Skip to main content

प्रकटन

पुतिन बर्‍याचदा मुद्द्याचे बोलतात, आजही बोलले!

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 08/12/2010 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज रशियाचे पंतप्रधान (आणि खरेखुरे "बिग बॉस") असलेल्या पुतिनसाहेबांनी एक उत्तुंग षट्कार मारलेला आहे. वाचा इथे http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/7065924.cms (पुतिन यांचे 'दस नंबरी' निवेदन वाचून/ऐकून चिनी नेत्यांनीसुद्धा टाळ्या वाजविल्या असतील.) पुतिन यांनी या आधीही यू-ट्यूबद्वारा असाच २०-२० छाप षट्कार मारला होता. तो दुवा सापडल्यास (नंतर) पाठवून देईन.

कोअर (आणि त्यामुळे निघालेला पसारा)

लेखक यकु यांनी मंगळवार, 07/12/2010 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
२००३ साली येऊन गेलेला हॉलीवूडचा दि कोअर हा सी-फि सिनेमा नुकताच नजरेवेगळा केला. या कोअरमधूनच बराच पसारा निघाला, तोच आता इथं मांडणार आहे. कोणताही सी-फि म्हटले की त्यात डायरेक्ट पृथ्वीचाच नाश होताना पाहाणे आणि मध्येच कुणीतरी (विशेषत: व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनच्या जाली सेटवर बसलेल्या लुंग्यासुंग्यांनी, किंवा कुठल्यातरी वाळवंटात, कबाडखान्यात किंवा जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात संशोधन करणार्‍या झक्की लोकांनी) तो थांबवणे अटळ असते. या सिनेमातही हेच होते; एकापेक्षा एक छप्परफाड (खरं म्हणजे पृथ्वीफाड, आकाशफाड किंवा ग्रहगोल-तारे-आकाशगंगा-विश्व-फाड असं म्हणायला हवं) कल्पना यात अगदी ठासून भरलेल्या आहेत.

अंधार मिठी

लेखक sneharani यांनी मंगळवार, 07/12/2010 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिम पाण्याच्या संगीतासारखं चाललेलं माझं जीवन असं अचानक अंधारानं मिठी मारल्यासारखं का झालयं? काही कळेनास झालयं..!सुखामगं दु:ख अन् दु:खामागं सुख येतं असं म्हणतात पण ह्या सुखदु:खाच्या अष्टौप्रहर खेळात दु:खाचाच खेळ जास्त वेळ चालतोय्..असं किती दिवस चालणार आहे? का आज माझी सखी मला सोडून जाणार आहे म्हणून मनाची घालमेल चाललीये. खोलवर रुजलेला दु:खाचा काटा आज परत त्याच दुखण्याची अनुभुती देणार आहे असचं वाटतय आज!दुरावा म्हणू की ताटातूट? हव्या असणार्‍या व्यक्तींशीच का होते ताटातूट...!दरवेळी विधाता का असे धक्के देत राहिलाय मला.

खरंच stupid विचार करते का मी?

लेखक गुंडोपंत यांनी सोमवार, 06/12/2010 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
ही नैराश्यावर मात करण्याची लढाई कधी संपत नाही. नैराश्याचा विषाणू निरनिराळ्या प्रकारे वेष बदलून हल्ले करत राहतो. त्यासाठी निरनिराळे डावपेच लढवत रहावे लागतात. नैराश्य हा सर्वांनाच ग्रासणारा विषय आहे. पण तरुण वयात हा विषय आलेला दिसला की... माझी एक शेंडेफळ भाची आहे. बी एस सी बायो-टेक्नॉलॉजी करून आता एम सी ए करते आहे. ही मुलगी ठरवले की करणारी आहे, असे मी पाहतो आहे. पण कधी कधी तिला निराश वाटते. नुकत्याच एका परीक्षेनंतर तिने असे विचार प्रकट केले. त्यावर मी तिला उत्तर लिहिले. हे उत्तर लिहिल्यावर मला वाटले की कदाचित यातले काही भाग सगळ्यांनाच उपयोगी पडतील म्हणून ते येथे देतो आहे.

काही तरी आठवतंय ...

लेखक टारझन यांनी सोमवार, 06/12/2010 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
आपला मेंदु किती विचित्र असतो नाही ? बरंच काही साठवलेलं असतं त्यात. पण बर्रंचसं चक्क विस्मृतीत गेलेलं असतं, अगदी धुळीने मख्ख मळलेल्या पि.एम.टी. बस सारखं. आणि कधीतरी १५ ऑगस्ट २६ जानेवारीला बस धुवावी आणि त्यावर लिहीलेली "स्वच्छ पुणे सुंदर पुणे" ची जाहिरात दिसावी तशा आपल्या स्मृती जाग्या होतात. काही गोष्टींचं आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. "अरेच्च्या, आपल्या आयुष्यात हे ही घडुन गेलं होतं ? " , "असे होतो आपण ? " , "काय बावळटपणा केला मी ? " असंच काहीसं काल घडलं. आज नवी कंपनी जॉइन करायची म्हणुन काल जरा माझ्या फायलीवरची धुळ झटकली.

प्रश्न आणि उत्तर...

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 06/12/2010 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक वाईट खोड आहे. बसमध्ये बसलेली अनेक माणसं विंडो सीट मिळाली, की कानाला ईयरफोन लावतात, आणि मस्तपैकी डुलकी काढतात. मी मात्र, खिडकी मिळाली की रस्त्यावरचा कोपरान कोपरा उगीचच न्याहाळत बसतो...

सदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे.

लेखक नीलकांत यांनी रविवार, 05/12/2010 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव सुरू होऊन तीनाहून अधिक वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक वादळे येऊन गेली. मिसळपावचे स्वरूप मोकळे ढाकळे असावे. लोकांना येथे येणे आणि लिहीने सोपे व्हावे म्हणून कमीत कमी नियम आणि बंधणे ठेवून या संकेतस्थळाची सुरूवात तात्यांनी केली होती. संकेतस्थळाच्या संपुर्ण बांधणीत मी होतो. तेव्हा पासून ते मिसळपावचे सर्व नियंत्रण सांभाळण्यापर्यंत मी मिसळपाव वाढावं आणि अधिकाधिक लोकांना ते आपलं वाटावं म्हणून प्रयत्न करत आलेलो आहे. सुरूवातीच्या काळात मी लिहायचो. मग मिसळपाववर अधिकाधिक सोई उपलब्ध करून देणे आणि नंतर सदस्यांच्या अडचणी सोडवणे यात जास्त वेळ देऊ लागलो.

सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 05/12/2010 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
वो तो है अलबेला । हजारों में अकेला ।।
सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।
हिऱ्याला पत्थर समजून दुर्लक्ष केले। ... बांसरीला लाकडाची पुंगळी समजून विर्भत्सले। ... ज्योतीला न पहाता वातीला पाहून हिणवले। ... गायकाच्या सुरेल तानेला - वा वाह तर म्हणाल,... नृत्याच्या लचकदार आदाकारीला ठेका तरी धराल,...

कुरकुरीत!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 04/12/2010 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, बघितलंत का, संजूबाबानं मान्यताला काय भेट दिलेय ती...? रोल्स रॉइस!'' चि. कुरकुरेंनी कधी नव्हे तो पेपर हातात घेतला होता आणि त्यावरून परममूज्यांना चाळवण्याची त्याला हुक्की आली होती. ""हो का? बरं!'' फार उत्सुकता दाखवणं श्री. कुरकुरेंना परवडण्यासारखं नव्हतं. ""अगं बाई, कुठला राईस? बरं झालं आठवलं. तांदूळ पार संपलेत! आणायला झालेत...अहो...'' ""अगं आई, राईस नाही. रोल्स रॉइस! अडीच-तीन कोटींची गाडी आहे ती! त्यानं मान्यताला भेट दिली, तिच्या वाढदिवसानिमित्त!'' चि. कुरकुरे चिरकला. ""तिची मान्यता आहे ना एवढ्या खर्चाला? मग आपल्याला काय करायचंय?