पाऊस ओला..
सतरंगी रथात बसून आला
पाऊस ओला.. पाऊस ओला..
हिरवाई भारली सृष्टीच्या रंगात
शुभ्रसा निर्झर धरणीच्या भांगात
धुक्याचा कापूस पिंजून गेला..
पाऊस ओला .. पाऊस ओला..
गर्जत मेघांचे तुषार सांडले
तृणांवर मोत्यांनी डावही मांडले
मेघांनी झाकला नभाचा टीळा..
पाऊस ओला.. पाऊस ओला..
झाडांच्या हातांत वेलींचा चुडा
ओसंडून वाहतो मेघांचा घडा
शृंगार हिरवा ऋतू ल्यायला..
पाऊस ओला.. पाऊस ओला..
निळ्याशा थेंबात आभाळ दाटे
मातीच्या हृदयांत दरवळ भेटे
अल्लड अवखळ सरींचा मेळा..
पाऊस ओला.. पाऊस ओला..
ओलेत्या रानांत, ओलेती चाहूल
ओलेत्या मनांत, ओलेती हुरहूर
हृदयांत शिरशिरी शिंपून गेला..
पाऊस ओला.. पाऊस ओला..
- प्राजु
वर्गीकरण
मस्त पाऊस!
वा! मस्त
चिंब कविता आवडली :)
In reply to चिंब कविता आवडली :) by संदीप चित्रे
+१
वा शेवटचे
ए किती गोड
आल्हाददायक आणि आनंद देणारी सुंदर कविता.
छान
ओलेत्या रानांत, ओलेती चाहूल..
In reply to ओलेत्या रानांत, ओलेती चाहूल.. by सर्वसाक्षी
सुंदर
In reply to सुंदर by प्राजु
+१
मस्त!!!
In reply to मस्त!!! by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by मराठमोळा
हेच
In reply to हेच by अनामिक
+++++१
सुंदर पावसाळी कविता!
नेहेमी प्रमाणे मस्त कविता...
कविता आवडली
In reply to कविता आवडली by धनंजय
अहो.. ओढा
सर्वांचे
मस्त कविता
अगं इथला
पुन्हा
सुंदर !!
प्राजू, अप्