Skip to main content

प्रकटन

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ६

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 16/06/2009 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

इट्स मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 16/06/2009 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा दिवस फारच धांदलीचा गेला. सुमारे १५० फोन आले. ३ सोडता बाकी सर्व 'आता आमच्या मुलांच्या भविष्याचे काय होणार' अशा प्रकारचे. जर 'पुण्य' नावाच्या गोष्टीवर विश्वास असेल तर आजुबाजुला असलेल्या १० वीच्या किंवा १२ वी च्या पालकांना लेखातील माहीती जरुर पोचवा. जर पोचवु शकाल तर तुम्हाला ह्या वर्षी आणखी काही 'पुण्य' करायची गरज नाही. १० वी मधॅ जर १०० मुलांना ९०% मार्क मिळाले तर तर त्या पैकी ५जण हेच यश १२ वी सायन्स मधे कायम ठेवु शकतात. आणि ह्या ५ पैकी फक्त २ जण सीईटी मधे १८०+ ला पोचतात. ह्या वर्षी सीइटी मधे फिजिक्स मधे मुलांची कत्तल झाली.

अगं अगं बशी..! - १

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 16/06/2009 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाधारणपणे पब्लिक ट्रान्स्पोर्ट.. म्हणजे सार्वजनिक वाहतूकीची साधने कोणती ?? असा प्रश्न जेव्हा शाळेमध्ये विचारला जायचा तेव्हा अगदी न चुकता बस, टांगा, रिक्षा .. अशी यादी असायची. कारण मी शाळेत होते तेव्हा सिक्ससीटर, पिग्गि, मिनी बस असले प्रकार नव्हते. तुम्ही श्रीमंत असाल तर रिक्षातून जा.. नाहीतर टांगा, बस आहेच. इचलकरंजी मध्ये तेव्हा डेक्कन पासून एस टी स्टॅण्ड पर्यंत टांग्याची वाहतूक होती. म्हणजे गुरू टॉकि़ज पर्यंत १ रूपया आणि एस टी स्टँड पर्यंत १.५० रूपया. घोड्याच्या मागे असलेल्या टांग्यात बसायला खूप आवडायचं.

आकांत

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 15/06/2009 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्राण झाला शांत आता संपला आकांत आता यायचे ना फिरुन येथे, सोडला हा प्रांत आता तोडले सारेच धागे, का पडावी भ्रांत आता? सावल्यांच्या संगतीने बोलतो एकांत आता सोहळे सोसून फसवे जीव झाला क्लांत आता वादळाचे धुमसणे हे का न होई शांत आता?
Taxonomy upgrade extras

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ५

लेखक प्रसन्न केसकर यांनी सोमवार, 15/06/2009 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

दिल मिले ना मिले...

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 15/06/2009 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
`माणूस पहिल्यांदा कोणता विचार करतो?'... त्यानं मला विचारलं, आणि मी उत्तर न देता त्याच्याकडे बघत राहिलो. त्याच्या प्रश्‍नाचा संदर्भ माझ्या लक्षात येत नव्हता. मी निवडणुकीविषयी बोलत होतो आणि त्यानं अचानक हा प्रश्‍न माझ्यासमोर फेकला होता. `अर्थातच, समाजाचा!'... माझा कोरा चेहरा पाहून त्यानंच काही क्षणानंतर उत्तर दिलं. तरीही माझा चेहरा कोराच होता. इतके दिवस, निवडणुकीचे रागरंग न्याहाळत फिरताना भेटलेली माणसं आपापल्या समस्यांनी त्रासली आहेत, असं मला वाटत होतं. प्रत्येकाच्या समस्या मात्र समान होत्या.

सहजिवनात आली ही .....

लेखक टारझन यांनी सोमवार, 15/06/2009 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , गोष्ट आहे साधारण नऊ दहा वर्षांपुर्वीची .... दहावीत असेल .. नुकतंच मिसरूड फुटू लागलं होतं ... आणि सारख "कुछ कुछ होता है" असं वाटत होतं .. नक्की काय होतंय का होतंय हे कळायची अक्कल नव्हती .. आणि जरी बडबड्या स्वभाव असला तरी काही गोष्टी कोणाबरोबर बोलण्याची सोय नव्हती .. ते केवळ शारिरीक आकर्षण नव्हतं एवढं खरं .. त्याच्या कितीतरी पुढचं होतं ते .. मन कोणाच्या तरी शोधात होतं .. कोण ? स्वप्नसुंदरी ? त्यावेळी एक मराठी सिनेमा पाहिलेला .. नाव नाही आठवत .. त्यात एक अत्तिशय सुंदर गाणं होतं ..

तुळशीबाग - एक अनुभव

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 14/06/2009 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख एक पुरुष का लिहितोय असा प्रश्न कदाचित तुम्हाला पड्ला असेल, सांगतो. गेल्या आठवड्यात पण तेच झालं. पुण्याबाहेरचे कुणी पाहुणे घरी आले कि त्यांना पुणेदर्शन करायचे असते. त्यात जर महिलामंडळ असेल तर मग विचारायलाच नको. तुळशीबाग म्हणजे तर अविभाज्य भाग. आणी आमचा रोल ठरलेला - "ड्रायवर".

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ४

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 14/06/2009 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

उजाड!!

लेखक नीधप यांनी रविवार, 14/06/2009 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
विस्थापन झालेल्या गावातले चित्र आहे. लोक घरे सोडून, छतं मोडून गेले आहेत. संपूर्ण गावभर हे असेच अवशेष आहेत शिल्लक. त्या गावातून जात असताना सगळ्या गावाचं भूत झालंय असं वाटत होतं. कुणाच्या अंगणात पेरूला बारके पेरू लागले होते. कुणी अंगणाच्या पेळूवर स्लिपर्स विसरले होते. कुठे शेवटची चूल पेटवून पुजा केल्याच्या खुणा होत्या. कुणी छताच्या नळ्यांसकट घर तसेच टाकून गेले होते. विस्थापन होऊन जेमतेम दोनेक महिनेच झाले असावेत असं सांगणार्‍या अनेक खुणा होत्या. भयंकर भयंकर वाटत होतं..