Skip to main content

प्रकटन

विण

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 07/06/2010 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे आहेस? आज भेटतोस का? घरी नको. पण नक्की भेट. तुझ्याकडे काय आहे? शिवास चालेल. आज लुढके पर्यंत पिणार आहे. घरी पोचवायची जबाबदारी तुझी. Am I crashing? may be. meet me and find out. You are the crash specialist. बायकोला सांगुन येतोय. तुझ्याबरोबर असलो तर तीला काळजी नसते. आधीच्या क्रॅशेस मधे तुच संभाळले आहेस हे तीला माहीत आहे. ......................................................................................... जवळ जवळ एक वर्षाने भेटतोयस रे. गेली ३० वर्षाची आपली मैत्री. अगदी बिनओझ्याची. कधी जास्त न भेटता मैत्रीची घट्ट विण. शेवटी तु म्हणाला होतास तेच खरे झाले. बायको अक्षरशः कोसळलीय. दाखवत नाही

पाद्रीबुवांची मराठी शिकवणी

लेखक अरुंधती यांनी रविवार, 06/06/2010 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी कोणाला आपली मातृभाषा गोर्‍या साहेबाच्या भाषेतून शिकवायची कसरत केली आहे? आणि त्यातून तुमचा आधीचा अनुभव अगदीच माफक असताना व तुमचा विद्यार्थी कोणी ऐरागैरा नाही तर तो एक ख्रिश्चन मिशनरी पाद्री आहे हे माहीत असताना? मला हा अनोखा अनुभव घेण्याची मजेशीर संधी काही वर्षांपूर्वी मिळाली आणि त्या छानशा अनुभवातून एक सुंदर स्मृतिचित्र तयार होताना मलादेखील काही शिकायला मिळालं. कॉलेजच्या सोनेरी दिवसांमधील गोष्ट. भटकंती, सहली, सिनेमा, हॉटेलिंग, वाढदिवस इत्यादींसाठी कायमच घरून हातखर्चाला दिलेले पैसे कमी पडायचे. अवाजवी पैशांची मागणी केली की घरून सांगितले जायचे, "आपापले पैसे कमावा आणि खर्च करा"!

डंकर्क

लेखक पुष्करिणी यांनी रविवार, 06/06/2010 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
डंकर्क हून लाखो ब्रिटीश - फ़्रेंच सैनिकांची जर्मनांच्या तावडीतून झालेल्या सहीसलामत सुटकेला काल ( ४ जून ) ७० वर्षं झाली, दुसया महायुदधाच्या घटनाक्रमातील एक अत्यंत महत्वाची घटना. १९३९ पासून फ़्रेंच आणि ब्रिट्ननं जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारलं. ब्रिटीश सैन्य फ़्रेंच हद्दीत तळ ठोकून बसलय आणि तिकडे जर्मन सैन्य युद्धाची कसून तयारी करतय अशी अवस्था.. १० मे ला चर्चिल पंतप्रधान झाले आणि जवळजवळ त्याच मुहूर्तावर हॉलंड,लक़्झंबर्ग आणि बेल्जियम वर जर्मनीचा हल्लाबोल झाला.

I WANNA GROW UP ONCE AGAIN

लेखक झुम्बर यांनी शुक्रवार, 04/06/2010 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
office मधलं तेच रटाळ वातारण त्या deadlines आणि कामाचे डोंगर ... बाहेर उन्ह भकाभका आग ओकताय असा एकंदरीत माहोल अतिशय कंटाळवाणा ..... प्रचंड चीडचीड होत होती.... पण खरच इलाज नव्हता असाच कसाबसा दिवस सरकत होता आणि अचानक दुपारी थंड गारवा हवेत पसरायला लागला AC चे सगळे नियम धाब्यावर बसवून मी खिडकी उगडली आणि आहाहाहा ............. एक थंड हवेचा झोत गालाचे लाड करून गेला ...

गारांचा पाऊस

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 03/06/2010 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बऱ्याच काळानंतर मी गारांचा पाऊस अनुभवला. खूप मस्त वाटले. विजांचा कडकडाट, जोरदार वारे वगैरे वातावरण निर्मिती तर अगोदरच झाली होती. आभाळातून सपसप काही थेंब वानगीदाखल बरसूनही झाले होते. मग अचानक पुन्हा एकदा एक जोरदार वावटळ आली. सगळीकडे नुसती धूळच धूळ! कोंदलेल्या आभाळाकडे एक कटाक्ष टाकत मी खिडक्यांवरचे वाळ्याचे पडदे वर गुंडाळू लागले. पण वाऱ्याला कुठे चैन पडत होते! त्या पाचेक मिनिटांत त्याने भरपूर खोडसाळपणा करून मला पार त्रस्त करून सोडले! कधी डोळ्यांमध्ये धूळ उडवून, कधी खिडक्यांच्या तावदानांना हीव भरल्यागत थडथडा आपटवून तर कधी आपल्या द्रुतगतीवर वाळ्याच्या पडद्यांना जोरदार हेलकावे देऊन!

जस्ट लाइक अ वेव्हिंग फ्लॅग....

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 02/06/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
Give me freedom, give me fire, give me reason, take me higher See the champions, take the field now, you define us, make us feel proud In the streets our heads are lifting, as we lose our inhibition, Celebration its around us, every nations, all around us Singing forever young, singing songs underneath that sun Lets rejoice in the beautiful game. And together at the end of the day. WE ALL SAY When I get older I will be stronger They’ll call me freedom Just like a wavin’ flag And then it goes back And then it goes back And then it goes back .....

ती...

लेखक भानस यांनी मंगळवार, 01/06/2010 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
लोकल, म्हणजे विविधतेचा मुक्त खजिना. मी, सदैव माणसांमध्ये रमणारी. ठराविक गाड्या, त्यामुळे अनेक तऱ्हांनी ओळखी. ब्रिजवरून धावता धावता दृष्टीस पडणारी नेमकी माणसे. डब्यात तर...... नुसते डोळ्यातून दिसणारे प्रश्न, आपुलकी..... आलीस का? ह्म्म... काही हात उंचावून दखल घेणार्‍या. मैत्रिणींच्या मैत्रिणी.... अग आज शालीनि दिसत नाहीये. न विचारताच माहिती पुरवणार्‍या. काही न बोलणार्‍या पण जागा देणार्‍या. एखादे दिवशी, माझ्या सुंदर साडीवर, ती कशी खुलतेय तुझ्या अंगावर.... लांबूनही मस्त गं अशा खुणा करणाऱ्या सख्या.

चिंतू-३

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 28/05/2010 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
चिंतू-३ संध्याकाळी अंधेरीच्या रेल्वे स्टेशनावर उतरून जिना चढणार्‍या गर्दीत जिन्याच्या पायर्‍या दिसेनाश्या होतात, आणि एकेका पायरीने वर चढणार्‍या त्या गर्दीची डोकी, खालून, काळ्या लाटांसारखी हिंदकळताना दिसतात... ... मध्येच एका पायरीवर मात्र, या लाटा भोवयासारख्या दुभंगतात... घाईघाईने जिने चढणारी ती पावले, मधल्याच एका पायरीशी थबकतात, आणि बाजूला होऊन पुढे सरकतात. आपोआपच, त्या पायरीवर एक पोकळी तयार होते. आणि लाटेतले प्रत्येक डोके खाली वळते... ...