Skip to main content

प्रकटन

वनराणी..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 15/01/2011 03:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहिल्या प्रहरीच जाग आली. आज माझा विवाह आहे. पण मनांत कुठेतरी काहीतरी चुकतेय असंच वाटतं आहे. का? समजत नाहिये. भोरा खूप आनंदी आहे आज. किती दिवसापासून चाललं होतं आमच्या दोघांच्या घरच्यांचं. शेवटी ठरवलंच सगळ्यांनी. मला विचारलं. बेठकीत 'हो' म्हणून गेले. पण आज.. ?? आज असं वाटतंय की माझा जन्म हा विवाह करून भोरा चा संसार करण्यासाठी नाहिये. पाडित राहून, बांबूच्या वस्तू विणायच्या, जनावरं सांभाळयची, डोंगरात, अरण्यात जाऊन कंद जमवायची.. आणि भोरा ला सुखी करायचं?? मी का करू? भोरा मला आवडतो.. पण मला संसार नाहीये करायचा. संसार नाहीये करायचा की भोराशी संसार नाहीये करायचा?? नाही....

लखोबा लोखंडे हरपले!!!

लेखक निखिल देशपांडे यांनी गुरुवार, 13/01/2011 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचे निधन झाल्याची बातमी आताच टीव्हीवर पाहिली. त्यांची नाटकं प्रत्यक्ष पाहायचा अनुभव नसला तरी दूरचित्रवाणीच्या सौजन्याने 'तो मी नव्हेच' , 'अश्रूंची झाली फुले' ही नाटके पाहल्याचे आठवते.त्यांच्या लखोबा लोखंडे बद्दल म्या पामराने काय बोलावे?? तीच त्यांची ओळख ठरून गेली होती.

सबला

लेखक कवितानागेश यांनी बुधवार, 12/01/2011 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
सबला 'स्त्री आणी तिची मुक्ती' अशा विषयावर सध्या चाललेल्या चर्चा वाचून मला राहून राहून एकाच स्त्रीची आठवण होत रहातेय. माझी आजी. मी तिच्याकडून कळतनकळत खूप शिकले. हे व्यक्तीचित्र मी आदर्श म्हणून अजिबात लिहीत नाहीये. कारण कुणीच कुणासाठी 'आदर्श' असू शकते असे मला वाटत नाही. पण तरी तिच्याकडे बघताबघ्ता मला माझ्या आतल्याच खूप गोष्टी 'सापडल्या'. तिचा 'स्त्रीमुक्ती' या शब्दाला कायम विरोध होता, कारण मुक्ती म्हणजे 'डायरेक्ट मोक्ष' हाच इतकाच अर्थ तिला पटायाचा.

वडिलांचे मुलीस पत्र

लेखक कच्चा पापड पक्का पापड यांनी मंगळवार, 11/01/2011 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मुली, सगळ्या घरांना दार असतात, पण सगळीच नसतात मायेची कोठार हे शिकाशिलच तू कधी ना कधी. मात्र हे ही लक्षात ठेव की प्रत्येक उन्हात असते एक तरी शीतल सावली अन प्रत्येक काट्यावर एखाद कोमल फूल जीवघेण्या दरया असतात तसेच असतात झूलते पूल दुष्ट माणसंच्या मनातही असते दडलेले कोवळे मूल मला माहित आहे सगळ्या गोष्टी शिकवल्यात आईने तुला जमेल तेवढ पहात रहा उघड्या डोळ्यानी जग जगायचा प्रयत्न कर चौकाटी वाचून पण लक्षात ठेव पक्ष्यानाही कस वाटत घरात अधारल म्हणून तारुण्याची चव राखताना जागी राहू देत तुझ्या मनात प्रेमळ आईची ऊब. आणि वाटू दे घरादाराला तुझा आधार कृष्णांन उचललेल्या गोवर्धनाखाली उभ र

अपेक्षाच्या पालखीचे ८४ फेरे...

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 06/01/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिकीकरणाच्या 'रेट्या'ची चर्चा फार; पण प्रत्यक्षात मराठी साहित्य मात्र या 'रेट्या'ने ढिम्मदेखील हललेले नाही, या वास्तवाची कबुली खुद्द संमेलनाध्यक्षांनीच दिली; ते एक बरे झाले ! जागतिकीकरणासोबत 'माणूस' पुढे जात राहिला, मराठी 'साहित्य' मात्र तिथेच राहिले. ----- ---- ------ परीक्षेची सगळी प्रश्नपत्तिका अगोदरपासूनच समोर आहे, परीक्षेच्या तयारीलाही भरपूर वेळ मिळालेला आहे, तरीदेखील पेपर सोडवायची वेळ झाली, की कुरुक्षेत्रावरच्या अर्जुनासारखी अवस्था व्हावी, हातपाय थरथरू लागावेत, शरीराला कंप सुटावा, तोंडाला कोरड पडावी आणि सगळे शरीर शक्तिहीन होऊन जावे, अशी अवस्था यंदादेखील ठाण्यात भरलेल्या ८४ व्या साहित्

"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 05/01/2011 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली. जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला.

आल्फा मेल

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 04/01/2011 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
अँगल चे नॉमेन्केचर आल्फा,बिटा,थिटा हे मला माहीत आहे. हे आल्फा मेल म्हणजे नेमके काय असते? ह्याची व्याख्या काय? ह्या मंडळीची नेमकी दिनचर्या काय असते? ह्यांना हे नाव नेमके कशामुळे मिळते? ----------------------------------------------------------------------------------------- रोज आपल्या बायको किंवा होणार्‍या बायकोकडुन जोडे खातो, खरे खुरे किंवा शाब्दिक. आणि बिटा सारखा लाल लाल होतो तो बिटा मेल. अगदी चांदीच्या ताटात वाढुन समोरुन वाढुन आले तरी त्याचा आस्वाद न घेउ शकणारा थिटा मेल. पण हे आल्फाची व्याख्या काही माहीत नाही बॉ?