Skip to main content

प्रकटन

“शूप”, “शूप”, “शूप” ....

लेखक निखिलचं शाईपेन यांनी बुधवार, 10/06/2009 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
“और क्या ?” “आरे आणि ठिक, सॉफ्टवेअर जीव मी लेका, एक विकऎन्ड ते नेक्स्ट” “नाही रे तरीपण? वाचतोयस का काही?” “पेपर, ब्लॉग्स, बाकी विशेष नाही.” “फॉऊंटन हेड वाच खरं तर आतापर्यंत दहादा वाचलयं मी” “हम्म्म्म्म, बघतो शनिवारी आणतो, क्रॉसवर्ड मधून” “हो फॉऊंटन हेड, बाय आयन रॅंड, चल रे ठेवतो,स्क्रीन सेव्हर आला असेल एव्हाना, बॉस घिरट्या घालतोय आज” “अछा, चल, बाय” “हो, वाच पण” “नक्की” आयचा घो, ह्या आयन रॅंड च्या. पुस्तक आहे का डिक्शनरी ची जाहिरात? निरक्षर आहे कि काय मी अस्सं दिवसभरात पाच एक वेळा वाटून गेलं. डोकं फुटायच्या आत पुस्तक गादिखाली घुसवून मी पळायला निघालो...

आय विश

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 09/06/2009 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
तीनचाकीवर तीन वर्षाचा मुलगा मागे मी चालत चालत. रस्त्यावर दिसणारी गांडुळे पाहून 'वर्म, वर्म' मोजत होता तो. गांडूळांना वाचवण्याकरता दिली दिशा मी त्याच्या सायकलीला ..एक दोनदा त्याने कडेला दिसणारी रानटी फुले बघितली..उतरला खाली एक फूल घेऊन म्हणाला, "आय विश, आय विश माय मॉम , डॅड, ताई, आज्जी' हातात आणखी एक फूल घेऊन उतारावर सुसाट पुढे निघून गेला.. मी जाईस्तोवर एका गांडुळावर बूट ठेवून ..गेला पुढे . मी रागावले.. बोलले त्याला.. तो मागे फिरला, वाटेत अनेक मेलेली गांडुळे होती..
Taxonomy upgrade extras

दलाल

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 09/06/2009 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
"काय मास्तर काय चाललय"? सकाळीच रामदासांचा फोन आला. "का, बाबा आम्हा गरीबांची आठवण काढली" मी "पैसे कमवायची असलेली अक्कल न वापरता गरीब राहायची हौस असलेल्यांना काय करायचे" रामदास " काय कळले नाय बॉ" मी त्याना काल एक कुठल्याशा शिक्षण संस्थेचे एक पत्र आले होते. १२ वी नंतर मेडिकल, इंजीनयरींग, फार्मसी मधे अ‍ॅडमिशन मिळवुन देण्यात मदत करतो अशा संदर्भाचे. तसेच त्यानी एक डॉक्टर युगुल मेडीकल अ‍ॅडमिशन बद्दल मार्गदर्शन करते ह्या बाबत एका वर्तमान पत्रात लेख वाचला होता.

अंतराळ

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 09/06/2009 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
अंतराळ हा तुझाच, पंख तुला स्वप्नांचे चंद्रबिंब प्रतिभेचे, तारांगण शब्दांचे या विशाल अंबरात उंच उंच विहरत जा साद देतसे दुरून आमंत्रण पक्ष्यांचे वाजते दिशांमधून मंद धून वा-याची, इंद्रधनू गुणगुणते भावगीत रंगांचे शांत या जलाशयात नाव बुडे किरणांची, भांडारच जणु लुटले कुणि सुंदर रत्नांचे पंखांवर नभ तोलुन मानस वाचत फिरते, बंधमुक्त पाखरू तुझ्या ऋणानुबंधांचे मनकवड्या पाखरास गुपित मुळी सांगु नको, अवघ्या काही क्षणांत होईल ते विश्वाचे!
Taxonomy upgrade extras

आंतरराष्ट्रीय सौजन्य!!!

लेखक प्राजु यांनी सोमवार, 08/06/2009 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी चालवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. अमेरिकेत आल्यावर गाडीशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच मी परवाना मिळवला आणि गाडी चालवायला लागले. गेलं दिड वर्ष मी कुठेही न धडपडता लोकांना सुखाने गाडी चालवू देते आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या तुळतुळीत रस्त्यांवरून. सांगायचा मुद्दा असा की इतके दिवस माझ्या गाडी चालवण्याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही.. मात्र चालवून झाल्यानंतर गाडी लॉक करण्याबद्दल मात्र एका चायनीज माणसाने सॉल्लीड आक्षेप घेतला (त्याला आपण 'ली' म्हणू). सांगते ... त्याने माझ्या कार लॉक करण्यावर आक्षेप घेतला कारण सेकंदाचा १० वा भाग इतका वेळ वाजणार माझ्या गाडीचा लॉक होतानाच हॉर्न.

बाप

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 08/06/2009 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
"सर, तुमचे आय्.टी बद्दल काय मत आहे?" मला एक पालकांनी विचारले. ह्यांच्या चिरंजिवाना १० वी त माझी मदत झाल्याने ९०% मार्क मिळतील अशी खात्री होती. " अहो, रिझल्ट लागु दे मग बघु." मी "मी त्याला आय्.टी डीप्लोमा ला वी.जे.टी.आय ला घालायचे ठरवले आहे. डीप्लोमा करेल आणि मग डीग्री ला जाईल. मग ददात नाही." पालक " हा निर्णय घेताना तुम्ही मुलाला विचारलय का"? मी "त्यात काय विचारायचे, बाप म्हणुन हा निर्णय मी घेतला आहे. आज जरा मंदी आहे म्हणुन आय्.टी डाउन आहे. पण येत्या सहा वर्षात परत वर येईल ह्याची खात्री आहे मला. तुम्हाला काय वाटते? " मी नॉस्ट्रॅडेमस नाही हो.

एजीओजी - मराठीत चॅटींगची सोय

लेखक ॐकार यांनी रविवार, 07/06/2009 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे. ह्याबद्दल अधिक माहिती - http://www.ejioji.com/about/ सदस्यत्व घेण्याकरता - http://www.ejioji.com/register.php प्रवेश - http://www.ejioji.com/ नविन पासवर्ड अथवा पासवर्ड बदलण्याकरता - http://www.ejioji.com/regpass.php संकेतस्थळ नुकतेच सुरू होत आहे.

राधिका

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 07/06/2009 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णसख्याची प्रीत राधिका सूर कन्हैया, गीत राधिका श्यामल करि अलगूज होउनी स्वरपुष्पे उधळीत राधिका नंदनंदनासंगतीत जणु रासरंगसंगीत राधिका श्रावणघन घननीळ बरसतो कदंबतळि झेलीत राधिका चंद्रसजण मुरलीधर गगनी, चांदणकण वेचीत राधिका मुकुंदकंठी वैजयंति, शिरी मोरमुकुट निरखीत राधिका देवकिनंदन झुलवित झूला, रोमांचित, पुलकीत राधिका देह श्याम अन् प्राणहि श्यामच, जणु अद्वैत, पुनीत राधिका जन्मजन्मिची सखी, हरीचे पूर्वजन्मसंचीत राधिका
Taxonomy upgrade extras

नारायणगावचा थरार!!! अन्तिम भाग

लेखक मस्त कलंदर यांनी शनिवार, 06/06/2009 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: हे जनातलं मनातलं आहे.. काथ्याकूट नाही.. मी अंधश्रध्द नाही तशीच अश्रद्ध ही नाही..त्यामुळे या अनुभवावरून मी व्यक्तिशः कोणतेही निष्कर्ष काढलेले नाहीत..पण एक अविस्मरणीय प्रसंग म्हणून तो आजवर बर्‍याचजणांना सांगून झालाय.. आज इथे त्याचं आणखी एक पारायण!! बाकी नारायणगांव, जुन्नर, खोडद..ला मी एकदाच गेले, तिथे आमची अशी वाट लागली.. की पुन्हा म्हणून त्यांच्या वाटेला गेले नाहीये..त्यामुळे तिथला भौगौलिक परिसर.. मार्ग, अंतरं, ती कापायला लागणारा वेळ याबद्दलचे तपशील चुकीचे असू शकतील. कारण हे ही असेल की काही माहिती ऐकीव होती अन काही गोष्टी तितक्या अचूकपणे लक्षात नाहीत... नि .. तेव्हा चू.भू. दे.