Skip to main content

अंतराळ

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 09/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.
अंतराळ हा तुझाच, पंख तुला स्वप्नांचे चंद्रबिंब प्रतिभेचे, तारांगण शब्दांचे या विशाल अंबरात उंच उंच विहरत जा साद देतसे दुरून आमंत्रण पक्ष्यांचे वाजते दिशांमधून मंद धून वा-याची, इंद्रधनू गुणगुणते भावगीत रंगांचे शांत या जलाशयात नाव बुडे किरणांची, भांडारच जणु लुटले कुणि सुंदर रत्नांचे पंखांवर नभ तोलुन मानस वाचत फिरते, बंधमुक्त पाखरू तुझ्या ऋणानुबंधांचे मनकवड्या पाखरास गुपित मुळी सांगु नको, अवघ्या काही क्षणांत होईल ते विश्वाचे!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2289
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मनकवड्या पाखरास गुपित मुळी सांगु नको, अवघ्या काही क्षणांत होईल ते विश्वाचे! एकदम मस्त... :) मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

इंद्रधनू गुणगुणते भावगीत रंगांचे - हि कल्पना फार आवडली.

सुंदर कविता!!! आवड्ली :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

ठिक वाटली ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

मनकवड्या पाखरास गुपित मुळी सांगु नको, अवघ्या काही क्षणांत होईल ते विश्वाचे! या ओळी आवडल्या..! तात्या.