Skip to main content

प्रकटन

दत्तजयंतीच्या निमित्ताने...

लेखक अवलिया यांनी सोमवार, 20/12/2010 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्टिचे निरुपण माझ्या बुद्धीने देत आहे. हे निरुपण असेच असेल किंवा असावे असा आग्रह नाही. हे निरुपण तुम्ही मानावेच असाही आग्रह नाही. मानल्यास माझी हरकत नाही. या विषयावर चर्चा करण्यास माझी ना नाही.. मी त्यात भाग घेईलच असे नाही. असो. सदर निरुपण मिपावर अंधश्रध्दा फैलावणारे आहे असा संपादकांचा समज होत असल्यास सदर लेखन उडवले तरी माझी हरकत नाही. ही कथा माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज".

कहाणी बालपण हरवलेल्यांची ...

लेखक गणेशा यांनी बुधवार, 15/12/2010 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
समाजातील काही चित्रण अशीही आहेत .. तेच देतो आहे, कविता विभागात देत होतो पण ह्या कविता नाहितच कदाचीत हे आहे चित्र आपल्या आजुबाजुचे .. यातुन एका जरी मुलाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तरी छान वाटेल .. कहाणी .. १.

कामाच्या ठिकाणचे स्नेहसंबंध

लेखक शुचि यांनी बुधवार, 15/12/2010 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
केवढी गरज असते व्यक्तीला समाजाभिमुख रहाण्याची, अन्य लोकांशी निकट स्नेहसंबंध वृद्धींगत करण्याची. आपण जेव्हा गप्पा मारतो, मन उघडं करतो तेव्हा, कोणीतरी आपलं बोलणं सहानुभूतीपूर्वक ऐकावं असं आपल्याला वाटतं. कोणाबरोबर तरी विचारांची देवाण्-घेवाण व्हावी, वादविवाद व्हावेत आणि विरंगुळ्याचे ४ क्षण आपल्या वाट्याला यावेत , आपल्या बरोबर समोरच्या व्यक्तीचादेखील विकास व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा असते. तीच गोष्ट भेटवस्तूंची.

एक नवा घोर

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 14/12/2010 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी - हातकणंगले तालुक्यातल्या मौजे रांजणवाडी बुद्रुक मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. म्हणजे घटनाच आहे, पण सत्य आहे. किंवा सत्यच आहे, पण घटना आहे. ______ काही दिवसांपूर्वी रांजणवाडी बुद्रुकमध्ये ग्रामसभा होती. या सभेमध्ये सकाळच्या पारी गावाबाहेर 'बसायला' जाणार्‍या ग्रामस्थांना आणि त्यांच्या मुलांना सरपंचानी आमंत्रित केले होते. हेतू हा होता की सरकारच्या नव्या नियमांची या लोकांना माहिती द्यावी आणि लोकांना घरोघरी बांधकामासाठी प्रोत्साहित करावे. पण झाले भलतेच. या सरपंचांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला.

एक नवी काळजी

लेखक शुचि यांनी सोमवार, 13/12/2010 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी - माझी मुलगी पुढील वर्षी मिडल स्कूल मध्ये जाणार आहे. म्हणजे आताची शाळा बदलून मोठ्या शाळेत प्रवेश करणार आहे. ______ काही दिवसांपूर्वी मुलीच्या शाळेमध्ये पालकांची सभा होती. या सभेमध्ये ही मुलं ज्या "मिडल स्कूल" मध्ये जाणार , त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना आमंत्रीत केले होते. हेतू हा होता की मुख्याध्यापकांनी "मिडल स्कूल" ची माहिती द्यावी आणि पालकांना प्रोत्साहित करावे. पण झाले भलतेच. या मुख्याध्यापकांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला. त्यांनी भाषणात सांगितले की - आमच्या शाळेत चाकू/सुरे सापडण्याच्या ज्या घटना घडतात, त्यामधील हत्यारे अतिशय लहान असतात. तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही.

आज ओंजळित...

लेखक ज्ञानराम यांनी सोमवार, 13/12/2010 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज ओंजळित... फुले अचानक पडली....... पडताच ओंळित... हलकेच मग रडली विचारण्या आधिच... मिट्ल्या पाकळया त्यांनी.. कोमेजली तरीही ... गंध देऊन नीजलि.......... आज चंदनाचे.... खोड मज दिसले.... मज पाहुनिया उगाच... मनी अलगद ह्सले..... विचारण्या आधिच... झिजुन गेले सारे.... झिजता झिजता... त्याने... दिले सुगंध सारे...... आज पावसाचे.... थेंब मजला भेट्ले.. वाटेत चालताना... डोळ्यात सारे दाटले.... विचारण्या आधिच... भिजवले डोळे त्यांनी.... पण,,,,,, भिजल्या डोळ्यांनि तेव्हा काहिच नाहि वाट्ले...........

"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-परिचय-प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती-भाग १

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 10/12/2010 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-"परिचय"-प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती-भाग १ मूळ लेखकः श्री पवनकुमार वर्मा अनुवादकः सुधीर काळे © मूळ लेखकाच्या वतीने: सुधीर काळे (या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत) "भारतीय असणे म्हणजे काय?" याबाबत एक नवे आणि आणि अगदी 'सोळा आणे' वेगळे संशोधन करणे हाच हे पुस्तक लिहिण्यामागचा मूळ उद्देश आहे! असे संशोधन फक्त भारतासाठीच नव्हे तर सार्‍या जगाच्या बाबतीतही समर्पक आणि प्रसंगोचित आहे.

" ने मजसी ने परत मातृ भूमीला " या गीताला १०१ वर्ष पूर्ण

लेखक चिंतामणी यांनी गुरुवार, 09/12/2010 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या १० डिसेंबर २०१० स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी ब्रायटन च्या समुद्र किनार्यावर १० डिसेंबर १९०९ साली लिहिलेल्या " ने मजसी ने परत मातृ भूमीला सागरा प्राण तळमळला" या गीताला १०१ वर्ष पूर्ण होत आहेत. ज्यांच्या आथक परिश्रमामुळे देशाला स्वातंत्र मिळाल. मरे पर्यंत देशाचीच सेवा करणार्या, आश्या या महान क्रांतीकारकाला विनम्र अभिवादन.