्कर्ष योग्य असतील का?)
- तिसरी शक्यता अशी असु शकेल- वादाचा मुद्दा ज्या समजावर बेतलेला असेल तो समजाबद्दलच मुळात प्रश्नचिन्हे असतील. (उदा. वरील हिमकडा व तुकडी ह्या उदाहरणात, एका माहितीच्या आधारे असे दिसुन आले की, ती तुकडी त्या जागेवर त्यादिवशी पोहोचणे अशक्य होते. मग त्यांच्याशी संपर्क होत नाही हे कारण ती तुकडी त्याखाली गाडली गेली असे म्हणायला पुरेसे ठरत नाही).
वर्गीकरण
चांगला विषय
(म्हणजे हा
In reply to (म्हणजे हा by अजय भागवत
अच्छा - मग ठीक आहे
मुळ लेख
लेख चांगला
In reply to लेख चांगला by लिखाळ
लेखात
In reply to लेख चांगला by लिखाळ
इंटरप्रिटेशन
In reply to लेख चांगला by लिखाळ
पण माझ्या
चांगला विषय आहे.
In reply to चांगला विषय आहे. by चतुरंग
भावना आणि
In reply to भावना आणि by अजय भागवत
थोडाफार असहमत
In reply to थोडाफार असहमत by धनंजय
कित्येक
- शेजार्याने होंडा सिव्हीक घेतली, मी पण घेतलीच पाहिजे नाहीतर सोसायटीतील माझे वजन कमी होईल
- तिने गळाभर दागिने केलेत नव्या पद्ध्तीचे आता मी पण सगळे जुने ते नवे करुन घेते
हे वरील निर्णय "भावनेच्या" आधारे घेतलेले असतात. वस्तुस्थिती अशी असु शकते की, घरात म्हातार्या आई-बापाला, एखाद्या भावंडला जास्त पैशाची गरज असु शकते पण जास्तीचा पैसा, किंवा ऋण काढून अशा प्रकारचे सण साजरा करायला लोकांना योग्य वाटू शकते.In reply to थोडाफार असहमत by धनंजय
अंशतः असहमत
In reply to अंशतः असहमत by नितिन थत्ते
भावना हे
In reply to अंशतः असहमत by नितिन थत्ते
दोन वेगवेगळ्या लोकांच्या विचारातील संकल्पना!
वेगळ्या विषयावर विचार
In reply to वेगळ्या विषयावर विचार by विसुनाना
चर्चा आणि
चांगला लेख