(विठोबा)
मध्यरात्र झाली होती.
वार बुधवार होता. सगळीकडे शुकशुकाट
एक मांजर तेवढ्यात आडवं गेलं. दोन पावलं मागे सरकलो.
आणि पुढे रस्ता चालू लागलो.
एक कुत्र्याचं पिलु विव्हळत चाल्लं होतं
कोण तरी दगड भिरकावल्यामुळे लंगडतही होतं.
कोणी तरी पेताड आपल्याच नादात गुणगुणत चाल्ला होता.
दीर्घ श्वास घेऊन जीव हातात घेऊन मी नाकासमोर रस्त्याने चालू लागलो.
चालता चालता मागुन आवाज आला.
''कुठं फिरु राह्यला बे भाड्या एवढ्या रात्री.''
कोणीच दिसत नव्हतं
मंग ह्यो आवाज कुठून आला.
दरदरुन घाम फुटला. पायानं वेग घेतला.
घशाला कोरड पडली.
''अरे मी विचारले, कुठे चाल्लाय़ भाऊ तुम्ही एवढ्या रात्री''
एक जाडजुड, गोरापान माणूस, पानाचा तोबरा तोंडात भरलेला.
''काय नाय कामावरुन घरी चाल्लो व्हतो,
तुम्ही कुठ चाल्लावं'' कसंबसं हिम्मत करुन इचारलं
तुमी आमी असं बोलल्यामुळे शिष्टाचार पाळल्याच्या आनंदानं
तो बाबा खुस झाला.
रात्रीच्या येळला कोणी पांगळ्या माणसाचाबी आधार वाटतो.
त्याला पाहुन जरशीक हिम्मत आली.
त्याच्याशी कणत्या इषयावर बोलावं काय सुदरणा.
तोच बोलला-
''कंटाळलोय या दुनियादारीला . तीच तीच विम्याची दलाली.
तेच तेच कन्वेंस करायचं. फक्त कष्टमर बदललेला.''
त्यानं खोलवर श्वास घेतला. आभाळात पाह्यलं. खिशात काय तरी चाचपलं
काडीच्या पेटीतून काडी काढली आन तो दात कोरता बोलू लागला.
''मराठी संकेतस्थळ काढलंय. पदरमोड काढून चालवतो.
चालेल तव्हर चालवू नाय तर बंद करुन टाकू''
''आस्सं कसं बोलता भाऊ, दोन लोक एकत्र आल्यावर
जरशीक भाजी मंडई होईनच. त्याचा काय इचार करायचा'' हिम्मत वाढल्यानं माहाबी बोलाचं जोर वाढला.
''मराठी माणसं एकत्र यायला पाहिजेन. दोन गोष्टी जिवाभावाच्या बोलले पाहिजे.
काय तरी चांगभलं लिहिलं पाहिजे. याच्यासाठी मरमर करतो. ” गंभीर होऊन त्यो बोलत व्हता.
''खरं बोलून राह्यले दादा तुमी''
''पर, कधी कधी लिहिणा-याचा पांचटपणा पाहून डोकं उठतं.
वाटतं सारं बंद करुन हिमालयात तपस्या करायला निघुन जावं”
त्याचा त्रागा खरा असीन काय म्हाहित नव्हतं.
पण बोलता-बोलता माहंबी घर जवळ आलं व्हतं
तरीबी जीभ रेटून बोललो.
''तुम्ही हाय कोण? ''
एवढ्या रात्री बी आभाळात गडगडाट व्हावा तसा त्यो हसला’
आन अंधारात गायब व्हता-व्हता म्हणला-
’व्यक्तीगत प्रश्न’ पास.....
याद्या
3191
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
फास्टात विडंबन
+१
In reply to फास्टात विडंबन by सहज
+ २
In reply to +१ by अवलिया
:)
हा हा हा....
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
:)
In reply to हा हा हा.... by धमाल मुलगा
अपेक्षीत
आरं वा!
नॉट
हा हा हा.
In reply to नॉट by टारझन
मस्तच, सुंद
हाहाहाहाह
अवलियाला बाहेर काढा
लय भारी !!!
छान.
विठोबा!
कोनी दगड मारला?