Skip to main content

प्रकटन

तांत्रिक मत"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/06/2014 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव " तांत्रिक मत" ह्या मताचा उदय बंगाल मधे झाला व त्याचा विस्तार बर्मा.तिबेट चिन पर्यंत होत गेला.. पुढे या विचाराचे अनेक ग्रुप्स झाली..व मतमतांतरे वाढत गेली समाज सुधारकानी पण या तान्त्रिंक मतावर तुफान हल्ले चढवले व आज हे मत..

'कुणी घर देता का घर' - नटसम्राटाचा टाहो

लेखक जीएस यांनी शुक्रवार, 20/06/2014 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्‍या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे.

मनात पूजीन रायगडा !!!

लेखक धन्या यांनी बुधवार, 18/06/2014 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
पायाखालची रायगड जिल्ह्याची माती सुटून आता दहा वर्ष झाली मात्र त्या मातीचा सुगंध आजही मनात दरवळतोय. असं वाटतं की शाळेत आपल्याला पुर्ण नांव सांगायला सांगितलं आहे आणि आपण नांव सांगून झाल्यानंतर एका दमात "मुक्काम वडगांव कोंड पोष्ट गोरेगांव तालुका माणगांव जिल्हा रायगड" असा पत्ता सांगत आहोत. गावातून बाहेर पडून पूर्वेला तोंड करुन उभे राहीले की दूरवर समोर दिसणारा कावळे घाट आणि त्याच्या पाठीमागे दिमाखाने उभा असलेला छत्रपतींचा रायगड आजही नजरेसमोर तरळतो. लहानपणी आजीने सांगितलेली आख्यायिकाही आठवते. आमचे पोष्ट असलेल्या गोरेगांवाचे नांव म्हणे पूर्वी घोडेगांव होते.

मनः सामर्थ्य

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 15/06/2014 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
हि मी दहावी पास झाल्याच्या वेळेची गोष्ट आहे. माझा भाऊ बारावीत गेला होता आणि त्याचे कॉलेज चालू झाले होते त्यामुळे तो आणि आई आले नव्हते मी आणि आमचे वडील आमच्या गावी कोकणात गेलो होतो. परशुराम येथे आमचे वडिलोपार्जित घर आहे. मागच्या अंगणात फणसाचे झाड आहे त्या झाडाचे दोन फणस आणि गावात विकत घेतलेले शेकडा हापूस आंबे( तेंव्हा ६५ रुपये पक्का शेकडा म्हणजे शंभर (अधिक १२) म्हणजे ११२ आंबे असे एका पाटीत टाकून चिपळूण ठाणे एस टी च्या टपावर चढवले( परशुराम तिठ्ठायेथे ) आमच्या नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही मुंब्र्याला उतरलो.तेंव्हा नवी मुंबई चा रस्ता नव्हताच.

मॄगजळ

लेखक मंदार कात्रे यांनी शनिवार, 14/06/2014 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
"त्याचं" येणं मला फारसं रुचलं नव्हतं ...काळ्या रंगाचा ,उंचापुरा , कुरळे केस, इनशर्ट... आणि त्यातून अडचणीचं म्हणजे तो चक्क बूट घालून घरात आला होता... कोण गं तो? ...मी संगीताला विचारलं . संगीता ही म्हात्रेकाकांची एकुलती एक मुलगी .तसा मधूनमधून मुंबईला गेल्यावर मी म्हात्रेकाकांकडे उतरत असे. "तो" आला की म्हात्रेकाकांची वृद्ध आई त्याला शिव्या घालत असे . नशीब त्याला मराठी अजिबात कळत नव्हतं.... म्हात्रे आणि त्यांची मिसेस घरात असले की सतत "त्या"च्याविशयीच चर्चा सुरू असे. तो मित्र आहे माझा...संगीता म्हणाली.अगं पण मित्र झाला म्हणून असा वेळी अवेळी घरी?...मी विचारलं...

सोबत ..... एक किस्सा

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 13/06/2014 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
एक फार जुना किस्सा आठवला. कंपनीतल्या साऱ्यांनी देवदास बघायचे ठरविले. मला बघण्यात फारसा रस नव्हता पण सारे तयार झाले म्हणून मी पण तयार झालो. मला मुळात देवदास हा प्रकारच आवडत नाही. अरे पिण्यासाठी ब्रेक अपच व्हायची काय गरज आहे? पारो गेली तर चंद्रमुखी मिळाली या खुषीत पण पिता आले असते. बर त्यावेळ पर्यंत स्वदेस किंवा चक दे इंडीया बघण्यात आले नव्हते. तेंव्हा शाहरुखला चांगले म्हणून त्याच्यासाठी पिक्चर बघावा असे काही नव्हते. संजय लीला भनसाळी म्हणजे मला तरी दहा रुपयाचे आमलेट आणि शंभर रुपयाचे केच अप असा प्रकार वाटतो. तरी साऱ्या मित्रांसाठी मी तयार झालो पण आमची एक मैत्रीण मात्र शेवटपर्यत तयार झाली नाही.

भय, निरुत्साह, साशंकता, ढळलेला आत्मविश्वास....

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 12/06/2014 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका मानसिक ताणतणावासंबधित लेखाला मी दिलेला प्रतिसाद (किंचित फेरफार करून) येथे लेख म्हणून टाकत आहे. बर्‍याच लोकांना असे छोटे-छोटे मनःस्वास्थ-विषयक त्रास होत असतात. कदाचित उपयोग होऊ शकेल हा लेख टाकण्याचा हेतू. शिवाय यातून चर्चा होऊन काही उपाय, अनुभव, निरीक्षणे शेअर करता आली तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. -------------------------------------------------------------------------------- अनामिक भय हे थोड्या-फार फरकाने सगळ्यांनाच असते. ते एखाद्या झाडाच्या कुजलेल्या अजस्त्र फांदीप्रमाणे कधी कधी खळखळ वाहणार्‍या निरुंद भागात अडकते आणि आपल्या मनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरते.

पर्यावरणाची ऐशी तैशी!

लेखक मीराताई यांनी सोमवार, 09/06/2014 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर त्यांचं स्वप्न त्यांच्या मुठीत आलं होतं. घरातल्या जागेची अडचण, त्या पाठोपाठ येणाऱ्या अडचणी आणि बाहेरची गर्दी-गोंगाट यांच्यापासून सुटकेचा मार्ग त्यांना सापडला होता. नवीन वसणाऱ्या उपनगरातल्या एका मोठया गृहप्रकल्पात त्यांनी नाव नोंदवलं होतं. प्रख्यात अशा 'स्वप्नसिटी बिल्डर्स'नी या भागातल्या मध्यवर्ती अशा विस्तीर्ण भूखंडावरच्या स्वप्नराशि, स्वप्नमाला, स्वप्नकुटिर, स्वप्ननगरी, स्वप्नाली, स्वप्नील घरकुलांची मोठीच जाहिरात केली होती. प्रशस्त घरांच्या उंच उंच इमारती उभ्या राहूनही गाडयांसाठी, बाग-बगीचा, खेळण्यासाठी जागा आणि क्लब हाऊससाठीसुध्दा जागा उपलब्ध होईल येवढी ऐसपैस जागा होती ती.

उच्चारातल्या गमती...

लेखक माधुरी विनायक यांनी शनिवार, 07/06/2014 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
भडकमकर या आडनावाचा भडक मकर असा उच्चार करणाऱ्या सरदारजीचा विनोद फार जुना झाला, नाही का. उच्चारातल्या या आणखी काही गमती-जमती.. कार्यबाहुल्यामुळे - या शब्दाचा उच्चार कार्यबाहु ल्ल्या मुळे असा केला जातो. (ल वर आघात) नवख्या /अमराठी माध्यमात शिकलेल्या मुलांकडून कार्य बाहुल्या मुळे (बाहुला?) असा उच्चार ऐकून मौज वाटली. 'काटकसर' -काही वर्षांपूर्वी शेजारची पाचव्या इयत्तेत शिकणारी मुलगी लोकसत्ता घेऊन आली. मला एका पानावरची गोष्ट, खरं तर शीर्षक दाखवलं. ते होतं, 'काटकसर'. तिची तक्रार - ताई, या गोष्टीत कोणीच काटक सर नाहीत... क्वात्रोची - हे प्रकरण प्रसार माध्यमांमध्ये गाजत होतं, तेव्हाची गोष्ट.

कै. व्यंकटेश माडगुळकारांना साहित्यिक आदरांजली. भाग 1

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 04/06/2014 17:48 या दिवशी प्रकाशित केले.

28 ऑगस्ट या कै. व्यंकटेश माडगुळकारांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना साहित्यिक आदरांजली.

लोणी गावातील सांप्रत (ऑगस्ट २००९ मधील) परिस्थितीचा वृतांत (पुनर्संपादित 27 मे 2014)भाग 1

संकलक - विंग कमांडर शशिकांत ओक

काही काळापुर्वी माझ्या हाती 'चित्रे आणि चरित्रे' या नावाचे कै. व्यंकटेश माडगुळकरांचे पुस्तक हाती आले. (उत्कर्ष प्रकाशन पुणे.