Skip to main content

प्रकटन

कोकण दौरा

लेखक नानबा यांनी सोमवार, 22/06/2009 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण दौरा मी आणि माझे काही मित्र कोकणात दौर्‍यावर गेलो होतो. त्या वेळी मी माझ्या कॅमेर्‍यातून टिपलेला कोकणाची काही छायाचित्रे मी इथे टाकत आहे... आपणही त्याचा आनंद घ्याल....

फेनॉमेनल मिपाकट्टा

लेखक टारझन यांनी रविवार, 21/06/2009 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम्स .. रामराम्स !! (णको .. णमस्कार्स लै बोर झालं) काल बराच पाउस झाला नै ? लाईटही गेली .. करायला काही नव्हतं .. धम्याची धमी देखील नव्हती घरी .. त्यामुळे धम्या जाम पकला होता ... सगळी कामं हातानी करावी लागत होती .. किमान जेवणाचं तरी बाहेर होईल ह्या आशेनं त्याने कट्टा आयोजित केला .. (उसातनं आलेले) सुर्य .. मी .. आणि धम्या .. आणि जर खरडवह्या उचकण्यातून वेळ भेटला तर पर्‍या येणार होता ... लाईट गेल्यामुळे आपला लॅपटॉप वर "नाईट ट्रेन" नावाचा "के व ळ अ प्र ति म" मिस्ट्रीपट पहात होतो .. सहाला धम्याचा फोन वाजला .... म्हंटलं आता निघायला हवं .. साडेसहाला निघालो .... पावसाची रिपरिप होती ..

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १०

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 21/06/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

जनांचा प्रवाहो...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 21/06/2009 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
भर दुपारची वेळ. रणरणत्या उन्हामुळे रस्त्यावरची वाहतूक थंडावलेली. झाडाच्या आडोशाला, सावलीखाली उभ्या राहिलेल्या ट्रकखाली विश्रांती घेणारे ड्रायव्हर-क्‍लिनर सोडले, तर रस्त्यावर माणसांचा मागमूसदेखील नाही... मैलामैलांवर हीच स्थिती. शेगावकडे जाणारा रस्ता सुरू होतो आणि हे चित्र पालटून जातं. रणरणत्या उन्हात, माणसांचे घोळके संथ लयीत चालत असतात. तळपत्या उन्हात त्यांच्या हातातले भगवे झेंडे लांबवरून आणखीनच भडकभडक वाटू लागतात.

पहीला पाउस

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 21/06/2009 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता राजपुत्र. त्याला पहील्या पावसाचे खुपच आकर्षण होते. चाळीतल्या गजाच्या खिडकीवर उभा राहुन तो पहील्या पावसाची वाट बघायचा. राजपुत्राचे शेजारी पंजाबी घर होते. फाळ्णीत कराचीमधुन पळुन आलेले. त्या घरात एक परी होती. राजपुत्राची जिवलग मैत्रीण. परीच्या आईच्या हातात एक जाड सोन्याचे कडे होते. राजपुत्राला ते फार आवडायचे. परीच्या आईलासुद्धा राजपुत्रावर खुप लोभ होता. ११ इंच उंचीच्या चांदीच्या पेल्यात जाड जाड लस्सी मिळायची राजपुत्राला. 'जमाइ राजा' म्हणायची परीची आई. आभाळ भरुन आले होते. ढ्ग एकमेकांशी मस्ती करत होते. भर दुपारचा अंधार. उल्हासीत करणारा गारवा.

कारण

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 20/06/2009 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याचा अर्थ नेमका काय असावा? केवळ दडपण? की नियतीच्या उंबरठ्यावर छिन्न जिवाचे आत्मसमर्पण? मी वाकावे, मीच झुकावे, मलाच मी घालावे कुंपण अन् माझे सर्वस्व लुटावे, जपण्यासाठी तुझे थोरपण किती जपू मी? किति सांभाळू? तुझ्या मनाचे दुभंगलेपण मनात काही, जनात काही, कृत्रिम अन् फसवे मोठेपण तपे लोटली तरी न कळले माझ्या अगतिकतेचे कारण तुझा आंधळा अहंकार की माझे अतिरेकी हळवेपण?
Taxonomy upgrade extras

ज्ञानाचे स्वरुप , पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 20/06/2009 15:56 या दिवशी प्रकाशित केले.

ज्ञानाचे स्वरुप , पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल

लेखक: अजय भागवत. १२ जुन २००९ , पुणे ajaybhagwat@marathishabda.com

हया लेखाचे उद्दीष्ट्य एक विचार मांडणे आहे . त्या विचारामागील भुमिका स्पष्ट व्हावी ह्या हेतूने सर्वप्रथम :

१ . ज्ञान कशास म्हणता येईल ते विचार व्यक्त केले आहेत

२ . ज्ञानाचे स्वरुप मांडले आहे , त्यातील कक्षा स्पष्ट केल्या आहेत

३ . ज्ञान आत्मसात करण्याच्या विवीध पातळ्यांचा विचार मांडला आहे ( ब्लूम्स टॅक्सॉनमीच्या आधारे )

फसवणूक

लेखक अ-मोल यांनी शनिवार, 20/06/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ अगदी कोरं करकरीत तू पाठवलेले ढग रिते होवून उलटून गेले असतील बरेच दिवस. पुढयातल्या कागदासारखं मनावरही उमटत नाहीत तुझ्या पावसाची अक्षरं. दाही दिशांना नजरेचे घोडे फेकून पहावं ३६० अंशांत एखादाही चुकार ढग नाहीच. निळा कॅनव्हासही ओकाबोका. विहिरीत उतरावं खोल खोल तर सगळे सांदी कोपरे व्हॅक्युम सकरने शोषलेले. आता खणायचीही भीती वाटते न जाणो तिथलंही पाणी अंतर्धान पावलेलं असेल? बारोमास दुष्काळ की काय ? असं स्वत:ला विचारतानाच ओल्या मातीचा गंध मनात आणि मी सचैल स्नात... स्वत:लाच किती फसवावं माणसानं?
Taxonomy upgrade extras

काही अनुभव..पावसाळलेले!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 19/06/2009 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
rain पावसाची बरेच दिवस वाट पाहिली, शेवटी कंटाळून सकाळी पावसाच्या अनुपस्थितीतच कांद्याची "खेकडा' भजी (खेकड्याच्या पायांसारखी दिसणारी. खेकड्याचे पाय घातलेली नव्हे!) करून खाल्ली. वर बायकोला एकही न ठेवल्यानं, संध्याकाळी तिच्या शिव्याही खाल्ल्या! दुपारी पावसाचा मस्त शिडकावा झाला आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला.