मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोअर (आणि त्यामुळे निघालेला पसारा)

यकु · · जनातलं, मनातलं
२००३ साली येऊन गेलेला हॉलीवूडचा दि कोअर हा सी-फि सिनेमा नुकताच नजरेवेगळा केला. या कोअरमधूनच बराच पसारा निघाला, तोच आता इथं मांडणार आहे. कोणताही सी-फि म्हटले की त्यात डायरेक्ट पृथ्वीचाच नाश होताना पाहाणे आणि मध्येच कुणीतरी (विशेषत: व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनच्या जाली सेटवर बसलेल्या लुंग्यासुंग्यांनी, किंवा कुठल्यातरी वाळवंटात, कबाडखान्यात किंवा जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात संशोधन करणार्‍या झक्की लोकांनी) तो थांबवणे अटळ असते. या सिनेमातही हेच होते; एकापेक्षा एक छप्परफाड (खरं म्हणजे पृथ्वीफाड, आकाशफाड किंवा ग्रहगोल-तारे-आकाशगंगा-विश्व-फाड असं म्हणायला हवं) कल्पना यात अगदी ठासून भरलेल्या आहेत. तर बाकी चर्चा करण्याआधी या सिनेमाची स्टोरीलाईन खेचून घेऊ.
थोडक्यात कथा अशी की पृथ्वीचा आतला गाभा आणि त्याच्यावर असलेला तप्तरस, लाव्हारस किंवा ते जे काय असेल ते अचानक फिरणे बंद होते. का? अर्थातच अमेरिका नावाच्या महाभयानक डोकेबाजी करणार्‍या देशाने कामाला लावलेल्या संशोधकामुळे. सिनेमात हे थोडसं पुसटपणेच सूचीत केलंय; पण केलंय. झिमिन्स्की नावाचा भूगर्भ शास्त्रज्ञ पृथ्वीला झटके देऊन पृथ्वीवर भूकंप उत्पन्न करण्याचं मोठ्ठं यंत्र उभारतो. हे प्रलयंकारी यंत्र उभं करण्यामागची कल्पना अर्थातच अमेरिकेच्या शत्रुंपेक्षाही (म्हणजे अमेरिकेचे शत्रु तिकडून भूकंपाचा झटका देणार, अमेरिकाही त्यांच्यापेक्षा जास्त मोठा झटका इकडून देणार, आणि पृथ्वी व पृथ्वीवरचे लोक मात्र मधल्यामध्ये फुकट मरणार! पण हे सिनेमात दाखवलेलं नाही) वरचढ शस्त्र तयार करणे ही असते. "इफ वी वील नॉट डू इट, दे वील डू इट" या जगप्रसिध्द सूत्राचे पाठबळ त्याला असायला हवेच, ते तसे असते. तर हा चित्रपट उत्पन्न होण्याचे चित्रपटातील पुसट पण आपल्याला दिसणारे सुस्पष्ट कारण म्हणजे झिमिन्स्कीने दिलेल्या झटक्यामुळे पृथ्वीच्या गाभ्यावर काही मैल पसरलेल्या गाभ्यावरचा तो तप्तरस, लाव्हारस किंवा ते जे काही असेल ते आपण कॉफी ढवळतो तसे फिरणे अचानक थांबते.
त्यामुळे सूर्यापासून किंवा अवकाशातून येणारे अतिनील चुंबकीय किरण हळूहळू पृथ्वीचा बोर्‍या वाजवायला सुरू करतात. अर्थातच चित्रपट हॉलीवूडचा असल्याने सर्वात आधी बोर्‍या वाजतो तो अमेरिकेतल्या लोकांचा. म्हणजे आकाशातून येणार्‍या त्या विद्युत चुंबकीय तरंगांमुळे सर्वात आधी पेसमेकर बसवलेले तीस-बत्तीस लोक भर चौकात एकामागून एक अचानक पटापट माना टाकतात. मग लंडनच्या ट्रॅफल्गार चौकातील कबुतरं किंवा स्थलांतरप्रिय पक्षी वाटेल तसे उडायला लागतात आणि दणादण दुकानांच्या, मोटारींच्या काचांवर, लोकांच्या तोंडावर जाऊन आदळू लागतात. या पक्षांच्या मेंदूत त्यांना लांबचा पल्ला गाठताना मार्गदर्शन करणारे कसलेतरी इलेक्ट्रॉनिक आयन्स असतात त्यामुळे असे होते म्हणे. इथे येतात अ‍ॅरॉन एकहार्ट आणि चेकी कार्यो! अ‍ॅरॉन हा शिकागो विद्यापीठात भूगर्भ रचनेचा हुशार प्रोफेसर असतो. चेकी अणु शास्त्रज्ञ. मग त्याला पकडून जनरल समोर हजर करणं आलंच. त्याला सीआयएवाले भर वर्गातून धरून आणतात आणि सेक्युरिटी जनरल लोक पटापट का उडाले ते अ‍ॅरॉनकडून समजून घेतो. हा दहशतवादी हल्ला नाही हे स्पष्ट झाल्याने सेक्युरिटी जनरल निर्धास्त होतो आणि अ‍ॅरॉनने पाजळलेले शिल्लक ज्ञान ऐकून घेऊनही त्याला कल्टी मारतो. तिकडे रोमवर आलेल्या चुंबकीय ढगांमुळे अर्ध्यापेक्षाही जास्त रोम शहराचा बुकणा वाजतो - अचानक विजा कोसळू लागतात, इमारती ढासळू लागतात, विद्युतसुवाहक धातुला स्पर्श करणार्‍या लोकांना वीजेचे झटके बसू लागतात आणि पृथ्वीवर हाहाकार माजायला सुरूवात होते. उंच वर अवकाशात अमेरिकेचे एंडेव्हर हे अवकाशयान उडत असते त्याची खाली पृथ्वीवर उतरण्याची वेळ झालेली असते. पण पृथ्वीवर मध्येच ही भानगड उपटल्यामुळे ते उतरायला जाते एकीकडे आणि उतरते भलतीकडेच. हॉलीवूडची शपथ, ते अवकाशयान, हो, हो अवकाशयान लॉस एंजेलीस जवळच्या नदीत सुखरूप उतरवले जाते! ते उतरवणारा/री पायलट/कमांडर कुणीतरी असायलाच हवं - तर एक असतो आल्फ्रे वूडार्ड आणि दुसरी असते हिलरी स्वॅंक. रस्ता भटकलेल्या, लॉस एंजेलीस शहराच्या रस्त्यांवर आदळू शकणार्‍या अवकाशयानाला नदीत घुसवण्याची आयडीया शेवटच्या सेकंदाला हिलरीनेच यानाच्या कमांडरला सुचवलेली असते. ती यशस्वी झाल्याने कमांडरने तिच्यावर खार खायला हवा, तसा आल्फ्रे वूडार्ड खातो. नदीतल्या पुलाच्या खांबाना घासून अवकाशयानाचे पंख तुटतात. अमेरिकेसारख्या चौकशीप्रेमी देशात या प्राणहानी न झालेल्या अपघाताची चौकशी व्हायला हवीच, तशी ती होते. अमेरिकेचा सेक्युरीटी जनरल किंवा सरसेनापती तिला झालेल्या घटनेबद्दल चार शब्द ऐकवतो. भोवतीची यंत्रणा बिघडलीय हे तोपर्यंत स्पष्ट झालेले नसते. ते जेव्हा लक्षात येते तेव्हा बाकायदा हिलरीला आणखी एक चांगले काम सोपवले जाते. तोपर्यंत भूगर्भाचा प्रोफेसर असलेल्या अ‍ॅरॉन एकहार्टने काहीतरी डोके लावलेले असते आणि सुरू झालेली सगळी भानगड समजून घेऊन झिमिंस्की नावाच्या सेलिब्रीटी शास्त्रज्ञासमोर मांडलेली असतो. हा झिमिंस्की सेलिब्रीटी शास्त्रज्ञ असला तरी बर्‍याच भानगडी करून, लोकांची संशोधनं चोरून ती स्वत:च्या नावावर खपवून वर चढलेला असतो. कारण डेलरॉय लिंडो (हा वाळवंटात संशोधन करणारा झक्की शास्त्रज्ञ आहे) झिमिंस्कीला पाहिल्यापाहिल्याच म्हणतो - "तु अजून मेला नाहीस? तु माझं संशोधन चोरून स्वत:च्या नावावर खपवल्याला आता वीस वर्षे झालीत, वीस वर्षांनंतर मी तुझं तोंड पहिल्यांदाच पाहातोय." तर झिमिंस्की सगळी भानगड अमेरिकेचा सेक्युरिटी जनरल आणि टेबलाभोवती बसणार्‍या लोकांसमोर मांडतो आणि पुन्हा एकदा अ‍ॅरॉन एकहार्टला उचलून सेक्युरिटी काऊंसिलसमोर उभे केले जाते. हुशार आहेस ना, सांग मग काय होतंय ते! तो रूमफ्रेशनर मागवतो व एक फळ मधोमध कापून सगळी कथा तिथल्या लोकांसमोर मांडतो. मग आता पुढे काय होणार ते लोक त्याला विचारतात. रूम फ्रेशनरचा फवारा त्या फळावर सोडून तो त्या फळाला आग लावतो. सूर्याकडून येणार्‍या अशाच आगीच्या फवार्‍यात पृथ्वी जळून खाक होणार हे अ‍ॅरॉन जाहीर करतो. मग ही दुर्घटना थांबवणं आलंच. त्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील फक्त नऊ मैलांपर्यंतचीच माहिती उपलब्ध आहे आणि तिथंही एक लहानसा शाफ्ट्च जाऊ शकलाय हेही जाहीर होतं. फक्त वर्षभराच्या आत पृथ्वी जळून राख होईल हे अ‍ॅरॉन स्पष्ट करतो; झिमिंस्की त्याला मध्येमध्ये तोंड मारून स्वत:च त्या विषयावरील प्रभुत्व सिध्द करीत दुजोरा देत राहातो. या एका वर्षाच्या काळात नैसर्गिक प्रकोप वाढत्या प्रमाणात सहन करावा लागेल आणि त्यातच जगाचा अंत आहे हे मनावर बिंबतं.
मग येतो डेलरॉय लिंडो. या पठ्ठ्यानं लेजर किरण वापरून पहाडाला भोक पाडणारे एक यंत्र आणि लेजर किरणांच्या मार्‍यात उंदीर (कोणताही जीव) आत जीवंत राहिल असा धातू शोधलेला असतो. हा खरा हाडाचा शास्त्रज्ञ असतो. स्वत:च्या चष्याच्या काड्यांना सूत गुंडाळून हा वीस वर्षांपासून ते पहाडाला भोक पाडणारं यंत्र उभं करण्यात गुंतलेला असतो. शेवटी सेक्युरिटी जनरल आणि उपरोल्लेखीत सर्व गॅंग या डेलरॉय लिंडोच्या वाळवंटात असलेल्या बेसवर जाऊन धडकते. हॉलीवूडचा चित्रपट म्हटल्यावर हेलिकॉफ्टर्स, चकचकीत कार्स वगैरे लवाजामा आलाच. तोही दिसून जातो. डेलरॉय त्या यंत्राचं आणि धातूचं प्रात्यक्षिक करून दाखवतो. त्यानं बांधलेलं यानसुध्दा दाखवतो. त्याला जनरलकडून उपकरण पूर्ण कधी होईल त्याबद्दल विचारणा होते. डेलरॉय दहा ते बारा वर्षे लागतील हे सांगतो. मग पुन्हा जनरल डेलरॉयला तीन महिन्यात यान उभ करायला सांगतो; पन्नास अब्ज डॉलर्स खर्च द्यायला तयार होतो. हे यान बांधण्यामागची कल्पना अशी की - रेल्वेच्या डब्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळ्या होणार्‍या सात कंपार्टमेंटस तो नवीन धातू वापरून बांधायच्या. यानाच्या तोंडावर लेसर किरणांचा मारा करणारे व्हील बसवायचे. यान पृथ्वीला भोक पाडीत तिच्या गाभ्यापर्यंत जाणार. तिथे गेल्यावर यानात सोबत घेऊन गेलेल्या अणुबॉम्बचे स्फोट करायचे आणि गोलाकार असलेल्या त्या लाव्ह्याला गती देऊन आतलं वर्तुळ पुन्हा एकदा सुरू करायचं! अ‍ॅरॉन एकहार्ट, चेकी कार्यो, ब्रुस ग्रीनवूड, हिलरी स्वॅंक, झिमिन्स्की, डेलरॉय लिंडो आणि हो, डीजे क्वाल्स (रोड ट्रीपमधला शामळू काईल.. वेटरला बिनासाखरेचं टोस्ट मागून फजिती करून घेणारा) हा आत्ताच चरख्यातून पिळून काढल्यासारखा दिसणारा हॅकर या सर्वांची टीम तयार करण्यात येते. डीजे क्वाल्सने चौसष्ट वेळा हॅकींग करून फ्रॉड केलेले असते. तोही त्याच्या क्षेत्रातला महागुरूच! पण काम करायला लवकर तयार होत नाही. बोलणी चालू असताना तो एका मिनीटातच अ‍ॅरॉनच्या मोबाईलवर लाईफटाईम एसटीडी कॉल्स फ्री करून देतो. त्याच्याकडे संपूर्ण जगातले इंटरनेट्च हॅक करण्याचे काम दिले जाते. म्हणजे या प्रकल्पाबाबत एक शब्द देखील इंटरनेट्वर दिसू द्यायचा नाही. अ‍ॅरॉनला या यानाचा चीफ करण्यात येते. कारण झिमिन्स्कीच्या वर उल्लेख आलेल्या डेस्टीनी नावाच्या उद्योगामुळे झिमिन्स्कीची अक्कल जनरलला कळालेली असते. जगभरातील शास्त्रज्ञ समुदायासमोर प्रवक्ता म्हणून बोलू देऊन भाव खाऊ देण्यासाठीही झिमिन्स्की जनरलकडे तड्फड करतो; पण त्याची डाळ शिजत नाही. एकूण प्रकल्प सुरू होतो; सिम्युलेशनद्वारे यानाच्या चालकांना हे जमिनीत घुसत जाणारे यान चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अ‍ॅरॉन या यानाचा भूगर्भातील वाटाड्या होतो, हिलरी आणि ब्रुस हे चालक होतात, झिमिन्स्की काहीच न करता चुकीचा सल्ला छातीठोकपणे द्यायचे काम स्वीकारतो, चेकी कार्योकडे अणुबॉम्बच्या स्फोटाचे काम असते, डेलरॉय लिंडोचे तर पूर्ण यानच असते. समुद्रात यान खाली तोंड करून उभे केले जाते आणि काऊंट्डाऊन पूर्ण होताच समुद्रतळाकडे मुसंडी मारून आत घुसत जाते. यानाशी संपर्क, नियंत्रण वगैरे सांभाळण्यासाठी नेहमीचेच निनावी यशस्वी कलाकार कुठल्यातरी नियंत्रण कक्षात बसतात. अ‍ॅरॉन आणि हिलरी हेच सिनेमाचे हिरो-हिरॉईन असल्याने फक्त तेच दोघे शेवटी जीवंत परत येतात. यानातील बाकी सब लोग दुनिया बचाने के लिये कुर्बान हो जाते है. यान गाभ्यापर्यंत कसे जाते, गाभ्यावरचा लाव्हा अत्यंत तरल असल्याने स्फोट करणे रद्द होऊन त्यांना परत फिरण्याची ऑर्डर येणे, शिल्लक राहिलेल्यांमधील बेबनाव, मध्येच काय-काय अडचणी येतात वगैरे दृश्ये मनोरंजन करून जातात. आता हॉलीवूडचा कोणताही सिनेमा पाहिल्यानंतर मला पडणारे सनातन प्रश्न:- हॉलीवूडमध्ये निग्रो जर सूटाबुटात असेल तर त्याचा सूट नेहमी वाकडातिकडा, ढगाळा-गबाळा का असतो? (नमुना: २०१२ डूम्स डे मधील अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष) हिरो हिरोईन हुशार असूनही एकमेकांना सोडून का जातात? रहा की राव मस्त, लग्न करा - मजा करा... पण नाही. जवळपास सगळ्या हॉलीवूडपटांचा रोख जगाचा नाश करण्याकडेच का असतो? हॉलीवूड सिनेमातील प्रत्येकजण सतत बर्गर, पिझ्झा असे काहीतरी खात किंवा दारू, वाईन पीत का असतो? हॉलीवूड सिनेमातील निग्रो पोरांच्या आया त्यांच्यावर सतत का ओरडत असतात? हॉलीवूडच्या सिनेमात प्रत्येकजण आपल्या कामात एवढा चोख दाखवला नाही तर अमेरिकेची जगातील प्रतिमा खराब होईल काय? हॉलीवूडच्या सिनेमातील प्रत्येकाच्या आवडीचे एक विशिष्ट हॉटेल, विशिष्ट बेट, विशिष्ट ड्रिंक, एक विशिष्ट स्वप्न का असते? स्वत: पन्नासदा घटस्फोट घेत असले तरी हॉलीवूड सिनेमातील नायक-नायिका पोराबाळांच्या पालन पोषणाबद्दल एवढे जागरूक का असतात? आणि हॉलीवूड सिनेमातील प्रत्येक बाप "मुझे पता है, मै अच्छा बाप नहीं बन सका" असे का म्हणतो? तुम ये कर सकते हो.. नय...चार्ली..छोडो भी असली आणि असलीच कितीतरी निरर्थक वाक्ये हिंदी आवाजात कोण डब करतात? - यशवंत कुलकर्णी

वाचने 6478 वाचनखूण प्रतिक्रिया 34

अवलिया 07/12/2010 - 12:08
हा हा हा प्रश्न मस्त आहेत... परा किंवा डान्राव कॉलिंग !! अजुनही काही निरर्थक वाक्ये ऐकुन फस्सकन हसु येते.. इथे देत नाही... उगाच प्रतिसादाला पंख लागायचे... ! =))

छोटा डॉन 07/12/2010 - 12:14
माझा एकच आणि मुद्द्याचा प्रश्न आहे. मुळ इंग्रजीत असणारे चित्रपट तुम्ही 'हिंदी'मध्ये बघताच का ? परिक्षण झकासच, बाकी सविस्तर प्रतिसाद देतो आहेच.

In reply to by छोटा डॉन

यकु 07/12/2010 - 12:24
कारण सोप्पंय.. दीडशे रूपयांची इंग्लिश डीव्हीडी विकत आणून घरात खर्चिक कचरा का साठवायचा? इंग्लिश मुव्हीज डाऊनलोड करून इंटरनेट का जाळायचं? तीस रूपयांच्या डीव्हीडीत सहा सिनेमे !!!!! मूळ इंग्लिशमधलेही मिळतात. पायरसी वगैरे *********

In reply to by यकु

गवि 07/12/2010 - 12:50
हिंदी डबिंग ऐकून मूळ भिकार पिच्चरमधेही मज्जा येऊ शकते. इंग्लिश शब्दांशी जुळवून घेण्यासाठी दोन हिंदी शब्दांत वेडेवाकडे अंतर सारून बोलतात ते ऐकायला मजा येते. (डल् अति घोगर्‍या आवाजात..) वो..अम्..एक किस्म का... अम् विस्फोट अ (लांब पॉज..) था..!! अरे वाह बेकी.. तुम तो आज का आ आ आ फी अ अ अ खूब्सुरत (फास्ट) लग रही हो. असो. सर्व शंका रास्त..

झकास!!! मागे एका इंग्रजी चित्रपटाच्या डब्ड आवृत्तीत शि-शब्द किंवा फ-शब्द आला तर 'हे भगवान' असे वापरले होते. ओठांच्या हालचालीवरून कळत होते म्हणा... ;) ... लै हसलो होतो.

कवितानागेश 07/12/2010 - 13:38
मस्त परिक्षण लिहिलय. जवळपास सगळ्या हॉलीवूडपटांचा रोख जगाचा नाश करण्याकडेच का असतो?>> मलापण अगदी हाच प्रश्न पडतो नेहमी. बहुतेक 'अटलांटिस' बद्दल वाचून त्याच्यातल्या गोष्टी चोरतात सगळे! वैज्ञानिक शोधांच्या नावाखाली काहितरी 'चांगले' दाखवले तर सिनेमा बघताना जरा तरी बरे वाटेल, उदा: काहितरी स्फोट/ रासायनिक प्रक्रिया करुन अख्खा हिन्दी महासागर गोड्या पाण्याचा केला, वगरै.... (बावळट, मागासलेली) माउ

नगरीनिरंजन 07/12/2010 - 14:05
प्रश्न आवडले आणि हिंदी डबिंगवरची टिप्पणीपण फस्क्लास आहे. जुरासिक पार्कच्या पहिल्या भागात नावाड्यांची वेगळी भाषा दाखवायला मराठी वापरली होती ते आठवलं. असंच अचाट हिंदी त्या टेलिमार्केटिंगच्या जाहिरातींमध्ये एका विशिष्ट हेलात बोलणं चालू असतं. "मैं बहोSSत परेशान थाSSSS. मुझे समझ नही आ रहा था क्या करूSSS. फिर मैने अमुक तमुक अपनायाSSSSS" वगैरे वगैरे..

In reply to by नगरीनिरंजन

छोटा डॉन 07/12/2010 - 14:25
>>जुरासिक पार्कच्या पहिल्या भागात नावाड्यांची वेगळी भाषा दाखवायला मराठी वापरली होती ते आठवलं. च्यायला, हे असे होते काय ? ही माहिती माझ्यासाठी नवीनच आहे.

In reply to by टारझन

छोटा डॉन 07/12/2010 - 14:28
>>इंग्रजीतल्या मा.चो. ला हिंदीत वाह्यात इन्सान म्हणतात. ??? म्हणजे काय ? इंग्रजीतले मा.चो. म्हणजे आपले इंगरजीतले म.फ. काय ? ( व्यनी केला तरी हरकत नाय ) काही का असेना, हे 'वाह्यात इन्सान' लै भारी, आपण आजपासुन हीच शिवी देणार.

In reply to by छोटा डॉन

नगरीनिरंजन 07/12/2010 - 14:35
:-) वाह्यात इन्सान =)) =)) वाहियात इन्सान असा उच्चार करत असतात ते लोक. या हिंदी बोलणार्‍यांना 'या' जोडून बोलायला पण जमत नाही. जाड्याला जाडिया म्हणतात. दीडफुट्या ला डेढफुटिया म्हणतात. भाडिया म्हणताना मात्र कधी ऐकलं नाही.

In reply to by छोटा डॉन

काही का असेना, हे 'वाह्यात इन्सान' लै भारी, आपण आजपासुन हीच शिवी देणार.
आपण पण ! म.फ. = वाह्यात इन्सान बिच = दुष्ट औरत स.ऑ.बि. = गंदी नाली का किडा श.फ.ऑ. = अपना मुह बंद करो / वाह्यात बाते बंद करो ब्लडी बिच = घटिया औरत फ* = लोचा हो गया अ‍ॅस = पिछवाडा स्क्र्यु यु = हालत खराब कर दुंगा हे अजुन काही ऐकलेले सुंदर शब्द.

In reply to by परिकथेतील राजकुमार

यकु 08/12/2010 - 01:18
आणि एक राहिलंच. गो टू हेल्ल!!!!! = भाडऽऽऽऽ में जाओ ऽऽऽऽ हेल ठीक आहे पण भाड म्हणजे नेमकं काय तो ही एक सनातन प्रश्न आहे!

योगी९०० 07/12/2010 - 15:14
हॅ हॅ हॅ.. झकास.. शेवटी विचारलेले प्रश्न ही झकास.. त्यातल्या त्यात गंमत मला वाटते ती "ग्राउंड स्टाफ" ची.. broken arrow, underseige १ & २, Excecutive Decision असले चित्रपट पाऊन त्यात काम करणार्‍या "ग्राउंड स्टाफ" ची मला नेहमी गंमत वाटत आली आहे. ही लोकं चित्रपटाच्या सुरूवातीला थोडी मग्रूर असतात. नंतर कोणा व्हिलनने विमान/रेल्वे किंवा बिल्डिग ताब्यात घेतली की यांची चांगली फाटते. त्यावेळी नुसते याला फोन कर, या सॅटेलाअ‍ॅट वर लक्ष टेव नाहीतर कोठेतरी विमान पाठव असले थातूर मातूर अयशस्वी प्रयोग करून स्वत:ची आणखी वाट लावून घेतात. चित्रपटाच्या शेवटी हिरोने मारधाड करून सर्व व्हिलन लोकांना यमसदनी धाडल्यावर विमान/रेल्वे सुरक्षित केली आणि "सर्व पॅसेंजर सुरक्षित" किंवा "अणुबॉम्ब निकामी झाला" असला काही संदेश पाठवला की तिच लोक जणू स्वतःच पराक्रम केल्यासारखी खुश होऊन एकमेकांना मिठया मारतात. चित्रपट वेगवेगळा असला तरी "ग्राउंड स्टाफ" चे काम एकच.. माझ्यामते हॉलिवूड मध्ये हे काम करणारी एकच टिम आणि एकच सेट असावा..

प्रियाली 07/12/2010 - 18:56
देवाशप्पथ मी परीक्षण पूर्ण वाचलं नाही पण डायरेक्ट प्रश्नांवर उडी मारली. वेळ झाला की परीक्षण पूर्ण वाचेन. ;)
हॉलीवूडमध्ये निग्रो जर सूटाबुटात असेल तर त्याचा सूट नेहमी वाकडातिकडा, ढगाळा-गबाळा का असतो? (नमुना: २०१२ डूम्स डे मधील अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष)
कारण ते आपल्या भारतीयांसारखे अघळपघळ "मनुष्य" असतात. गोर्‍यांसारखे यांत्रिक रोबोट नाहीत. असो. पण प्रत्यक्षात डॅन्झेल वॉशिंग्टन वगैरे जाम स्मार्ट आहेत आणि दिसतात.
हिरो हिरोईन हुशार असूनही एकमेकांना सोडून का जातात? रहा की राव मस्त, लग्न करा - मजा करा... पण नाही.
बॉस! हिरो आणि हिरोईन हे दोघेही "हुशार" असले तर एकमेकांना सोडून जाणेच योग्य आहे ना. दोन हुशार माणसे फार कमीवेळा एक दुसर्‍यांच्या संगतीत राहतात. दोघांपैकी एक "ढ" असेल तरच एकमेकांना चिकटून राहतील.
जवळपास सगळ्या हॉलीवूडपटांचा रोख जगाचा नाश करण्याकडेच का असतो?
अमेरिकेची उडी नेहमीच मोठी होती. अफगाणिस्तान, इराक वगैरे त्यांचे शत्रू नव्हतेच कधी. कःपदार्थ एकदम सगळे जग तेव्हा अमेरिका फक्त "बाहेरच्यांवर" लक्ष ठेवून. गेले कित्येक वर्षे ती एलियन्सपासून जगाचे संरक्षण करते आहे नै का? ;)
हॉलीवूड सिनेमातील प्रत्येकजण सतत बर्गर, पिझ्झा असे काहीतरी खात किंवा दारू, वाईन पीत का असतो?
त्यांना त्यांची मां गाजर का हलवा आणि आलू के पराठे खिलवत नाही ना म्हणून.
हॉलीवूड सिनेमातील निग्रो पोरांच्या आया त्यांच्यावर सतत का ओरडत असतात?
त्या त्यांच्या खर्‍या आया असाव्यात. आम्ही अफ्रिकन नसूनही आमच्या पोरांवर ओरडत असतो. ज्या ओरडत नाहीत त्या माता जाम "फिल्मी" असतात असे स्पष्ट मत आहे.
हॉलीवूडच्या सिनेमात प्रत्येकजण आपल्या कामात एवढा चोख दाखवला नाही तर अमेरिकेची जगातील प्रतिमा खराब होईल काय?
या प्रश्नातच उत्तर आहे.
हॉलीवूडच्या सिनेमातील प्रत्येकाच्या आवडीचे एक विशिष्ट हॉटेल, विशिष्ट बेट, विशिष्ट ड्रिंक, एक विशिष्ट स्वप्न का असते?
एक वोडका-मार्टिनी शेकन नॉट स्टर्ड मिळाले की उत्तर देईन म्हणते.
स्वत: पन्नासदा घटस्फोट घेत असले तरी हॉलीवूड सिनेमातील नायक-नायिका पोराबाळांच्या पालन पोषणाबद्दल एवढे जागरूक का असतात?
चाइल्ड सपोर्टचा अमेरिकन कायदा. दुसरे काही नाही. हे असे दाखवले नाही तर तिकडचे सेन्सर बोर्ड नडत असावे. ;)
आणि हॉलीवूड सिनेमातील प्रत्येक बाप "मुझे पता है, मै अच्छा बाप नहीं बन सका" असे का म्हणतो?
अहो त्याला आपण त्या पोराचे खरे "बाप" आहोत की नाही इथपासूनच शंका असते तेव्हा म्हणणारच तो.

In reply to by प्रियाली

आवरा !!
अहो त्याला आपण त्या पोराचे खरे "बाप" आहोत की नाही इथपासूनच शंका असते तेव्हा म्हणणारच तो.
हे खासच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 07/12/2010 - 19:30
म्हणुन मी अमेरिकन बायको णको म्हणतो :) अगदी इंडिया जन्मित पण अमेरिका पोषित सुद्धा नको :) - टारझन आपली बोली आपला बाणा कलियुग आले , हे टारझना

फारएन्ड 08/12/2010 - 08:11
जबरी प्रश्न आणि परीक्षण ही! आवडले. ती ग्राउंड स्टाफची प्रतिक्रियाही मस्त.

उत्तम परीक्षण हॉलीवूड सिनेमे व ह्या सिनेमातून आपली स्वताची एक काल्पनिक अमेरिकन जीवनशैली तमाम जगतावर लादत असतात .(जगाला वाचवायचा ठेका आमच्याकडे असा गर्भित इशारा ह्या पद्धतीच्या हे लोक देतात .मुळात जगाची व्याख्या म्हणजे अमेरिका .अशी ह्याची समजूत असते .युरोपात फ्रेंच जर्मन किंवा इंग्लिश ह्याच्या तडाख्यात एखादा अमेरिकन सापडलं तर त्याला मजबूत टोमणे बसतात (मंदीच्या काळात हे हल्ले अधिक तीव्र झाले आहेत ) अफगाण इराक युध्साठी अमेरिकेच्या नादी उगाच लागलो अशी समस्त इंग्लिश लोकांची भावना आहे .म्हणून टोनी ब्लेअर खलनायक ठरले व त्याच्या पुस्तकाचा सर्व निधी इराक युध्ध्च्या सैनिकांसाठी दिला असता ब्लड मनी अशी संभावना समस्त इंग्लिश पुस्तकांनी केली .अजूनही ह्यांचे सिनेमे तांत्रिक दृष्ट्या चांगले असतात .अप्रतिम असतात .ग्रीन डे त्याच्या लोकप्रिय अमेरिकन इडीयात ह्या अल्बम मधून शिव्याची लाखोली वाहत अमेरिकन ड्रीम ची हुर्य उडवतो .ह्यांचे हिंदी डबिंग जाम हसवतात . जर्मनीत सर्व सिनेमे हे जर्मन डब असतात .आमचे कुटुंब जेव्हा लंडनला आल्यावर हॉलीवूड सिनेमे जेव्हा इंग्लिश मध्ये पाहू लागली . तेव्हा खुपश्या अभिनेत्रीचे खरे आवाज एकूण निराश झाली . कारण जर्मनीत प्रत्येक नटी साठी डबिंग करणारा जर्मन आवज नेहमीच चांगला असतो . (येथे राष्ट्रीय वाहिनीवर दर शुक्रवारी बॉलीवूड सिनेमे जर्मन भाषेत दाखवतात ( बहुतेक ते शाहरुख चे असतात .)त्याचा मात्र बकरी आवज बरोबर जमलाय ता क एक प्रसारमाध्यमाचा प्रोडुसर आमच्या पंचाताराकीत हॉटेलात कामानिम्मित आला होता .माझ्याशी बोलल्यावर त्याला कळले मी मुंबईचा आहे वर एक दोन आवज मिमिक्री पद्धतीची ( हलक्या दर्जाची पण त्याला काय कळतंय ) पाहून खुश झाला म्हंटला बर्लिनला मला येऊन भेट .बॉलीवूड सिनेमाची डबिंग करायला देतो मात्र जर्मन भाषेवर प्रभुत्व हव . मी म्हटले शाहरुख काही अजून १ वर्ष म्हातारा होत नाही .तो पर्यत घेतो शिकून .