अमृताची चंद्रभागा झुळझुळे या अंतरी
याचि देही याचि डोळा पाहिली मी पंढरी
मीपणाचे कवच गळले निर्गुणाच्या दर्शने
ते अलौकिक रूप पाहून तृप्त झाली लोचने
नाम ते येता मुखी या धन्य झाली वैखरी
माळ तुळशीची गळा, कासे पितांबर, कर कटी
भाळि कस्तुरिटिळक, कानी मकरकुंडल शोभती
स्वर्ग भीमेच्या तिरी, वैकुंठ शोभे भूवरी
भान हरपे आणि होई मूक वाचा बोलकी
चरणि माथा ठेविता हा जन्म होई सार्थकी
आज प्राणांतून घुमली सावळ्याची पावरी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3317
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय सही
हो. दंडवतच.
In reply to काय सही by जयवी
सुंदर रचना
सुंदर.
अंतरातून स्फुरलेली, ओघवत्या शब्दांत रूप घेतलेली आणि नादमय कविता!
+१
In reply to अंतरातून स्फुरलेली, ओघवत्या शब्दांत रूप घेतलेली आणि नादमय कविता! by नरेंद्र गोळे
सहमत आहे काकांशी.

खरेच ग्रेट
बोला हरी
छान!..
फार सुंदर
छान!
नाम ते
अच्छा.
In reply to नाम ते by क्रान्ति
सकाळी
भक्ती गीत!