Skip to main content

अभिनंदन...

लेखक अवलिया
Published on शुक्रवार, 15/10/2010
होईल की नाही, झाले तर कसे होईल, कुणी भाग घेईल की नाही आणि अशाच अनेक वादांच्या भोवर्‍यात सापडलेली १९वी राष्ट्रकुल स्पर्धा एकदाची पार पडली. केवळ पारच पडली नाही तर भव्य दिव्य स्वागत आणि सांगता समारोह, भारतीय स्पर्धकांची उत्कृष्ट कामगिरी आणि इतर अनेक भुषणास्पद गोष्टींमुळे ही स्पर्धा कायम स्मरणात राहिल. सर्व स्पर्धकांचे, आयोजकांचे, भारताचे आणि पर्यायाने आपल्या सर्वांचे अभिनंदन ! भारताचा तिरंगा असाच दिमाखात फडकत राहो ही सदिच्छा !! जय हिंद !!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 9120
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

असेच म्हणते. साईनाची शेवटची मॅच बघायाला मिळाले नाही ह्याचे प्रचंड वाईट वाटले! तिचे खूप कौतुक वाटते! नेमबाज व इतर खेळाडूंचेही खूप कौतुक! पाकिस्तानला मात देणार्‍या हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना काय झाले होते, देव जाणे...

कौतिक लै झाल आता. एक चौकशी बसवा आन त्या कलमाड्याचं धोतार फेडा आता!

In reply to by अप्पा जोगळेकर

>>भारतीयांची कामगिरी वाईट होती असे तुम्हाला वाटते का? कौतिक लई झालं तर काय. झालंच पाहिजे. असा मूळीच नाही. त्याचा अभिमानच आहे. पण ह्या आनंद उत्स्वात कलमाडी सारख्या सापाला मोकळा सोडता कामा नये! नाही तर तो अजून भ्रष्टाचार माजवेल. वेळ निघून जायच्या आधी त्याला ठेचला पाहिजे नाहीतर काही दिवसांनी जुनी मढी कोन उकरनार असा आपला अ‍ॅटीट्यूड असतो!

In reply to by रन्गराव

अभिनंदन! सर्व सुरळीत पार पडल्यामुळे मनापासून आनंद झाला... मात्र ही गाडी केवळ कलमाडींवर घसरावी हे मान्य होत नाही. मी काही झोपेतसुद्धा कलमाडी समर्थक नाही ;) . पण कानफाट्या तो कानफाट्या असे ठरवताना शीला दिक्षित यांचे दिल्ली राज्य मंत्रीमंडळ आणि केंद्र सरकारातील काही महाभाग हे ज्या काही बदनाम करणार्‍या गोष्टी होत्या त्याला प्रत्यक्ष जबाबदार होते हे विसरून चालणार नाही. तसेच शेवटी कुठेतरी वाचल्याप्रमाणे आपल्या सैन्याकडून मदत घ्यावी लागली. (कदाचीत मिलीटरी इंजिनियरींग सर्व्हीस असेल). तेंव्हा अशा नागरी यशात देखील अभिनंदन करताना त्यांना विसरू नये असे वाटते.

In reply to by विकास

शेवटी कुठेतरी वाचल्याप्रमाणे आपल्या सैन्याकडून मदत घ्यावी लागली. आपल्या देशाचे सैन्य आहेच लयं भारी !!! :) जो ब्रिज बांधायला ७ वर्ष आणि ५ कोटो रुं लागले तोच ब्रिज ४ दिवसात बांधुन दाखवला आहे आपल्या सैन्याने...लाज वाचवली आपल्या देशाची त्यांनी. :) http://www.thehindu.com/news/national/article806897.ece?homepage=true http://www.mynews.in/News/army_rebuilds_fallen_cwg_bridge_in_four_days_N94482.htm आधीचे बांधकाम किती रद्दड स्वरुपाचे होते हे काही मी तुम्हाला सांगायला नको !!! ;) पण ५ कोटी मोजुन आणि ७ वर्ष लावुन सुद्धा जेव्हा ब्रीज कोसळतो त्यावरुन भ्रष्टाचार कुठल्या स्तरावर गेला आहे आणि केला जात आहे ते यावेळी सामान्य जनतेला दिसले. देशाची पार लाज घालवली या भ्रष्टाचारी नेत्यांनी... :(

In reply to by मदनबाण

हा दुवा वाचला नव्हता. (दुसरा दुवा चालत नाही आहे). त्या बातमीत असे देखील म्हणले आहे:
An army engineering regiment with nearly 1,000 men was deployed to construct the Bailey bridge which is a portable pre-fabricated bridge designed for use by military units.
याचा अर्थ नवीन मटेरीअल वापरले आहे, ते देखील आर्मीचे. म्हणजे मूळचे मटेरीअल, त्यावरील खर्च कोणी उचलला, दिल्ली सरकार जे काही आर्मीने स्वतःच्या खिशातून वापरले त्याचे पैसे देणार का? मूळ कंत्राटदाराकडून वसुली करून घेणार का? एक ना अनेक प्रश्न डोक्यात येतात...

In reply to by मदनबाण

>>जो ब्रिज बांधायला ७ वर्ष आणि ५ कोटो रुं लागले तोच ब्रिज ४ दिवसात बांधुन दाखवला आहे तुलना अनाठायी आणि पूर्णतः चुकीची आहे.

पाकिस्तानला मात देणार्‍या हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना काय झाले होते, देव जाणे... बहुतेक टेस्ट तुम्ही जिंका आणि हॉकी आम्ही जिंकतो असे वरच्या लेव्हलला ठरवलेले असावे..... बाकी ७ मिनिट झाले तरी नान्याचा हा लेख अजुन उडला कसा नाही?

In reply to by आंबोळी

क्रिकेटमधे २-० असा झालेला त्यांच्या देशाचा पराभव ऑस्ट्रेलियाच्या हॉकी खेळाडुंच्या जिव्हारी लागला होता. त्याचा सुड घेतला असेच मला वाटते. आजच्या वर्तमानपत्रातील ही बातमी वाचली असेलच. "धुलाई'चा राग वॉशिंग मशिनव" नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाला भारताने दुसऱ्या क्रिकेट कसोटीत बुधवारी पराभूत केले व मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजविले. आतापर्यंतचा हा सर्वांत मानहानिकारक पराभव विसरून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एकदिवसीय मालिकेच्या तयारीला लागलेही असतील पण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना तो पराभव पचवता आला नाही. ज्या क्रीडाग्राममध्ये पंधरा दिवस वास्तव्य केले, त्याचीच त्यांनी निराशेच्या भरात नासधूस केल्याचे उघडकीस आले आहे. वाचली नसेल तर सविस्तर येथे वाचा. http://72.78.249.107/esakal/20101016/4756933335657973055.htm

In reply to by आंबोळी

क्रिकेटमधे २-० असा झालेला त्यांच्या देशाचा पराभव ऑस्ट्रेलियाच्या हॉकी खेळाडुंच्या जिव्हारी लागला होता. त्याचा सुड घेतला असेच मला वाटते. आजच्या वर्तमानपत्रातील ही बातमी वाचली असेलच. "धुलाई'चा राग वॉशिंग मशिनव" नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाला भारताने दुसऱ्या क्रिकेट कसोटीत बुधवारी पराभूत केले व मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजविले. आतापर्यंतचा हा सर्वांत मानहानिकारक पराभव विसरून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एकदिवसीय मालिकेच्या तयारीला लागलेही असतील पण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना तो पराभव पचवता आला नाही. ज्या क्रीडाग्राममध्ये पंधरा दिवस वास्तव्य केले, त्याचीच त्यांनी निराशेच्या भरात नासधूस केल्याचे उघडकीस आले आहे. वाचली नसेल तर सविस्तर येथे वाचा. http://72.78.249.107/esakal/20101016/4756933335657973055.htm

दुसरा गेम खतरनाक होता. २१-२० स्कोर होता आणि नंतर सलग तीन पॉईंट मिळवले. खल्लास खेळ केला एकदम फुलराणीने. स्पर्धेतील यशासाठी तमाम भारतीय खेळाडूंचे अभिनंदन.

In reply to by अप्पा जोगळेकर

खल्लास खेळ केला एकदम फुलराणीने.
सायनासाठी फुलराणी हे नाव फारच आवडलं. सर्व पदक विजेत्या आणि पदक मिळवण्यासाठी ईर्ष्येने खेळणार्‍या भारतीय खेळाडूंचे मनापासून अभिनंदन. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात सहभागी असणारा प्रत्येक माणूस अभिनंदनपात्र आहे.

जय हो ! आता ह्या खेळाबरोबरच भ्रष्टाचाराच्या चर्चांची देखील समाप्ती झाली असे समजावे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहमत आहे. जनतेची स्मरण्शक्ती फार क्षीण असते असे हिटलर म्हणायचा. आणि ते खरं आहे हे पटतं.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

दिक्षित कलमाडी भ्रष्टाचार करणार| राष्टकुल स्पर्धा मुळ आधार| लोकलेखा समिती चौकशी करणार| सगळे निर्दोष सुटणार निश्चित||

In reply to by सुहास..

ह्म्म्म हरले त्याच वाईट नाही वाटल पण हरायची पण एक पद्धत असते.. झुंज देत देत. पार नांगी टाकली पहिल्या गोल नंतरच. ८-० टूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ बॅड.

खरं खोटं काही माहित नाही....... पण हे वाचा........ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6749241.cms http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6752051.cms "कालमाद्याला" ठेचायला तर हवाच...... पण प्रसिद्धी माध्यम पण अती करतात..... त्यांना पण वठणीवर आणायला हवं......

मी खरे तर वाटच पहात होतो ह्या लेखाची. स्पर्धेआधी एवढी प्रचंड टीका आणि नुसती लांब बसुन मज्जा बघत खडे मारण्याच्या अनेक घटनांनंतर ( मग भले त्या जस्टिफाईड असतील ) आम्हाला तर असे वाटले की ही स्पर्धा होते आहे की नाही ? चहु-बाजुंनी टिकेची झोड, त्यात अनेकांचे घरचे आहेर, प्रस्थापित देशांचा मस्तवालपणा ( तेच माघार घेणे वगैरे ), जबाबदार्‍यांची टोलवाटोलव आदी बाकी चिंताजनक होत्या. त्यात मिडियाचे दावे आणि आयोजन समितीने पुरवलेली माहिती आणि व्यवस्थांबद्दल घेतलेल्या आणाभाका ह्यात जमिन-आस्मानाचा फरक होता. सगळेच धुसर, काही कळायला मार्ग नाही, देशाची प्रतिष्ठा तर पणाला लागलेली ... देशोदेशीचे संघ दाखल झाले, येताना मनात किंचित भिती आणि भारतीय व्यवस्थेबद्दल कमालीचा अविश्वास घेऊनच ते डेरेदाखल झाले. त्यांना पुन्हा एकदा भारताबद्दलच विश्वास आणि "तुम्ही इथे संपुर्ण सुरक्षित आहात" ही खात्री पटवुन देण्याचे अवघड शिवधनुष्य आयोजन समितीला उचलायचे होते. शेवटी शेवटी सर्वच पातळीवरुन काम दिसु लागले व स्पर्धेला रंग भरु लागला. स्पर्धेच्या उद्घाटनाचा समारंभ "दिमाखदार"च होता. भारतीय संस्कृती, कला, नृत्य, संगित आणि जीवनशैली ह्यांची सुरेख ओळख जगाला करुन देणारा हा अचाट समारंभ पाहुन मनाला किंचित बरे वाटले व स्पर्धा गाजणार अशी अंधुक शक्यता वाटली. सर्व टीकेला मागे सारुन उभारलेला हा सारंजाम मनाला खुष करुन गेला. स्पर्धा सुरु झाल्या, आधीच्या ' निगेटिव्ह मार्केटिंग्'मुळे अनेक दिग्गज खेळाडु अनुपस्थित होते पण जशी जशी स्पर्धा पुढे जाईन तसा थरार वाढतच होता. आधी झालेली टिका आणि देशाची मानहानी पुसुनच टाकायची ह्या जिद्दीनेच भारतीय खेळाडु खेळले. गगन नारंगने तर शुटिंगमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले, कुस्तीवीरांना नेहमीप्रमाणे आखाडा गाजवत आणि घुमवत ठेवला. भारतीय टेनिसचा नवा तारा 'सोमदेव' ने तर टेनिसच्या एकेरीचे सुवर्णपदक जिंकुन इतिहास रचला. अ‍ॅथेलेटिक्समध्येही आपली कामगिरी पहिल्यांदाच पदक घेऊन आली. थाळीफेकीमध्ये आपण तिन्हीच्या तिन्ही पदके मिळवण्याच्या भीमपराक्रम केला. राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीने फायनलपर्यंत धडक मारुन उच्च कामगिरी केली पण ते सुवर्णपदक मिळवण्यात अपयशी ठरले. बॉक्सर्सचा दबदबा ह्यावेळीही कायमच राहिला. सायना नेहवालने बॅटमिंटनची "राणी" कोण हे पुन्हा सिद्ध केले. ह्या सर्वांमुळे आपण चक्क ३८ सुवर्णपदके जिंकुन आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवली. आपल्या देशात होणार्‍या स्पर्धेत अशा कामगिरीसह एकुण दुसरे स्थान ह्यापेक्षा अजुन काय गिफ्ट पायजे आपल्या देशवसियांना ? आधी जे झाले ते झाले, आता त्याही जी काय आहे ती चौकशी होऊन योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहेच. पण त्यापेक्षा स्पर्धा आधी यशस्वी आणि सुखरुप पार पडणे ही प्राथमिकता होती, त्यानंतर आपल्या खेळाडुंनी पदके मिळवणे ही सेकंड प्रायॉरिटी. स्पर्धा पार पडल्या, अनेक अडथळे आणि जाणुन-बुजुन केलेली अडवणुक तसेच बदनामी आणि निगेटिव्ह मार्केटिंग ह्यांच्या नाकावर टिच्चुन स्पर्धा दणदणीत पार पडल्या व अपशकुन करणार्‍यांचे नाक कापले ह्यातच आम्हाला आनंद आहे. आपल्या खेळाडुंनी उत्तम कामगिरी करुन वैयक्तिक सर्वोच्च ३८ सुवर्णपदकांसह दुसरे स्थान पटकावले हा एक्स्ट्रा बोनस ! अभिनंदन !!! आयोजन समिती आणि संबंधित संस्थांचे अभिनंदन ! अडचणीच्या काळात ह्या स्पर्धेच्या पाठीशी उभा राहणार्‍या तमाम पाठिराख्यांचे अभिनंदन ! अत्युच्च कामगिरी करुन सर्व वाद-विवाद झाकोळुन टाकुन स्पर्धा गाजवणार्‍या व देशाची मान ताठ ठेवणार्‍या सर्व खेळाडुंचेही अभिनंदन आणि आभार ... !!! - ( आनंदित ) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

सुरेख प्रतिसाद !! डान्राव जियो !! अपशकुन करणार्‍यांचे नाक कापले गेले ते बरेच झाले त्याचबरोबर अनेक विचारवंत आपापसात टाळ्या वाजवत "आता बघा भारत काय दिवे लावतो ते !" असं खिदळत होते त्यांना सणसणीत चपराक मिळाली. (च्यायला ह्या डानरावासारखे लिहिता यायला पाहिजे. पुण्यात आलाच आहे शिकवणी लावावी म्हणतो )

In reply to by छोटा डॉन

>>अत्युच्च कामगिरी करुन सर्व वाद-विवाद झाकोळुन टाकुन स्पर्धा गाजवणार्‍या व देशाची मान ताठ ठेवणार्‍या सर्व खेळाडुंचेही अभिनंदन आणि आभार ... !!! सहमती इतपतच. ह्यावेळेस जी किंमंत देऊन हि पदके मिळवली गेली, ती पदके पुन्हा कधीतरी मिळविण्यासाठी पुन्हा तीच किंमत द्यावी लागेल का ? उगाचच विरोध म्हणून नाही, पण आपल्या म्हणण्यानुसार पण त्यापेक्षा स्पर्धा आधी यशस्वी आणि सुखरुप पार पडणे ही प्राथमिकता होती. सुरक्षेला इतके महत्व द्यावे लागले त्याच्या मागची कारणे काय ? आज सामान्य नागरिकाला ह्यातून काय मिळाले ? त्याच्या सुरक्षेचा मुद्दा कधी प्राथामिकतेवर येणार ? कधीपर्यंत हे राजकीय नेते असेच लोकांच्या देशप्रेमाचा वापर करून स्वताचे हित साधून घेणार ? १५ हजार करोड रुपयांचा वापर नक्कीच ह्या पेक्षा चांगला झाला असता, हे खेदाने म्हणावे लागेल. 'भारताच्या खुद्द पंतप्रधांना देखील आज स्वातंत्र्याच्या दिवशी कडेकोट बुलेट फ्रुफ काचेतून भाषण द्यावे लागते'. तिथे एका सामान्य माणसाची काय गत ? खेळाडूंची कामगिरी जरी चांगली झालेली असली तरी हा सौदा भारताला खूप महागात पडला आहे. अवांतर : परदेशातल्या बर्याच खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणावरून माघार घेतली, पण एकही भारतीय / परदेशी खेळाडूंनी हा खेळ म्हणजे पैशाच्या अपव्यय आहे, इथे भ्रष्टाचाराचा वास येत आहे म्हणून माघार घेतली नाही. ज्याला त्याला ज्याचा त्याचा जीव आणि खेळ प्यारा. धन्य ते खेळाडू, आणि धन्य त्यांचा तो खेळ, आणि धन्य तो महान(लाखो लोक उपाशी असताना करोडोची उधळण करणारा ) देश. ज्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवून दिले ते ह्याच कारणासाठी का ? माझे स्पष्ट मत आहे कि, जो पर्यंत भारतात एक सुद्धा उपाशी माणूस शिल्लक आहे तो पर्यंत हे खेळ, करमणुकीचे सर्व प्रकार बंद व्हायला हवेत.

In reply to by गांधीवादी

>> ह्यावेळेस जी किंमंत देऊन हि पदके मिळवली गेली, ती पदके पुन्हा कधीतरी मिळविण्यासाठी पुन्हा तीच किंमत द्यावी लागेल का ? कसली किंमत ? आपण आयोजनात पैसे ओतले म्हणुन आपल्याला पदके मिळाली असे तुम्हाला म्हणायचे आहे का ? तसे असल्यास मी ह्या विधानाचा निषेध करु इच्छितो, आपण पदकांसाठी खेळाडुंनी केलेल्या कष्टाचा आणि त्यांच्या प्रतिभेचा अपमान करत आहात. >>उगाचच विरोध म्हणून नाही, तसे नसल्यासच उत्तम !!! >> पण आपल्या म्हणण्यानुसार पण त्यापेक्षा स्पर्धा आधी यशस्वी आणि सुखरुप पार पडणे ही प्राथमिकता होती. हो, अगदी बरोबर. आपले निरिक्षण अगदी अचुक आहे. >>सुरक्षेला इतके महत्व द्यावे लागले त्याच्या मागची कारणे काय ? म्हण्जे काय ? जीवाच्या सुरक्षेपेक्षा अजुन काय महत्वाचे असते मालक ? समजा एखाद्या परदेशी खेळाडुला इजा झाली किंवा दुर्दैवाने त्याचा जीव गेला तर त्याचे काय परिणाम भारताला मोजायला लागतील ह्याची आपल्याला कल्पना आहे काय ? ह्या म्मुद्द्यावर एक सेप्रेट लेख लिहता येईल पण काही न लिहता "सुरक्षा" हा मुद्दा प्रत्येकालाच समजु शकतो असे वाटते. गरज असेल तर एक मोठ्ठा व्यनी पाठवु तुम्हाला, इथे विषयांतर नको. >>आज सामान्य नागरिकाला ह्यातून काय मिळाले ? आज भारताची मान ताठ झाली व आपल्यात असे मोठ्ठे इव्हेंट आयोजित करण्याची ताकद आणि पात्रता आहे हे आपण जगासमोर सिद्ध केले ह्यापेक्षा अजुन वेगळे काय हवे आहे सामान्य नागरिकाला ? प्रत्येकाला वैयक्तिक किंवा किमान घरटी असे मिळायला ही काय निवडणुक आहे की वार्षिक बजेट ? दक्षिण आफ्रिकेतल्या फुटबॉल विश्वचषकानंतर तिथल्या सामान्य नागरिकांवर वर काय सोन्याचा पाऊस पडला का ? की पुढ्च्या वर्षी आपल्या इथे होणार्‍या क्रिकेट वर्ल्डकपनंतर तसे होणार आहे ? आणि नाही मिळाले असे तुम्हाला कोण म्हणाले ? इतक्या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी जे मनुष्यबळ लागले ते काय इंपोर्तेड होते की टाटा, बिर्ला , अंबानी होते. सामान्य माणसालाच रोजगार मिळाला ना, भले तो कमी का असेना. ह्या स्पर्धेमुळे नवे रोजगार निर्माण झाले व अनेक सुविधा तयार झाल्या त्या सामान्य माणसासाठी नव्हत्या काय ? >>त्याच्या सुरक्षेचा मुद्दा कधी प्राथामिकतेवर येणार ? मला नाही समजले, जाऊ देत. सुरक्षा दुय्यम आहे असा जीव पृथ्वीवर अस्तित्वात आहे ह्यावर माझा विश्वास नाही. >>कधीपर्यंत हे राजकीय नेते असेच लोकांच्या देशप्रेमाचा वापर करून स्वताचे हित साधून घेणार ? टिपीकल वाक्य आहे टाळ्या घेणारे, अर्थात १००% चुकही नाही. अहो पण हे असे वारंवार बोलुन आपण काम करणेच बंद करणार का ? स्पर्धा नाही, कारण काय तर नेते पैसे खातात. विकासकामे नाहीत, कारण काय तर नेते पैसे खातात. नवे रोजगार नाहीत, कारण काय तर नेते पैसे खातात. बास करा राव, खाऊ द्यत पैसे पण कामं होऊद्यात हे धोरणं ठेवा की अगदी अपवाद म्हणुन. >>१५ हजार करोड रुपयांचा वापर नक्कीच ह्या पेक्षा चांगला झाला असता, हे खेदाने म्हणावे लागेल. म्हणजे कसा ? ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट करावी, उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नये. तसे म्हटले तर तुम्ही आणि मी जो हा टाईमपास इइथे इंटरनेटरवर करतो आहे त्या वेळेचा आणि इह्यात गुंतलेल्या पैशाचा वापर नक्कीच ह्यापेक्षा चांगला होऊ शकतो, काय म्हणता ? >>'भारताच्या खुद्द पंतप्रधांना देखील आज स्वातंत्र्याच्या दिवशी कडेकोट बुलेट फ्रुफ काचेतून भाषण द्यावे लागते'. तिथे एका सामान्य माणसाची काय गत ? वर उत्तर दिले आहे, ह्याला "अभिनिवेष" म्हणतात, बाकी असो. बाकी भारत सोडुन देशाचे पंतप्रधान सुरक्षेविना टपरीवर सिगारेट पित उभे असतात किंवा रस्त्यावर उगाच हिंडत असतात ह्याची मला खरोखर कल्पना नव्हती. >>खेळाडूंची कामगिरी जरी चांगली झालेली असली तरी हा सौदा भारताला खूप महागात पडला आहे. कसला सौदा ? >>अवांतर : परदेशातल्या बर्याच खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणावरून माघार घेतली, पण एकही भारतीय / परदेशी खेळाडूंनी हा खेळ म्हणजे पैशाच्या अपव्यय आहे, इथे भ्रष्टाचाराचा वास येत आहे म्हणून माघार घेतली नाही. म्हणणे पटते आहे पण मान्य होत नाही. कदाचित देशासाठी खेळुन पदक मिळवणे हे जास्त महत्वाचे वाटले असेल. >>ज्याला त्याला ज्याचा त्याचा जीव आणि खेळ प्यारा. ह्यात मी खेळ = देश अशी दुरुस्ती सुचवतो, देशासाठी काहीही चालते, खेळ तर क्षुल्लक आहे. >>आणि धन्य तो महान(लाखो लोक उपाशी असताना करोडोची उधळण करणारा ) देश. हे पटत नाही, लोक उपाशी आहेत म्हणुन का स्पर्धा घ्यायच्या नाहीत. बाकी वर लिहलेच आहे. लोक उपाशी आहेत म्हणुन स्पर्धा न घेणे, विकासकामे थांबवणे, नव्या योजना रद्द करणे हा योग्य उपाय नसुन शुद्ध मुर्खपणा आहे. शिवाय ह्या भिन्न पातळीवरच्या बाबींची तुलना करायची माझी इच्छा नाही. >>माझे स्पष्ट मत आहे कि, जो पर्यंत भारतात एक सुद्धा उपाशी माणूस शिल्लक आहे तो पर्यंत हे खेळ, करमणुकीचे सर्व प्रकार बंद व्हायला हवेत. करेक्ट ! आपण सध्या आंतरजालावर जो वाद घालतो आहोत तो ह्या उपाशी माणसाच्या दॄष्टीने "करमणुक / खेळ" आहे, त्याच्यासाठी अन्न महत्वाचे, इंटरनेट की कपडे, घर आणि इतर अनेक बाबींनंतरची "लक्झरी", करेक्ट ? मग करताय का उद्यापासुन "इंटरनेट आणि आंतरजालाचा वापर" बंद ? बघा, भारतात "लाखो उपाशी लोक" आहेत. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

ह्यावेळेस जी किंमंत देऊन हि पदके मिळवली गेली, ती पदके पुन्हा कधीतरी मिळविण्यासाठी पुन्हा तीच किंमत द्यावी लागेल का ? कसली किंमत ? आपण आयोजनात पैसे ओतले म्हणुन आपल्याला पदके मिळाली असे तुम्हाला म्हणायचे आहे का ? तसे असल्यास मी ह्या विधानाचा निषेध करु इच्छितो, आपण पदकांसाठी खेळाडुंनी केलेल्या कष्टाचा आणि त्यांच्या प्रतिभेचा अपमान करत आहात.
त्यांना वासरात लंगडी गाय शहाणी असे म्हणायचे असावे.

In reply to by छोटा डॉन

>>आपण आयोजनात पैसे ओतले म्हणुन आपल्याला पदके मिळाली असे तुम्हाला म्हणायचे आहे का ? मला असे काहीही म्हणायचे नाही. भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दल अभिमान आहे. पण आयोजन ज्या पद्धतीने झाले त्याबद्दल खचितच नाही. >>सुरक्षेला इतके महत्व द्यावे लागले त्याच्या मागची कारणे काय ? म्हण्जे काय ? जीवाच्या सुरक्षेपेक्षा अजुन काय महत्वाचे असते मालक ? आपल्याला माझा प्रश्न नीट समजलेला नाही. जीवाची सुरक्षा सर्वात जास्त महत्वाची हे मान्य, पण हा मुद्दा जितका ऐरणीवर आला होता, त्याच्या मागे काय कारणे होती, आणि ती कारणे कधी संपणार ? अ) मी माझ्या मुलांना निर्धोक पणे सारस बागेत खेळायला घेऊन जाऊ शकतो , ब) मी माझ्या मुलांना सुरक्षेच्या कारणास्तव ४-५ अंग रक्षकान समवेतच कुठेतरी जाऊ शकतो. यातील कुठली सुरक्षा तुम्हाला महत्वाची वाटते ? आज भारताची मान ताठ झाली व आपल्यात असे मोठ्ठे इव्हेंट आयोजित करण्याची ताकद आणि पात्रता आहे हे आपण जगासमोर सिद्ध केले ह्यापेक्षा अजुन वेगळे काय हवे आहे सामान्य नागरिकाला ? प्रत्येकाला वैयक्तिक किंवा किमान घरटी असे मिळायला ही काय निवडणुक आहे की वार्षिक बजेट ? दक्षिण आफ्रिकेतल्या फुटबॉल विश्वचषकानंतर तिथल्या सामान्य नागरिकांवर वर काय सोन्याचा पाऊस पडला का ? की पुढ्च्या वर्षी आपल्या इथे होणार्‍या क्रिकेट वर्ल्डकपनंतर तसे होणार आहे ? आयोजनाचे जगभर उडालेले धिंडवडे बघून सुद्धा हे असे वाटते ह्याचेच नवल वाटते, ह्यापुढे CWG पुन्हा भारतात होईल का अशी शंका येते. झाल्यास प्रत्येक सहभागी देशाला किती लाच देऊन होईल ? हाच प्रश्न सगळे विचारणार. जगासमोर तुम्ही लाख सिद्ध करा हो, पण इथला माणूस समाधानी नाही तर काय करायचे आहे ते जगाचे प्रशस्तीपत्रक ? प्रत्येकाला वैयक्तिक कोण मागत नाहीये, पण शहरातील किमान नागरी सुविधा तरी द्या. म्हणजे कसा ? ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट करावी, उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नये. तसे म्हटले तर तुम्ही आणि मी जो हा टाईमपास इइथे इंटरनेटरवर करतो आहे त्या वेळेचा आणि इह्यात गुंतलेल्या पैशाचा वापर नक्कीच ह्यापेक्षा चांगला होऊ शकतो, काय म्हणता ? जास्त सांगू शकत नाही, पण निदान रस्ते जरी सुधरवले असते तरी ते सुद्धा खूप होते. टाईमपास कदाचित आपण करत असाल(मला असे म्हणायचे नाही, पण केवळ आपल्या प्रतिसादात आहे म्हणून), मी आपली रोजची नित्य कर्मे करूनच इथे इंटरनेटरवर येतो. त्यामुळे हा सल्ला मला तरी गैरलागू. आणि हो जिथे गरज असते तिथे तव्हा तेव्हा आम्ही हजर असतोच, आणि ते इथे मांडतोच, आणि इथे जे काही चांगले शिकतो ते सुद्धा बाहेर पसरवितोच. कसला सौदा ? १५ हजार करोड उधळून मन बळेच ताठ करून घेण्याचा. >> कदाचित देशासाठी खेळुन पदक मिळवणे हे जास्त महत्वाचे वाटले असेल. देशासाठी खेळणे महत्वाचे कि देशाच्या आत्मसम्मान जपणे महत्वाचे ? उद्या मला चोरी करून एखाद्या जलतरण तलावात जाण्याची इच्छा झाली तर मी काय करावे ? (आज माझी ऐपत नाही म्हणून मी तिथे जात नाही.) >>ज्याला त्याला ज्याचा त्याचा जीव आणि खेळ प्यारा. >>ह्यात मी खेळ = देश अशी दुरुस्ती सुचवतो, देशासाठी काहीही चालते, खेळ तर क्षुल्लक आहे. नाही, मला जे म्हणायचे आहे तेच म्हणायचे आहे. ज्याला त्याला ज्याचा त्याचा जीव आणि खेळ प्यारा. म्हणूनच हा खेळाचा आणि माघार घेण्याचा पसारा. हे पटत नाही, लोक उपाशी आहेत म्हणुन का स्पर्धा घ्यायच्या नाहीत. बाकी वर लिहलेच आहे. लोक उपाशी आहेत म्हणुन स्पर्धा न घेणे, विकासकामे थांबवणे, नव्या योजना रद्द करणे हा योग्य उपाय नसुन शुद्ध मुर्खपणा आहे. हो नाही घ्यायच्या. आपल्या घरात एक व्यक्ती उपाशी असताना आपण सिनेमा / खेळ बघायला जातो का ? (इथे आपले वैयक्तिक उत्तर अपेक्षित आहे, पण आपण राग मानून घेऊन नये हि विनंती.) आठवा एक प्रतिज्ञा "सारे भारतीय माझे बंधू भगिनी आहेत". कि गेले विसरून ? आपण सध्या आंतरजालावर जो वाद घालतो आहोत तो ह्या उपाशी माणसाच्या दॄष्टीने "करमणुक / खेळ" आहे, त्याच्यासाठी अन्न महत्वाचे, इंटरनेट की कपडे, घर आणि इतर अनेक बाबींनंतरची "लक्झरी", करेक्ट ? मी इथे करमणूक करून घ्यायला येत नाही. माझे मागील काही लेख/प्रतिसाद आपण वाचा. भले त्यात हजारो मतभेद असतील मान्य आहे , पण ते मनोरंजनात्मक नक्कीच नाहीत. मी इथे येतो नित्यनियमाने शिकायला, समाजकारण समजून घायला. इथली चांगली मते मी बाहेर प्रसारित करतो, आणि तिथली परिस्थिती इथे मांडतो. माझ्यासाठी हा एक यज्ञ आहे. मग करताय का उद्यापासुन "इंटरनेट आणि आंतरजालाचा वापर" बंद ? बघा, भारतात "लाखो उपाशी लोक" आहेत. भाऊ, 'उपाशी राहणे म्हणजे नक्की काय असते' हे खूप जवळून बघितलेले आहे. आम्हाला जोड्याने मारा, पण त्यांचा असा उपहास करू नका. हि विनंती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

राहणार आहे थोडेच............. खरतर अजुन प्रतिक्रिया संपादन करायला हवी होती. लाच देवुन खेळायला इतर देशाना बोलावले होते किंवा सुरक्षा इतकी कशासाठी किंवा १५००० कोटी खर्चुन खेळ कशासाठी इत्यादी मुद्दे हास्यास्पद आहेत.

In reply to by वेताळ

लाच देवुन खेळायला इतर देशाना बोलावले होते >>किंवा सुरक्षा इतकी कशासाठी सुरक्षा असायलाच हवी, पण दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. इतकी अवाजवी सुरक्षा घेण्याची गरज का पडते आहे ? रोग हा मुळापासून नाहीसा झाला पाहिजे कि नुसते पेन किलर घेऊन दिवस काढायचे ? किंवा १५००० कोटी खर्चुन खेळ कशासाठी दुसर्या देशांपुढे बळेच मान ताठ करण्यासाठी.

In reply to by गांधीवादी

हे पटत नाही, लोक उपाशी आहेत म्हणुन का स्पर्धा घ्यायच्या नाहीत. बाकी वर लिहलेच आहे. लोक उपाशी आहेत म्हणुन स्पर्धा न घेणे, विकासकामे थांबवणे, नव्या योजना रद्द करणे हा योग्य उपाय नसुन शुद्ध मुर्खपणा आहे. हो नाही घ्यायच्या. आपल्या घरात एक व्यक्ती उपाशी असताना आपण सिनेमा / खेळ बघायला जातो का ? (इथे आपले वैयक्तिक उत्तर अपेक्षित आहे, पण आपण राग मानून घेऊन नये हि विनंती.) आठवा एक प्रतिज्ञा "सारे भारतीय माझे बंधू भगिनी आहेत". कि गेले विसरून ? विकासकामे थांबवणे, नव्या योजना रद्द करणे असे मी म्हणालो नाही. माझा मुद्दा केवळ खेळ घेणे/न घेणे.

In reply to by वेताळ

अन्नधान्यांची महागाई १६.३७ टक्‍क्‍यांवर महासत्तेचे स्वप्न उशाशी, भारत झोपतो उपाशी भारतामधील भुकेल्या पोटांचे वास्तव दाखविणारी ही आकडेवारी तथाकथित 'महासत्ते'च्या स्वप्नापुढे प्रश्‍नचिन्ह उभे करणारी आहे- १) भारतातील पाच वर्षांखालील मुलांपैकी ४३.५ टक्के बालकं कमी वजनाची आहेत. जगातील पाच वर्षांखालील कमी वजनाच्या बालकांपैकी तब्बल ४२ टक्के मुलं भारतात आहेत. २) जगातील कमी उंचीच्या बालकांपैकी ३१ टक्के भारतात आहेत. ३) भारतातील २२ टक्के लोकसंख्या कुपोषित आहे.

In reply to by गांधीवादी

मग गांधीबाबा आपण प्रत्येक उपासी भागात एक एक तिरुपती व साईबाबांचे मंदीर काढुया व मोफत अन्नछत्रे चालवुया. म्हणजे उपासमारी राहणार नाही.

In reply to by वेताळ

ही परिस्थिती होती १९९९-२००१ मध्ये तीत +ve सुधारणा झाली आहे असे म्हणायचे आहे का वेताळा? http://www.fao.org/docrep/006/j0083e/j0083e03.htm

In reply to by गणपा

CWG च्या झगमगीत आवाजात दाबला गेलेला कुपोषित बालकांचा टाहो भाकरीचा चंद्र शोधण्यास जगातील 92 कोटी 50 लाख लोकांचे आयुष्य नुसतेच खर्ची पडत असेल, तर हा नरदेह सत्कारणी न लागता जन्माला आला आणि टिचभर पोटासाठी जिंदगी खर्चून गेला, अशीच वंचना अनेकांच्या वाट्याला येत आहे. महासत्तेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या भारतात लाखो मुले उपाशी राहत असतील तर सर्वंकष प्रगतीचे केवळ एकतर्फी स्वप्नरंजन होईल.

In reply to by गांधीवादी

एक शंका गांधीवादी = मणिशंकर अय्यर? कॉमनवेल्थ खेळांचा काहीच फायदा नाही आणि ते आयोजित करायलाच नको होते असे अय्यर याम्चेही मत आहे. एक प्रश्नः कॉमनवेल्थ खेळ चालू नव्हते (किंवा त्यांची चर्चा चालू नव्हती) तेव्हा गांधीवादी यांना त्या कुपोषित बालकाम्चा आवाज मोठ्ठ्याने ऐकू येत होता का?

In reply to by गांधीवादी

रा. रा. श्री. छोटा डॉन यांनी तुमच्या सगळ्या आक्षेपांचे सुयोग्य खंडन केलेले आहे. तुम्ही निष्कारण वाद चिवडत आहात. चीड यावी अशा पद्धतीची विधाने तुम्ही केली आहेत. प्रत्येकाला वैयक्तिक कोण मागत नाहीये, पण शहरातील किमान नागरी सुविधा तरी द्या. हा मुद्दा इथे गैरलागू आहे. कॉमनवेल्थ, ऑलिंपिक अशा खेळांमध्ये मिळालेले यश-अपयश ही देशाच्या प्रतिष्ठेशी निगडीत असणारी गोष्ट आहे. मी इथे येतो नित्यनियमाने शिकायला, समाजकारण समजून घायला. इथली चांगली मते मी बाहेर प्रसारित करतो, आणि तिथली परिस्थिती इथे मांडतो. माझ्यासाठी हा एक यज्ञ आहे. शिकणे, समाजकारण समजून घेणे या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात पण खेळ, कला इत्यादी गोष्टी तुम्हाला तुच्छ वाटतात काय? आणि तुम्ही जे शिकता आणि काय समजून घेता त्या ज्ञानाचा तुम्ही जगाला काय फायदा करुन दिला आहे? तुमचे हे शिकणे, समजून घेणे वांझ आहे असे आम्हीदेखील का म्हणू नये? हे लक्षात ठेवा की लोकांच्या अपेक्षांचे ओझे घेउन मैदानात उतरणे आणि मैदान गाजवणे ही फार अवघड गोष्ट आहे. प्रेक्षकांचा प्रचंड आरडाओरडा,गोंगाट चालू असताना तुम्ही कधी एखादी स्थानिक स्पर्धा जरी खेळला असाल तर या गोष्टीचा तुम्हाला प्रत्यय येईल. हे मी स्वानुभवावरुन सांगतो आहे. मिपावर चार-दोन फुटकळ,टिनपाट प्रतिक्रिया देण्याइतके ते सोपे नाही. अनेक वर्षे घेतलेली मेहनत, पेशन्स, फिटनेस, तंत्र, डावपेच अशा असंख्य गुणांची कसोटी पाहणारी ती परीक्षा असते. आणि भारतासारख्या देशात जिथे खेळांची उपेक्षा होते, गरीबी लोकांच्या पाचवीला पूजलेली आहे, खेळांसाठी कुपोषित असे वातावरण आहे अशा परिस्थितीत स्वतःला उत्कॄष्ट खेळाडू म्हणून घडवणे हे शिवधनुष्य उचलण्याइतके अवघड आहे. तुम्ही स्वतःला विचारवंत, विचारप्रसारक, यज्ञकर्मी वगैरे म्हणवता आहात तर त्या क्षेत्रात तरी तुम्ही असे काय दिवे लावले आहेत ? तुमचा एखादा तरी ग्रंथ तर जाउच द्या एखादी लहानशी पुस्तिका तरी प्रसिद्ध झाली आहे का? भाऊ, 'उपाशी राहणे म्हणजे नक्की काय असते' हे खूप जवळून बघितलेले आहे. तुम्ही उपाशी राहणे म्हणजे काय असते हे जवळून पाहिलेले आहे. असेल आणि त्यासाठी सहानुभूती आहे पण या गोष्टीचे तुम्ही अशा पद्धतीने भांडवल करावे ही खेदाची गोष्ट आहे. हो नाही घ्यायच्या. आपल्या घरात एक व्यक्ती उपाशी असताना आपण सिनेमा / खेळ बघायला जातो का ? तुम्ही एका व्यक्तीच्या गोष्टी करताहात. भारतात कुटुंबेच्या कुटुंबे रोजच्या रोज उपाशी झोपत असतात. ही माणसे सिनेमाच पाहात नाहीत, मॅचेसच पाहात नाहीत असं तुम्हाला म्हणायचं नाही ना? ज्या गोष्टीं पाहिल्यानंतर जगातली म्लान वदने प्रफुल्लित होतात, ज्या घटनांमुळे असंख्य दु:खी लोकांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण निर्माण होतात त्या घटना पाहून तुमचा पोटशूळ उठतो असं दिसतंय. १५ हजार करोड उधळून मन बळेच ताठ करून घेण्याचा. जगण्यासाठी पैसे पडतात म्हणून माणसाने मरुन जावे असे म्हणण्यासारखे हे विधान आहे. आपल्या आजूबाजूला वाईट घटनांबरोबरच चांगल्या घटनाही घडत असतात पण काकदॄष्टीने पाहात राहिलात तर सगळे वाईट्च तुम्हाला आजूबाजूला दिसेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

'खेळ खेळले जाऊ नयेत' असे मी म्हणतच नाही. हा जो CWG चा मोठ्ठा खेळ 'ज्या' पद्धतीने खेळला गेला, खेळ 'त्या' पद्धतीने खेळले जाऊ नये इतकेच माझे म्हणणे होते. जर आज वेळीच निषेध नोंदवला गेला नाही तर कदाचित पुन्हा २०२० मध्ये १५ हजार काय, १५० हजार करोडाची उधळण करून खेळ होतील. CWG खेळ भरवून जर देशाची आन, बाण, शान वाढली गेली असेल तर आम्ही पण बोलतो "जय हो" लोकांच्या भावनेला हात घालून मात्र बरोबर आपले इप्सित साध्य करून घेण्याच्या, राजकारण्यांच्या ह्या प्रवृत्तीला मात्र मानले बुवा. भाऊ, 'उपाशी राहणे म्हणजे नक्की काय असते' हे खूप जवळून बघितलेले आहे. तुम्ही उपाशी राहणे म्हणजे काय असते हे जवळून पाहिलेले आहे. असेल आणि त्यासाठी सहानुभूती आहे पण या गोष्टीचे तुम्ही अशा पद्धतीने भांडवल करावे ही खेदाची गोष्ट आहे. मी ह्याचे भांडवल केलेलं नाही, ह्यावर एक उपहासात्मक प्रतिक्रिया आली, म्हणून त्याला मी उत्तर दिले. आजूबाजूला चांगल्या आणि वाईट गोष्टी दोन्ही घडत असतात हे मला मान्य आहे. जे वाईट आहे तेच सुधाराविण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणूनच तर त्याचा उहापोह करत असतो. बाकी आपणा वैयक्तिक न लिहिता जर मुद्द्यांवर लिहिले असते तर मला अजून आवडले असते. पण असो आपले मुद्दे मान्य.

In reply to by गांधीवादी

गांधीवादी यांच्याशी सहमत आहे. मूळात इव्हेंट झाल्याशिवाय राजकारण्यांना पैसे खायला मिळत नाहीत. आता ऑलिंपिकात काय होते हे बघणे गरजेचे.

In reply to by गांधीवादी

हा जो CWG चा मोठ्ठा खेळ 'ज्या' पद्धतीने खेळला गेला, खेळ 'त्या' पद्धतीने खेळले जाऊ नये इतकेच माझे म्हणणे होते. जर आज वेळीच निषेध नोंदवला गेला नाही तर कदाचित पुन्हा २०२० मध्ये १५ हजार काय, १५० हजार करोडाची उधळण करून खेळ होतील. जे आयोजन केले गेले त्याचे अ‍ॅनालिसिस करुन ख्रोखरंच इतके पैसे खर्च करणे योग्य आहे का याची छाननी करणे आवश्यक आहे असा स्टान्स असेल तर तो मान्य आहे आणि तो स्टान्स रास्तही आहे. शिवाय प्रचंड भ्रष्टाचार झाला असे जे दावे केले जात आहेत ते पडताळून दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे मत असेल तर तेही योग्यच आहे. बाकी आपणा वैयक्तिक न लिहिता जर मुद्द्यांवर लिहिले असते तर मला अजून आवडले असते. तुम्ही जी टीका केली ती निष्कारण होती असे मत होते आणि आहे. त्यामुळे वैयक्तिक टीका करणे भाग पडले. अन्यथा कोणताही आकस असण्याचा प्रश्नच येत नाही.

In reply to by छोटा डॉन

या सर्व अपमानासाठी जबाबदार आहेत कलमाडी, जयपाल रेड्डी, गिल, शीला दीक्षित वगैरे आणि भारताची लाज वाचवली आपल्या पोलीस व इतर सुरक्षादलांनी, सैन्याने व आपल्या ३८ सुवर्णपदके जिंकणार्‍या स्पर्धकांनी! असे म्हणतात कीं यशाला खूप पिताश्री असतात पण अपयश नेहमीच अनाथ असते. म्हणून जेंव्हा टीकेचा गदारोळ चालू होता तेंव्हां सगळे "तो मी नव्हेच"च्या सुरात गाऊन आपापली जबाबदारी झटकत होते पण आता यशस्वी सांगतेनंतर "मीच त्यो"चे आख्यान सुरू आहे. आधी जी टीका झाली त्यात या Organising Committee मध्ये नातेवाइकांचा भरणा करण्यात आल्याचे आरोपही झाले. तेही तपासायला हवेत. पण मुख्य मुद्दा आहे कीं या समारंभाला आधीच्या अंदाजपत्रकाच्या ११४ पट (हो 'पट', 'टक्के' नव्हे!) खर्च आला. सुमारे ६०० कोटी खर्चाच्या बजेटच्या ठिकाणी ७०,००० कोटी (७०,०००/६००=११४) खर्च कलमाडी वगैरेंनी केला. त्यातला किती पैसा 'कारणी' लागला व किती 'स्विस बँके'त गेला याचा तपास करण्यासाठी आता पंतप्रधानांनी चौकशीचा आदेश दिला आहे असे बातम्यांत ऐकले. काल पंतप्रधानांनी सर्व विजेत्या खेळाडूंना निमंत्रण दिले होते त्यात कलमाडींना (खड्यासारखे) वगळले होते असेही ऐकले. हे छान झाले. जरासे अवांतर (Pl take in a lighter vein): काल जकार्तातील 'Essar Dhananjaya' कंपनीत अंबामातेच्या देवळात आम्ही सगळे पूजेला व नंतरच्या प्रसादासाठी जमलो होतो (हा एक छान वार्षिक पायंडा इथे पाडण्यात आला आहे) त्यावेळी एकाने हा एक किस्सा ऐकवला. जपानने सार्‍या जगाला Just In Time (JIT) ची दीक्षा दिली तर भारताचा खाक्या आहे Some How In Time (SHIT)! त्यानुसार आधी कितीही गोंधळ झाला असला तरी शेवट कसा कां होईना गोड झाला

In reply to by छोटा डॉन

या सर्व अपमानासाठी जबाबदार आहेत कलमाडी, जयपाल रेड्डी, गिल, शीला दीक्षित वगैरे आणि भारताची लाज वाचवली आपल्या पोलीस व इतर सुरक्षादलांनी, सैन्याने व आपल्या ३८ सुवर्णपदके जिंकणार्‍या स्पर्धकांनी! असे म्हणतात कीं यशाला खूप पिताश्री असतात पण अपयश नेहमीच अनाथ असते. म्हणून जेंव्हा टीकेचा गदारोळ चालू होता तेंव्हां सगळे "तो मी नव्हेच"च्या सुरात गाऊन आपापली जबाबदारी झटकत होते पण आता यशस्वी सांगतेनंतर "मीच त्यो"चे आख्यान सुरू आहे. आधी जी टीका झाली त्यात या Organising Committee मध्ये नातेवाइकांचा भरणा करण्यात आल्याचे आरोपही झाले. तेही तपासायला हवेत. पण मुख्य मुद्दा आहे कीं या समारंभाला आधीच्या अंदाजपत्रकाच्या ११४ पट (हो 'पट', 'टक्के' नव्हे!) खर्च आला. सुमारे ६०० कोटी खर्चाच्या बजेटच्या ठिकाणी ७०,००० कोटी (७०,०००/६००=११४) खर्च कलमाडी वगैरेंनी केला. त्यातला किती पैसा 'कारणी' लागला व किती 'स्विस बँके'त गेला याचा तपास करण्यासाठी आता पंतप्रधानांनी चौकशीचा आदेश दिला आहे असे बातम्यांत ऐकले. काल पंतप्रधानांनी सर्व विजेत्या खेळाडूंना निमंत्रण दिले होते त्यात कलमाडींना (खड्यासारखे) वगळले होते असेही ऐकले. हे छान झाले. जरासे अवांतर (Pl take in a lighter vein): काल जकार्तातील 'Essar Dhananjaya' कंपनीत अंबामातेच्या देवळात आम्ही सगळे पूजेला व नंतरच्या प्रसादासाठी जमलो होतो (हा एक छान वार्षिक पायंडा इथे पाडण्यात आला आहे) त्यावेळी एकाने हा एक किस्सा ऐकवला. जपानने सार्‍या जगाला Just In Time (JIT) ची दीक्षा दिली तर भारताचा खाक्या आहे Some How In Time! त्यानुसार आधी कितीही गोंधळ झाला असला तरी शेवट कसा कां होईना गोड झाला

In reply to by नितिन थत्ते

१,१५०,०००,०००* लोकात मिळुन येवढीच ? आंतरजालावर भरवा म्हणाव राष्ट्रकुल. साला येवढी पदके तर एकटा आमचा नान्या नाहितर टार्‍याच पटकावेल. *अंदाजे आधार आंतरजाल..

In reply to by परिकथेतील राजकुमार

बाकीचे तुझ्या माझ्या सारखे आंतरजालावर कुस्त्या/नेमबाजी चा नुस्ता सरावच करत असतील ;)

In reply to by गणपा

'परा नारंग' चमकून जाणार नेमबाजीत. आपल्याला ग्यारंटी आहे ना. :D बाकी परदेशी पैलवान लोकांना गणपाकडे जेवायला पाठवावे, ते जेवून इतके सुस्त होणार की त्याना चीत करायची गरजच नाही! गणपा कुस्तीत अजिंक्य!! :-) --असुर

In reply to by असुर

परा कसलेला कुस्तीगीरही आहे. परा पैलवान जालावरच्या बड्या बड्या पैलवानांचा यमदूत म्हणून प्रसिद्ध आहे. काय रे परा.

स्पर्धा अगदी मस्त झाल्या. सर्व विजेत्या व खेळात सहभागी झालेल्या सर्व देशातील खेळाडुंचे मनापासुन अभिनंदन.

In reply to by वेताळ

स्पर्धा अगदी मस्त झाल्या. सर्व विजेत्या व खेळात सहभागी झालेल्या सर्व देशातील खेळाडुंचे मनापासुन अभिनंदन. असेच म्हणतो.......! -दिलीप बिरुटे

बाकी काही असो, कॉमनवेल्थचय निमित्ताने नानाने काढलेल्या धाग्यावर डान्राव पुन्हा फार्मात आल्याचे पाहुन कॉमनवेल्थचे सार्थक झाले असे वाटले.

सर्व विजेत्या व खेळात सहभागी झालेल्या सर्व देशातील खेळाडुंचे मनापासुन अभिनंदन. अवांतर मिपाच्या CWG मधे प्रतिसाद टंकण्यासाठी खालील बक्षीसे जाहीर करत आहोत.. सुवर्ण : चोता दोन रौप्यः छोटा डॉन कांस्यः ईतरांना विभागून .. पुन्हा एकदा उपरा स्पर्धा संयोजक :)

काँग्रेसचे दिल्लीचे सरकार, आणि केंद्र सरकार, आणि पुण्यातले सरकार (कलमाडी), तिघांचेही अभिनंदन.

>>सर्व स्पर्धकांचे, आयोजकांचे, भारताचे आणि पर्यायाने आपल्या सर्वांचे अभिनंदन ! भारताचा तिरंगा असाच दिमाखात फडकत राहो ही सदिच्छा !! हेच बोलतो :)

झाल्या वाटतं त्या स्पर्धा .... काही कुठे फरशी, भिन्त, पूल पडलं नाही, कोणी धडपडलं नाही बरं झालं बुवा... आता यशस्वी स्पर्धा झाल्यामुळे कोणीही आता ढिसाळ आयोजन आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलणारच नाहीए.... विस्रा विस्रा विस्रा... आता ऑलिम्पिकसाठी टॉयलेट पेपरची एजन्सी कशी मिळवता ये ईल ते बघा...

मी इतके दिवस त्या 'स्लम कुत्रा करोडपती'. ह्या सिनेमाचे देखील अभिनंदन केलेले नव्हते. जाऊदे CWG च्या निमित्ताने आज करून टाकतो. 'स्लम कुत्रा करोडपती' ह्या सिनेमामुळे जगभर देशाचे जे नाव झाले, देशाला जी वाहवाही मिळाली आणि बक्षिसे मिळाली त्याबद्दल त्या निर्मात्यांचे अभिनंदन. शेवटी कलाकार/खेळाडू म्हणजे काय माणूसच कि हो. कलेची/खेळाची भक्ती करणे हेच त्याचे आद्य कर्तव्य.

झोपडी कुत्रा करोडपती हा सिनेमा सुरेश कलमाडींनी तयार केला नाही आहे.किंवा तो तयार करणारे भारतिय नव्हेत.त्यामुळे त्याचे अभिनंदन कशासाठी?

In reply to by वेताळ

>>त्यामुळे त्याचे अभिनंदन कशासाठी? अहो त्यांच्यामुळे देशाचे नाव उज्वल झाले नाही का ? 'जय हो' हे गाणे जगाच्या कानाकोपर्यात पोहोचले. मान वर नाही झाली का ? हे खेळाडू भरविणारे नेते काय आणि ते चित्रपट निर्माण करणाऱ्या लोकांना मदत करणारे भारतीय लोकं काय , एकंच ध्यास तयांना, देशाची मान ताठ ठेवणे.

पदकांच्या जल्लोषाला भ्रष्टाचाराचा डाग! भ्रष्टाचारी आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांनी एक नवीनच विचारसरणी निर्माण केली आहे. आपला दृष्टिकोन नकारात्मक झाला आहे आणि आपल्याला प्रत्येक कामात चुकाच दिसतात, ही ती नवीन विचारसरणी. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी मिळवलेले यश साजरे करायचे सोडून भ्रष्टाचाराचे रडगाणे आपण गात असल्याचे ते आता म्हणत आहेत! १०१ पदकांमुळे होणार्या जल्लोषा पुढे जनतेचा आवाज कुठे दाबला जाईल हे मात्र माहित नाही. शेवटी पांढरे दहशतवादी यांच्या बुद्दीमत्तेला आणि देशप्रेमाचे बुटुक* चाटत राहणाऱ्यांच्या वृत्तीला तोड नाही. धन्य ते, खेळ भरवून देशाची मान ताठ करणारे ! धन्य ते, मान ताठ झाल्यामुळे गर्वानी छाती फुगवून घेणारे ! ----------------------------------------------------------------------------------------------------- बुटुक म्हणजे लहान मुलांना तात्पुरते गप्प बसविण्यासाठी काहीतरी खायला दिलेला तुकडा. लहान मुलांना एकदा का बुटुक हातात दिले कि लहान मुले आनंदी होऊन गप्प चाटत राहतात आणि मोठी त्या दरम्यान कामे उरकून घेतात.