Skip to main content

प्रकटन

लेखन स्पर्धा २०१०

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 01/12/2010 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेली काही वर्षे मराठी आंतरजालाची उत्तरोत्तर प्रगती होते आहे. मराठी ब्लॉग्स, मीमराठी.नेट सारख्या मराठी सोशल नेटवर्किंग संस्थळावर अनेक मराठी जालकर नियमित लेखन करीत असतात. अनेक उत्तम ब्लॉग लेखक, लेखक मराठी आंतरजालावर प्रसिद्ध झाले आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा याबाबतची माहिती आवश्यक त्या वेगाने सर्व जालकरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवर लिहिणारे जालकर अनेक उत्तम ब्लॉग्सबाबत अनभिज्ञ असतात, तर बहुतेक ब्लॉगर हे अशा सोशल नेटवर्किंग संस्थळावर फारसे दखलपात्र लेखन न होता ते निव्वळ वेळ घालवण्याचे कट्टे असतात असे समजतात.

अनादिसिद्ध हें आघवें ... होत जात स्वभावें ...

लेखक अवलिया यांनी बुधवार, 01/12/2010 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी रिकामा वेळ सापडतो. सर्व कामं आटोपलेली असतात. पुढली कामं अवकाशाने केली तरी चालणार असतात. मस्त निवांत वेळ असतो. अशा वेळेस बसल्या बसल्या कधी एखादे गाणे गुणगुणतो, रेडीओ, सीडीप्लेअर लावतो अथवा टिव्ही लावतो. पण कधी कधी त्याचा कंटाळा येतो. मग उगाच टिवल्या बावल्या करण्यापेक्षा एखादे पुस्तक वाचत बसतो. हे तर झाले नेहमीचे. पुस्तकातही सतत डोके घालुन वाचण्याचा कंटाळा आला की एखादे जुनेच वाचलेले पुस्तक मधुन मधुन पानं उघडत नजर टाकत, त्यातल्या एखाद्या वाक्यावर विचार करत बसणे हा माझा आवडता उद्योग.

रिक्तता.... शून्य

लेखक शुचि यांनी बुधवार, 01/12/2010 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
या इंटर्व्ह्यूला मला एक प्रश्न विचारला गेला होता जो मला खूप आवडला कारण तो प्रश्न मला अतिशय "इनसाइटफुल" असा वाटला. प्रश्न हा होता की "तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये काय करता?" जसे माणसाचे मित्र त्याच्याबद्दल बरच काही सांगतात त्याचप्रमाणे एखादा माणूस त्याच्या रिकाम्या वेळेमध्ये काय करतो हे त्याच्याबद्दल खूप काही सांगून जातं असं मला वाटतं. आपण सगळेच जणं आपापला रिकामा वेळ कोणत्या ना कोणत्या कामांनी, विचारांनी भरून काढत असतो. कोणी नाना व्याप मागे लावून घेतो तर कोणी व्यसने, कोणी चांगल्या सवयी अंगी बाणवतो तर कोणी चिंता करत बसतो. नीट पहाल तर आयुष्य हाच एक रिकामा वेळ आहे.

विकीलीक्समुळे उघडकीला आलेली खळबळजनक माहिती.

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 30/11/2010 07:15 या दिवशी प्रकाशित केले.
वॉशिंग्टन - नुकत्याच विकीलीक्सवर गोपनीय कागदपत्रांच्या प्रसिद्धीमुळे अमेरिकेत खळबळ उडालेली आहे. अमेरिकेच्या गृहखात्याने या घटनेचा धिक्कार केलेला असून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा दावा केला आहे. तर विकीलीक्सच्या मते अमेरिकन सरकारने महत्त्वाच्या बातम्या गोपनीयतेची सबब सांगून जनतेपासून लपवून ठेवल्या होत्या. या एकमेकांवरच्या चिखलफेकीच्या वातावरणात त्या कागदपत्रांमधून बाहेर येणाऱ्या सत्यांमुळे अमेरिकन सरकारची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे. आमच्या वार्ताहराने या कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर एक सनसनाटी बातमी हाती लागली. ती म्हणजे ३_१४ विक्षिप्त अदिती ऊर्फ श्री. श्री. सौ. सौ.

आमचा पाव - एक गाव

लेखक यकु यांनी सोमवार, 29/11/2010 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
पावात यायचं म्हणजे हा एक ताप असतो. म्हणजे इथं आलं की लवकर परत जावं वाटत नाही. तास उलटतात, दुपार होते. डबा खाऊन होतो, चारचा चहासुध्दा होतो आणि हळूहळू दिवस कलून दिवेही झगमगू लागतात. तरी पावातले सोहळे काही संपत नाहीत. अगदी रातच्या साडेतीन वाजताही एखादा पावकरी दूरवर पसरलेल्या नदीत अगदी संथपणे होडीत बसून माशांचे जाळे उसवत असावा तसा दिसून येतो. काही लोक थांबावं की जावं? थोडावेळ थांबूच, नको, नको गेलेलंच बरं म्हणून डुबी मारतात, आणि आणखी पाचदहा मिनीटात श्वास कोंडला की पुन्हा एकदा डोकं वर काढतात!

शिक्षणाची किंमत

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 23/11/2010 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
''ए, कँटिनमधून चहा आणा रे कोणी तरी! '' दिप्या बेंबीच्या देठापासून कोकलत आपला विशाल देह चिमुकल्या कट्ट्यावर कसाबसा तोलत बसला होता. गेल्या पाच मिनिटातील त्याची ही आठवी आरोळी होती. आणि इतक्या वर्षांनीही दिप्या दि ग्रेट शिपिंग कॉर्पोरेशन डिरेक्टरकडे कोणीही ढुंकून लक्ष देत नव्हते! एवढ्या वर्षांनी कॉलेजचे जुने मित्र-मैत्रिणी भेटले की हे चालायचेच.... आणि आज तर आम्ही सगळेजण मुद्दामहून आपले कॉलेज चौदा वर्षांनीही तसेच दिसते का, ते खास पाहायला आलो होतो! समोर कॉलेजची नवी इमारत मोठ्या दिमाखात उभी होती. तिच्या जागी असणाऱ्या आधीच्या जुन्या खुणा पार बुजून गेलेल्या.

पुरस्काराचा भुलभुलैया

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 23/11/2010 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
पुरस्काराचा भुलभुलैया “स्टार माझा” तर्फे, घेण्यात आलेल्या ब्लॉग माझा-३ स्पर्धेत मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण माझेवर प्रेम व्यक्त करून अभिनंदन केलेत त्या बद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ॠणी आहे, त्याबद्दल आपले सर्वांचे खूपखूप आभार. भविष्यातही आपणाकडून असेच उदंड प्रेम मिळत राहील ही अपेक्षा. (संदर्भ :- http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669) शक्यतो कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही.

स्वैर विचार: १ कलाकार, २ चित्रपट, १ नाव

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 23/11/2010 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
CBFC कडून दिलेल्या जाणार्‍या चित्रपटाच्या प्रमाणपत्राची वैधता १० वर्षे असे माहित होते. आणि कुठे तरी ऐकल्याप्रमाणे त्या १० वर्षांत त्याच नावाचा दुसरा चित्रपट बनू शकत नाही. पण गेल्या १०-१५ वर्षांत मग तशीच नावे वापरून पुढे काहीतरी ओळ जोडण्याची प्रथा चालू झाली. असो. तो माझा आजचा विषय नाही. माझा विषय आहेत एकाच कलाकाराने काम केलेले एकाच नावाचे दोन चित्रपट. मग त्यात दहा वर्षेही गेली असतील किंवा जास्त ही. त्यातील काही नावे म्हणजे: 'संतान' - कलाकार जितेंद्र. जुना चित्रपट आला होता १९७६ मध्ये. आणि त्यानंतर १९९३ मध्ये. पहिल्या चित्रपटात जितेंद्रनेच संतान साकार केला होता.

गुंजग्रामीचे दिवस

लेखक यकु यांनी मंगळवार, 23/11/2010 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी.

आज अचानक गाठ पडे....

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 22/11/2010 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षे झाली त्याचा शोध घेणं सोडुन दिल्याला, शाळेत असताना विवेकानंद आणि काही इतर जणांची पुस्तकं वाचुन मनाचे विचार एकदम प्रग्लभ वगॆरे झाले असं वाटलं होतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा द्रुष्टिकोनच बदलला होता. त्यात भर म्हणुन पुढच्या शिक्षणासाठी गावातल्या सिद्धस्वामी मंदिराची शिष्यव्रुत्ती मिळालेली आणि त्या साठी त्यांच्याच संस्थेच्या कॊलेजात जावं लागलं. तिथल्या त्या सकाळ संध्याकाळच्या प्रार्थना,ध्यान या मुळं तर सामान्य जीवनाबद्दलचं आकर्षणच नाहीसं झालं अशी वेळ आली होती. शिक्षण संपलं आणि शेजारच्याच गावांत नोकरीवर रुजु झालो.