त्याच्या अफाट पसार्याची कळत नकळत पुसटशी जाणीव होते आणि त्याचबरोबर स्वतःच्या नगण्यतेचीही. पुन्हा एकदा प्रश्न पडतात, कशासाठी केला होता अट्टाहास? हर्ष, खेद मावळतात.
--- बोरकरांच्या कवितेत हे द्वंद्व अनेक ठिकाणी दिसून येतं. जगताना येणार्या अनुभवांची समृद्धता आणि त्याचवेळी स्वतःच्या नगण्यतेची जाणीव. वर दिलेल्या समर्पक उदाहरणांसोबतच 'रसलंपट मी तरी मज अवचित गोसावीपण भेटे', 'कळत जाते तसे...' अशा अनेक ओळी.
जी. ए. - सुनिताबाई पत्रव्यवहारात चर्चिला गेलेला एक मुद्दा आठवला - बोरकर एवढे भाववृत्तीचे कवी असून त्यांनी गांधीचे चरित्र काव्यबद्ध करण्याचा निर्णय कसा घेतला त्याबद्दल जी. एंना फार कुतूहल होते.
दवबिन्दु!!
पहाटवार्यान अगदी अचुक वर्णन केल या शब्दबिंदुंच !!
खरच दवबिंदुं प्रमाणे नाजुक हळुवार, परावर्ति..सल्युट !!
धन्यवाद यशोधराजी.
अश्याच लिहित रहा.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
माननीय यशोधराजी,
माननीय सदस्या
मिसळपाव.कॉम
आपले मुक्तक वाचले. आपल्याला प्रतिभेचे दैवी देणे आहे, त्यामुळे मनातल्या भावना चपखल शब्दांत मांडण्याचे आपल्याला कसब प्राप्त झाले आहे. आपल्या हातुन साहित्यसेवा अविरत घडावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपल्यासारख्या साहित्यिकांच्या साधनेमधे व्यत्यय येतो, त्या गोष्टींना जबाबदार असलेल्या प्रवृत्तींचे निराकरण लवकर होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.
दृपलसारख्या कंटेट म्यानेजमेंट सिस्टीम्समुळे हे संकेतस्थळ उभे राहिले आहे त्याबद्दल मी दृपलचा तसेच दृपलटिमचा आभारी आहे. श्री तात्या अभ्यंकर यांच्या प्रयत्नाने हे संकेतस्थळ स्थापन झाले मी त्यांचा आभारी आहे. त्याला अनेक इतर संकेतस्थळे कारणीभुत ठरली, मी त्यांचा आभारी आहे. संपादकांनी केलेले कार्य थोर आहे. त्यांचा महिमा अपार आहे. त्यांचे गुणगान करण्यास मानवी वाणी पुरेसी नाही याची जाणीव आहे. पण तरीही आभार हे मानलेच पाहिजेत. सर्व संपादकांचा मी आभारी आहे. हा प्रतिसाद वाचणा-या वाचकांचा मी आभारी आहे. ज्यांचे ज्यांचे आभार मानणे आवश्यक आहे अशा सर्वांचा मी आभारी आहे. सर्वात महत्वाचे हे संकेत स्थळ चालु ठेवणा-या श्री नीलकांतचा मी आभारी आहे.
खरोखर आज मोठा मंगल दिवस आहे. सर्व संपादकांच्या आशीर्वादाने आणि कृपाकटाक्षाने मी हा प्रतिसाद लिहु शकलो आहे. हा प्रतिसाद टिकला आहे. माझे सर्व संपादकांना साष्टांग नमन आहे. माझी खात्री आहे, संपादकांची अशीच कृपा माझ्यासारख्या अल्पमती, निर्बुद्ध बालकावर राहिल. अजुन काय लिहु? शब्दच सापडत नाहीत. मुढावस्था म्हणजे काय याचा मला आज प्रत्यय येत आहे.
सर्वांचे मंगल होवो, शुभ होवो हीच कामना..
आपलाच
नाना उर्फ अवलिया.
संपादकांचा महिमा अपार । संपादकांची थोरवी अपार ॥
कसे मानु त्यांचे आभार । मी तर केवळ पामर ॥
वा सुंदर,
"शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू
वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू?
जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा..."
कवितेच्या शब्दंचा अर्थ काढु नये म्हणतात... वार्याने शिळ घालावी तशी तिला मनात घुमु द्यावी.. तुमच्या लेखात अशाच सुरेख लहरी ऊठल्यात...
सुंदर ! सुंदर !! सुंदर !!!
मिळूद्या मला मुळाशी, सारी मिटून दारे
मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हा रे....
मध्यंतरी मृत्यूविषयी डोक्यात काही विचार चालू होते, आणि तशातच बोरकरांची ही कविता अचानक सापडली. अतिशय परिणाम करून गेली. आज परत या ओळी समोर आल्या.
खुद के साथ बातां: या ताई नेहमी नेहमी का लिहित नाहीत? :)बिपिन कार्यकर्ते
पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार.
हल्लीच महिन्यापूर्वी माझा बाबा गेला. त्याच्याशी माझं फार लोभस असं मैत्र होतं. त्यालाही माझ्याशी गप्पा मारायला आवडायचं. त्याच्या लहानपणीचे किस्से, नोकरीनिमित्ताने त्याने जवळ जवळ भारत पालथा घातला, ते किस्से आणि कधी कधी अशाच गप्पा. संवाद साधण्यासाठी आणि तो टिकून रहावा, वृद्धिंगत व्हावा म्हणूनही. एकंदरीतच आयुष्याबद्दल त्याने फार डोळसपणे चिंतन, मनन केलं होतं आणि त्याबद्दल खूप आत्मीयतेने तो बोलायचाही. ते ऐकतानाही खूप छान वाटायचं.
त्याच्या आयुष्याबद्द्ल, त्याच्या मृत्यूबद्दल विचार करताना हे सगळं मनात येत राहिलं. जसं जमलं तसं इथे उतरवलं.
मात्र, त्याला त्याचं कोडं कधीच उकललेलं होतं.
रंगदांशी सहमत.
यशोधरातै,
तुमचा नीटस, संवेदनशील लेख अन् तुमचीच वरील प्रतिक्रिया वाचून माझ्या मनातल्या एका कल्पनेला शब्द स्फुरले. म्हणून ही कविता तुमचीच!
राघव
आमचाही आता शेवटाकडे प्रवास चालू झाला आहे. असे विचार हल्ली मनांत येतच होते. तुम्ही त्याला मूर्तरुप दिलेत.
बर्याच जुन्या गोष्टी आठवल्या की आता असे वाटते की त्यावेळी आपण इतका अट्टाहास का केला ? जास्त समजुतीने का वागलो नाही ? छोट्या छोट्या गोष्टींमधे का उगाच दुसर्यांचे मन दुखावले? पण ते त्यावेळेस समजत नाही.
त्यामुळे मी हल्ली माझी मते आग्रहीपणे मांडत नाही. समोरच्याचे चुकत असेल तर एकदा सल्ला देतो. परत परत मागे लागत नाही.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
लेख छान ओघवता आहे आणि कवितांच्या ओळी एकदम चपखल जागी वापरल्या आहेस.
लेख वाचताना मनाच्या एका कप्प्यात बोरकरांच्याच 'संधिप्रकाशात..'च्या ओळी (डॉ. सलील कुलकर्णीने संगीतबध्द केलेल्या) निनादत होत्या.
प्रतिक्रिया
कविता
अर्रर्र..
In reply to कविता by मुक्तसुनीत
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
ह्याच संदर्भात
In reply to उत्तम by नंदन
खराय
In reply to ह्याच संदर्भात by वाचक
खूप छान
+१
संवेदनाशी
हा त्येच त्येच :)
In reply to संवेदनाशी by रेवती
सुरेख !
दवबिन्दु!!
In reply to सुरेख ! by पहाटवारा
वाचक आणि
मुक्तक
माननीय
अवलियाजी,
In reply to माननीय by अवलिया
वा
सुरेख
हेच!
In reply to सुरेख by श्रावण मोडक
सुंदर !
जिवनाचा
छान
खासच.
+१
पुन्हा
वेदनेतून निर्मिती होते!
In reply to पुन्हा by यशोधरा
खरंय!
In reply to वेदनेतून निर्मिती होते! by चतुरंग
धन्यवाद
In reply to खरंय! by राघव
सुंदर
आवडले
_/\_
सुरेख मुक्तक
मुक्तक आवडलंच..
मुक्तक