Skip to main content

प्रकटन

ब्रह्मांड

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 05/09/2014 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
शहरांत रोज होणार्‍या हजारो अपघातांसारखच त्या गाडीचा अपघात झाला. बहुतांश अपघातांप्रमाणेच इथेही चालवणार्‍याचीच चूक होती आणि त्याचाच मृत्यु. त्याच्या मागे बायको आणि दोन मुलं. नशिबाने ती वाचली. अ‍ॅम्बुलंस आली, आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण काही उपयोग झाला नाही. शरीर छिन्नविछिन्न झालेलं होतं, मेला ते एका अर्थी बरंच झालं. आणि मग तू मला भेटलास. "काय.. काय झालं? कुठे आहे?, भेदरून जाऊन तू विचारलंस. "तू मेला आहेस" मी शांतपणे सांगितलं, उगाच शब्दांना सोन्याचा मुलामा देण्यात काय अर्थ होता? "माझ्या समोर तो ट्रक अचानकच आला... मी कचकाऊन ब्रेक मारला..." "हो" मी म्हणालो. "मी ..

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 04/09/2014 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र. १ मानवनिर्मित स्थापत्य ********************** नमस्कार मंडळी! छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या स्पर्धेला उदंड प्रतिसद देऊन यशस्वी करण्यात तुमचा सर्वांचा हातभार लागला आहे. आलेली सर्वच छायाचित्रे अतिशय सुरेख होती आणि डावे-उजवे करणे फारच कठीण. म्हणूनच सर्व सदस्यांना चित्रे निवडायची विनंती केली होती. एकूण २८ स्पर्धकांची ७९ छायाचित्रे आली. निकाल लावताना ४० सदस्यांनी आपल्या पसंतीची चित्रे निवडली.

व्यक्त : कारण आणि परिणाम

लेखक वडापाव यांनी बुधवार, 03/09/2014 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाचं शरीर हा एक भव्य कारखाना आहे. या कारखान्यात बाहेरून कच्चा माल मागवला जातो, जो श्वासाच्या, अन्नाच्या, आणि कुठल्याही प्रकारच्या अनुभवाच्या रूपाने येतो. त्यावर प्रक्रिया होते. अन्नाचं पचन होतं. श्वास मंदज्वलनासाठी ऒक्सिजन पुरवतो. आणि अनुभवावर बेतलेली विचारप्रक्रिया मनात सुरू होते. या प्रक्रियांच्या अंताला आपल्या शरीराकडे बरीच उत्पादनं तयार झालेली असतात. काही वापरण्यासाठी, म्हणजे कृती करण्यासाठी; तर काही उत्सर्जित करण्यासाठी - ज्यांना आपण टाकाऊ म्हणतो. पण खरंच ती टाकाऊ असतात का? टाकाऊ म्हणजे नेमकी कुठल्या प्रकारची उत्पादनं असतात ही?

रनिंग फ़्रॉम लिंचींग

लेखक मारवा यांनी मंगळवार, 02/09/2014 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
१२ डीसेंबर १७१२ हा दिवस व्हर्जीनीयातील जंटलमेन्स साठी फ़ार महत्वाचा होता. कारण त्यांच्याइतकाच जेंटल (इंग्रजी तील ) असणारा मॅन Willie Lynch त्यांना त्याच्या मेहनतीने व कल्पकतेने डेव्हलप केलेली. गुलाम बनविण्याची रेसीपी शेअर करायला येणार होता. हा पाहुणा दयाळु इश्वराचा अर्थातच मोठा भक्त होता राजा जेम्स ची ही त्याने आवर्जुन आठवण भाषणाच्या सुरुवातीला च काढली. (बायबल वाला जेम्स ) प्राचीन रोमन्स ही माझ्या गुलाम बनविण्याच्या मेथड चा हेवा करतील हे ही ठणकावुन सांगुन भाषणाला सुरुवात केली. या भाषणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे बघा लिंच ची अप्रतिम इंग्रजी भाषा. अतिशय आखीव रेखीव अत्यंत नीटनेटकी.

शीत- उष्ण गुण- गुणधर्म व शरीरातील कार्य.

लेखक बाबा पाटील यांनी गुरुवार, 28/08/2014 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय तत्वज्ञानाने व आयुर्वेद शास्त्राने शरीराशी संबधित वीस सामान्य गुण मान्य केले आहेत.ते म्हणजेच गुरु,लघु इत्यादी होय. शरीराशी संबधित असल्याने त्यांना शारीरगुण असे देखिल म्हणतात. गुर्वाद्यस्तु- गुरुलघुशीतउष्णस्निग्धरुक्षमंदतीक्ष्णस्थिरसरमृदुकठिनविशद्पिच्छिलश्लक्ष्णखरस्थूलसुक्ष्मसांद्रद्रवा:विंशती चरक सुत्रस्थान १/चक्रदत्त टीका. गुरु,लघु,उष्ण,स्निग्ध,रुक्ष,मंद,तीक्ष्ण,स्थिर,रस,मृदु,कठिण,विशद,पिच्छिल,श्लक्ष्ण,खर,स्थूल,सुक्ष्म,सांद्र,द्रव.

तपस्या

लेखक जयनीत यांनी बुधवार, 27/08/2014 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
अमका सांगतो एक तमक्याचे ठोकताळे दुसरेच खमका करतो दावा छातीठोक घडते प्रत्यक्षात वेगळेच प्रारब्ध माझे अधर अनिश्चित खडतर काळ प्रतीक्षेचा नाही विचलीत मी अपराजित प्रण मनात घोर तपस्येचा फळतील माझे प्रयत्न भगीरथ घेईन वेध भविष्याचा शोध सुरुच सतत अविरत सिद्धहस्त ज्योतिष्याचा

घातक स्युडोमार्ग

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 27/08/2014 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
"बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले?" माय फुट! मी कसाही वागेन नी काहिहि बोलेन! शिवाय माझी पावले कोणी वंदावी अशी माझी इच्छाच कुठाय? आणि असली तरीही हा नियम मी का म्हणून मानावा? आणि तसंही मी अगदी बोलल्याप्रमाणे वागल्यावरही माझी पावले वंदतीलच लोकं याचीही खात्री नाहिच्चे! ========= "साला स्युडोलिबरल" त्याने आणखी एक शिवी हासडली. हा स्युडो शब्द इतका व्हेग आहे की त्याच्याशी संग केल्यावर होणारी प्रसुती ही कोणालाही कोणत्याही पातळीवर नेऊ शकते. स्युडोलिबरल, स्युडोसेक्युलर, स्युडोयंव नी स्युडोत्यंव!

टोलनाक्यावर...

लेखक गवि यांनी मंगळवार, 26/08/2014 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी टोलनाक्यावर उभा असतो. हौसेने नाही राहात. टोलनाक्यावर उभं राहणं हाच माझा जॉब. मुष्किलीने लागलाय. दोन वर्षं गेली तिसरंही जाईल. उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात. पण मी टोलनाक्यावर उभा असतो. .. तसा मी ब्राह्मणाचा. अण्णाआईसोबत चांगला होतो. अण्णा गांजा भरुन सिगरेट ओढायचे अन मग तासनतास शांत. आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत. मोहरी करपली, तडतड थांबली.. मला शाळेच्या पुस्तकांनी ओकारी यायची. अण्णा म्हणायचे, कशाला शिकतोस.. व्यर्थ आहे सगळं. अण्णा एकदम अध्यात्मिक. महिनामहिना घराबाहेर. मग वर्षं वर्षं. एकदम आईला म्हणाले तू माझी माऊली..

चलती का नाम गाडी- ५: वाहन चौर्य प्रतिबंधन

लेखक खेडूत यांनी शनिवार, 23/08/2014 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२: गुंतागुंत चलती का नाम गाडी-३: नवी फीचर्स चलती का नाम गाडी-४: प्रदूषण नियंत्रण (युरो नॉर्मस) मागील भागांमध्ये आपण वाहन उद्योगातले विविध घटक आणि त्यांचा परस्पर संबंध याविषयी माहिती घेतली. महाग गाड्या का महाग होत असतात हे आपण पाहिलं. त्यातले आणखी बारकावे समजण्यासाठी थोडी अधिक माहिती घेऊयात.

जडण-घडण 10

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 22/08/2014 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफीसमध्ये जाणं शक्यच नव्हतं. फोन करून कळवलं. शिकवण्या बंद होत्या आठवडाभर, त्यामुळे मुलं नव्हती. खूप चिडचिड व्हायची माझी. असं आजारी होऊन पडून राहणं अजिबात आवडत नव्हतं आणि ऑफीसमधलं काम आवडू लागलं होतं. त्यात हा खंड. आतापर्यंत वर्षभरातून फारतर एकदा, ते सुद्धा तापाचं आजारपण. त्यात सुद्धा दोन दिवसांच्या वर नाहीच. त्यामुळे कांजण्यांचा त्रास जरा जास्तच जाणवत होता. मग जवळ राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला मॅडम आजारी असल्याचं समजलं. इयत्ता चौथीतला विद्यार्थी. मला बघायला घरी आला. मी झोपले होते. तो आल्यावर डोळे उघडून त्याच्याशी बोलले, अभ्यासाबद्दल विचारलं. उठता मात्र नाही आलं मला, अगदीच गलीतगात्र झाले होते.