Skip to main content

प्रकटन

खांब-२

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 15/12/2009 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
"Are you going to psyche me"? If it is so, you will be fourth. अशीच एक शाळा. असाच एक कार्यक्रम. कार्यक्रम झाल्यावर मुख्याध्यापिका जरा भावुक झाल्या सारख्या वाटल्या. अजुनही जाणिवा बोथट न झालेल्या. शिक्षक पिढी घडवतो या गैरसमजात वावरणार्‍या. "सर , पालकांसाठी पण एक कार्यक्रम कराल. आजकाल पालक होणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे" तसे शिक्षक होणे सुद्धा. "हो तेही बरोबर आहे म्हणा. जमत नसेल तर पेशा सोडायचा चॉइस असतो. पालकत्व सोडता येत नाही" हम्म. "तुम्हाला थोडा वेळ आहे का"? जरा एक कॉम्प्लिकेटेड केस आहे.

सिंहगड माझ्या नजरेने....

लेखक दशानन यांनी सोमवार, 14/12/2009 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
रवीवारचा सुस्त दिवस सार्थक लावावा ह्या विचाराने आपली यामाहा घेऊन सरळ सिंहगडचा रस्ता पकडला, सकाळ सकाळी १० वाजता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ पाहून मन आनंदीत झाले. मस्तपैकी इकडे तिकडे बघत कधी चढ संपवून गडावर पोहचलो ते समजलेच नाही. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड दिसतो कसा ह्यांची मनात खुप हुरहुर लागून राहिली होती व गडावर पोहचतात चारीबाजूची गर्दी पाहताच मन निराशेने भरले. जसे एखाद्या पिकनिक स्पॉटचे वातावरण असते तसेच वातावरण गडावर ही दिसत होते, चारचाकी-दुचाकी गाड्यांचे ताफेच्या ताफे उभे होते.

......आणि मग

लेखक मन यांनी शनिवार, 12/12/2009 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
......आणि मग शुभ कार्याची तुझ्या उडेल लगिन घाई,येइल तुझ्या वसंत आयुष्यी- पहाटपालवी तिच्या अवखळ ,अल्लड, सोनपावलांनी. तिच्या ओल्-स्वभावी बनेल माझी पुत्री. जोडुन नाती ,रचुन नवी प्रेमबंधनं घर बनविल ती प्रेमनिवास. येताच माहेर आल्हाद आठवणी,जोडिल ती -घडवील सासर तशाच साठवणी ..... लागेल लळा,जुळतील मने ,नर्म प्रसन्न दर्शानाची तिच्या सवय होइल . रामप्रहरी दोघांचा सुहास्य दिनारंभ होइल. दिस जातिल, स्वर एक होतिल. सासु-सुनेची स्पर्धा न राहता माय्-लेकिची मेणमउ माया बनेल . चौघांच्या आपला मित्र मैफिली जमतील.

मुंबईतील हॉटेलमधील नवीन नियम

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 12/12/2009 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील हॉटेल संघटनेने लागू केलेल्या नव्या नियमापासून ताटात घेतलेले अन्न टाकल्यास पाच रू. दंड आकारण्यात येणार आहे. वाढती महागाई व अन्न धान्याची कमतरता हे मुख्य कारण असल्याचे सांगत आहेत. तसेच ग्लासातील वाढलेल्या पाण्याचाही अपव्यव टा़ळण्यात येणार आहे. (स्टार माझावरील बातमी येथे वाचा. व्हिडीयोचा नेमका दुवा मिळाला नाही.

उपसंहार

लेखक दमनक यांनी शुक्रवार, 11/12/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोन बातम्या. काल बजाज स्कूटरच्या निधनाची आणि आज दिपुंच्या. एका युगाचा अंत झाला अनेक अर्थांनी. बजाज स्कूटरीला भारतीय मध्यमवर्गीयांचे प्रतीक मानले गेले, तसे दिपु हे भारतीय मध्यमवर्गीयांचे प्रतीक असे म्हटले तर अनेकांच्या भुवया उंचावतील. रूढार्थाने दिपु हे 'एनिथिंग बट मिडलक्लास'. विश्वभान, कालभान आणि या सर्वांच्या साक्षीने आत्मभान असलेला साहित्यिक. विसाव्या शतकातला 'फार महत्त्वाचा कवी'. या माणसाला मध्यमवर्गीय विचारसरणीत बसवणे शक्यच नाही. विचारसरणी ही मोठी मजेशीर गोष्ट आहे, नाही का ? जर एक विचारसरणी 'पुढे' गेली काय किंवा 'मागे' आली काय...

खांब-१

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 11/12/2009 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
"उद्या संध्याकाळी येशील का जरा"? साखरपुडा का? "जरा घोळ झालाय. माझ्या कक्षेबाहेरचे आहे. तुच श्रुती कडे बोल. मी 'जांबुवंत जमान्यातला'. दे फोन तीला. "काका, बाबांच्या आकांड्तांडवाकडे तुम्ही लक्ष देउ नका. माझी काहीही चुक नाहीये. तुम्ही उद्या या. सविस्तर बोलु. फोनवर नको" दिपक म्हणजे अगदी पाणी सुद्धा फुंकुन पिणार्‍या पैकी. आणि श्रुती सुपर फास्ट एक्स्प्रेस. दोघांचाही नाइलाज. असे वाद कायमचे होत असत. घरी पोचल्यावर श्रुती सोडुन सर्वांचे चेहेरे सुतकी. गेल्याच आठवड्यात श्रुतीचे लग्न ठरले होते. फक्त साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरायची होती. श्रुतीची जनरल प्रॅक्टिस नुकतीच सुरु झाली होती.

मलकापूरचा म्हातारा

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/12/2009 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
बालपण किती रम्य असतं नाही? लहान असताना आमच्यासाठी लांबचा प्रवास म्हणजे रत्नागिरी-मुंबई किंवा रत्नागिरी-पुणे असायचा. दोन्हीकडे आत्या राहायच्या, राहतात. त्यामुळे वर्षातून एकदा, विशेषतः मे महिन्यात किंवा काही सणानिमित्त एक ट्रिप या ठिकाणी असायची. रत्नागिरीत झोपाळ्यावर खेळतानाही आम्ही बसची जमवलेली तिकिटं घेऊन रत्नागिरी-मुंबई एसटी असा खेळ खेळायचो. असो. मुंबईपेक्षाही पुण्याचा प्रवास जास्त वेळा झाला. पुण्याची साधी गाडी रात्री सात वाजता निघायची. नंतर ही वेळ वाढत नऊपर्यंत गेली. तेव्हा सेमीलक्‍झरी गाडीत बसणं म्हणजे चैनच होती. त्यातून वडील एसटीत असल्यानं वर्षातून दोन महिने पास मिळायचा.

अवघड वळणावर

लेखक स्वाती२ यांनी शनिवार, 05/12/2009 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच एक फॉल मधली शुक्रवारची दुपार. नेहमी प्रमाणे गाणी ऐकत माझी कामं उरकत होते. फुटबॉल सिझन. त्यातुन होम गेम. शेल्बीविल v/s रशविल. ६ वाजताच हादडून बाप-लेक गेमला जाणार . त्यामुळे संध्याकाळ्च्या जेवणाची तयारी जरा लवकरच करायला घ्यायाला हवी असे स्वतःलाच सांगत असताना स्कूलबसचा आवाज आला. ५ मिनिटांनी गॅरेज बंद केल्याचा, धाडकन दप्तर टाकल्याचा वगैरे नेहमीचे आवाज. पाठोपाठ खिदळतच लेक आत आला. "मॉम, आज काय झालं माहितेय." त्याला हसणं अनावर होत होते. मी नुसत्याच भुवया उंचावल्या. "It's just hilarious" कसबस एवढ म्हणुन स्वारी खुर्चीत लवंडली. पुन्हा हसण्याचा अ‍ॅटॅक. "हळू.

क्रियाशील आदर्श - हुतात्मा तुकाराम ओंबळे आणि कुटूंबिय

लेखक विकास यांनी शुक्रवार, 04/12/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
कधी काळी वृत्तपत्रातील बातमीवरून बोलत असताना, एका सन्माननीय व्यक्तीने मला एकदा मिष्कील उपदेश केला होता, "जर काही सामाजीक काम करायचे असेल तर, शहाणा हो आणि वृत्तपत्रे वाचणे बंद कर!"अर्थात उपदेश खरा होता जरी त्यातील हे वाक्य मिष्कील असले तरी... तर "वृत्तपत्रे वाचणे बंद कर" या वाक्याचा अर्थ काय? बातम्या म्हणून वाचायला लागले की खून, मारामार्‍या, भ्रष्टाचार, लबाड जोडती इमले माड्या-गुणवंतांना मात्र झोपड्या, असेच पहायला मिळते. यातून एखाद्या वेळेस चीड येईल पण एकंदरीत नैराश्यानेच ग्रासले जाते ज्यातून इतरांसाठीचे काय, स्वतःचे पण धड काम होत नाही.