Skip to main content

प्रकटन

उचललेस तू मीठ मुठभर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 12/11/2009 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

फिल्म डिव्हीजन च्या फिल्म्स कोठे गेल्या?

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 10/11/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
फिल्म डिव्हीजन च्या फिल्म्स कोठे गेल्या? साधारणता: १९८० च्या दशकात ज्यावेळी दुरदर्शनवर वाहिन्यांचा सुळसूळाट चालू झालेला नव्हता त्या काळी दिल्ली दुरदर्शनवर वरचेवर भारतीय फिल्म डिव्हीजन ने तयार केलेल्या काही कार्टून फिल्म दाखवल्या जायच्या. सदर फिल्म्स ह्या देशभक्तिपुर्ण, अर्थपुर्ण, संगीतमय व काहीतरी उद्दात हेतू असणार्‍या होत्या.

मी कात टाकली

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 09/11/2009 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
(वैधानिक इशारा ः हा लेख म्हणजे हाताला झालेल्या इजेबाबतचा हलक्‍याफुलक्‍या शब्दांतील वर्णन आहे. कमकुवत हृदयाच्या वाचकांनी कृपया तो वाचण्याचं धाडस करू नये!) कोणतीही गोष्ट साधी, सरळ, सुव्यवस्थित होता कामा नये, हा माझ्या जीवनाचा दंडक आहे. काहितरी खुसपट, अडचण, समस्या त्यात निर्माण झालीच पाहिजे. त्यानंतरच ते काम पूर्ण व्हायला हवं. मी स्वखुशीनं स्वीकारलेला नव्हे, तर नशीबानं/दैवानं/देवानं किंवा जगण्यानं म्हणा, माझ्यावर लादलेला हा नियम आहे. बऱ्याच दिवसांत तसं काही झालं नव्हतं. यंदाची दिवाळी व्यवस्थित पार पडत होती. शेवटचा दिवस होता.

नवीन सदस्य

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी सोमवार, 09/11/2009 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो नमस्कार, मी मिपा चा एक नविन सदस्य आहे, आणी गेले काही दिवस इथे नियमितपणे वाचन करीत आहे. मलापण काही वेळा प्रतिसाद द्यावासा वाटतो म्हणून मी सदस्यत्व घेतल. मला इतक लिहायला सुद्धा बराच वेळ लागला. काही अक्षरे तर लिहिताच आली नाहीत. क्रूपया मार्गदर्शन करावे.

वा गं वा! तुझा का माझा......?

लेखक भानस यांनी रविवार, 08/11/2009 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळीच नम्रताचा फोन आला..... तिने जी पंजाबमेल सोडली ती शेवटी तिच्या स्वरयंत्राने तिच्या संतापाची-त्राग्याची साथ सोडल्यावर नुसताच फुसफुसाट होऊ लागला तशी जरा कुठे ती थांबली. " अग, हो हो... जरा हळू गं. किती संतापशील? आणि हा असा त्रागा करून तुझ्या जीवाला होणाऱ्या त्रासात फक्त भर पडतेय. तेव्हा दम खा आणि शांतपणे सांग मला. " हे माझे वाक्य ऐकले अन पुन्हा ही उसळली, " म्हणे शांतपणे.... तुझे काय जातेय गं हे सांगायला. ज्याचे जळते ना त्यालाच कळते. तू चुपचाप ऐकायचे काम कर.

एका आधुनिक अमेरिकन हरिश्चंद्राची करुण कहाणी-पाकिस्तानी अणूबाँब कसा बनला?

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 05/11/2009 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख "उत्तम कथा" या मराठी मासिकाच्या दिवा़ळी अंकात आधीच प्रसिद्ध झाला आहे. तो अंक प्रकशित होऊन ३ आठवदे झाले म्हणून इथे अपलोड केला आहे. लिपी दुसरीच (लोकसत्ता फ्रीडम) आहे, गमभन नव्हे. त्यामुळे शेवटी क्लिक केल्यावर दिसेल कीं नाहीं कुणास ठाऊक. जर भलतेच चौकोन वगैरे दिसल्यास तात्यासाहेबांना 'उडवायची' विनंती! एका आधुनिक हरिश्चंद्राची करुण कहाणी सुधीर काळे, जकार्ता एक प्रामणिक तरुण आपल्या ध्येयवादी व देशभक्तीपूर्ण भूमिकेमुळे व कायदापालनाबाबतच्या ध्यासापायी कसा दारुण अवस्थेला पोचला आणि सरकार एकदा का आपल्या मागे लागले कीं काय अवस्था होते याची ही दर्दभरी कहाणी आहे.

एक प्रवास.... भाग १

लेखक निखिल देशपांडे यांनी बुधवार, 04/11/2009 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
काल झालेल्या मतमोजणीत नव्याने स्थापन झालेल्या जनशक्ती पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी १९० जागा जनशक्ती पक्षाला मिळाल्या आहेत. साधारण तीन वर्षापुर्वी हा पक्ष अस्तित्वातच नव्हता पण गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत ह्या पक्षाने चांगलाच जोर दाखवला होता. पक्षाच्या नेत्याची निवड लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सदस्य करतील असे प्रतिपादन पक्षाध्यक्ष राजेश पवार ह्यांनी केले. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण हे उद्या संध्याकाळ पर्यंत स्पष्ट होईल.