Skip to main content

प्रकटन

नारायणगावचा थरार!!!

लेखक मस्त कलंदर यांनी मंगळवार, 02/06/2009 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: हे जनातलं मनातलं आहे.. काथ्याकूट नाही.. मी अंधश्रध्द नाही तशीच अश्रद्ध ही नाही..त्यामुळे या अनुभवावरून मी व्यक्तिशः कोणतेही निष्कर्ष काढलेले नाहीत..पण एक अविस्मरणीय प्रसंग म्हणून तो आजवर बर्‍याचजणांना सांगून झालाय.. आज इथे त्याचं आणखी एक पारायण!! बाकी नारायणगांव, जुन्नर, खोडद..ला मी एकदाच गेले, तिथे आमची अशी वाट लागली.. की पुन्हा म्हणून त्यांच्या वाटेला गेले नाहीये..त्यामुळे तिथला भौगौलिक परिसर.. मार्ग, अंतरं, ती कापायला लागणारा वेळ याबद्दलचे तपशील चुकीचे असू शकतील. कारण हे ही असेल की काही माहिती ऐकीव होती अन काही गोष्टी तितक्या अचूकपणे लक्षात नाहीत... नि .. तेव्हा चू.भू. दे.

परब्रह्म

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 02/06/2009 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
परब्रह्म विटेवरी | दोन्ही कर कटेवरी वाट भक्ताची पाहतो | देव पुंडलिकादारी संत जनाईच्या घरी | दळण कांडण करी ओव्या गातो भक्तासंगे | भावाचा भुकेला हरी देव एकनाथाघरी | कावडीने पाणी भरी सांभाळितो चोखोबाची | गुरे सावळा मुरारी तुक्याचे अभंग तारी | कान्होपात्रेला उद्धारी निवृत्ति, सोपान, मुक्ता| ज्ञानियाचा हात धरी दुमदुमली पंढरी | रिंगणात वारकरी नित्यनेमाने चालते | आषाढी कार्तिकी वारी संत मी ना वारकरी | आळविते तुला तरी आस मुक्तीची घेऊन | आले देवा तुझ्या दारी

कावळा आणि चिमणी

लेखक अनामिक यांनी सोमवार, 01/06/2009 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
खालची कविता माझ्या भाचीसाठी मुळ कथेला (जी आता नीट आठवतही नाही) थोडी कलाटनी देऊन लहान मुलांना आवडेल अशा स्वरुपात मांडायचा प्रयत्न केला आहे. (काही बदल सुचवता आले तर नक्की सुचवा).

साखरेचे खाणार त्याला..!

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 01/06/2009 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मी लहानपणापासूनच गोडघाशा. साजूक तुपातला शिरा, केळ्याचे काप घातलेला सत्यनारायणाचा शिरा असेल तर विचारूच नका, माझा य-य आवडता पदार्थ आहे! (आई सत्यनारायणाच्या प्रसादासाठी मोठ्या पातेल्यात आणि माझ्या खादाडीसाठी वेगळा छोट्या पातेल्यात शिरा काढून ठेवायची आणि लहानपणी मला कधीच तीर्थप्रसाद देण्यासाठी बसवले जात नसे! :S ) (पण इथे एक धोक्याचा इशारा द्यायला मी विसरेन असे वाटते त्याआधीच सांगतो - मुगाचा साजूक तुपातला शिरा हा पदार्थ मी एकदाच खाल्ला -आणि अक्षरशः मुगदळासारखा पुढचा संपूर्ण दिवस बसून होतो! एवढा जड पदार्थ मी आयुष्यात पुन्हा खाल्ला नाही.

मनात वसलेला गुलमोहर

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 01/06/2009 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हात लखलखणारे झुंबर मनात वसलेला गुलमोहर नजर खिळवुनी जिकडेतिकडे नजरबंदिचा खेळ खेळतो लाल तांबडे शेले उडवित हिरव्या छायेतुन सळसळतो गारुड याचे चराचरावर कधि पानांच्या पडद्याआडुन हळूच हसतो लाल तजेला कधि तेजाचे पलिते घेउन फुलांनीच हा रसरसलेला वैशाखाचा घुमवित जागर घरी, अंगणी, वाटेवरती कुठे माळरानी एकांती तप्त उन्हाच्या काहिलीतही मोहरलेली याची कांती पायांखाली कुंकुम-केशर
Taxonomy upgrade extras

ओ.सी.डी.

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 01/06/2009 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
ओ.सी.डी. म्हणजे ऑबसेसीव कंपल्सीव डीसऑर्डर. आता ह्याला समांतर मराठी शब्द मला माहीत नाही. पापड,लोणचे, मुरंबा ह्यानी तो द्यावा. _______________________________________________________ अहो ब्रश आणला आहे ना. मग जानव्याने पाठ का खाजवताय.- बायको ब्रश ने हात लचकला तर? -मी काही लचकत नाही. वापरुन बघा. घाणेरडी सवय जानव्याची-बायको त्यात घाणेरडे काय? चेंबुर ला आमच्या चाळीत मे महीन्यात सर्व पुरुष मंडळीचा रात्री ९ वाजता पटांगणात सामुदायिक कार्यक्रम असायचा. ब्रंहानंदी टाळी लागायची त्यांची. त्यातला आनंद तुला नाय कळायचा. शी, ..ओ.सी.डी आहे ती- बायको. लगेच लक्षात आले काय भानगड आहे ते.

"दिलाचा दिलवर भेटला..."

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 01/06/2009 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
वाटंला डोळे जीव थकला धनी कधी हो येता घरला साजण माझ्या स्वप्नीच आला मला दिलाचा दिलवर भेटला तगमग जिवाची होतेया भारी रात सरली कधी येतेया स्वारी वृंदगान : मर्दानी तोरा हसतोय छान हिच्चा नवरा शारूख खान माझा डोळाच पटकन लागला मला दिलाचा दिलवर भेटला नणदेचा दादला डोळा मारी इष्टेटीवरती नज्जर सारी वृंदगान : बटाटे डोळे टमाटे कान नण्देचा नवरा इर्फ़ान खान हा ठेवा मी जपून ठेवला मला दिलाचा दिलवर भेटला राती अचानक खोलीत आला मला पाहुनी दिवा मालवला..

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग ४ ...वसुली एजंट व्हा ...

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 31/05/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
या पूर्वीचे करिअर गायडन्स वर्गाचे धागे... भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग १ ...भंगडा पॉप आर्टिस्ट व्हा ... http://www.misalpav.com/node/1425 भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग २ ... नाट्यसमीक्षक व्हा ... http://www.misalpav.com/node/1451 भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ... इव्हेंट मॆनेजर व्हा... http://www.misalpav.com/node/1560 भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....

माझी मद्रास ची सफर- भाग अंतिम

लेखक मस्त कलंदर यांनी रविवार, 31/05/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
... भाग १ ... भाग २ ... भाग ३ तसं बरंचसं लिहून झालंय चेन्नई/मद्रास बद्दल... देवांनी तर सविस्तर लिहिलं आहेच.. नि बरीचशी जनता ही तिकडे राहून आल्यामुळेही अनुभव जवळ्जवळ सारखेच असतील... पण माझ्यामते... आणखी एक-दोन गोष्टींच्या उल्लेखाविना ही सफर नक्कीच अपूर्ण राहिल... पहिली गोष्ट म्हणजे.. दाक्षिणात्यांचं वागणं!!! माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे..