भारताला वाघा सीमारेषेवरील प्रात्यक्षिकाची खरंच गरज आहे काय?
यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत मी उत्तरभारतात सहली निमित्त जावुन आलो. त्या सहली मध्ये एक ठिकाण हे "वाघा सीमारेषा (बॉर्डर)" होते . रोज संध्याकाळी सीमारेषेजवळ हा फक्त ६.०० ते ६.३० असा अर्ध्या तासाचा ध्वज संचालनाचा कार्यक्रम होतो.
त्यासाठी अमृतसर येथुन २८ कि.मी. अंतर पार करुन सर्व पर्यटक खाजगी अथवा सार्वजनिक वाहन पकडुन दु. ३.०० वाजल्या पासुनच मुख्य कार्यक्रम स्थळाच्या सुमारे २.३० कि.मी. अलिकडे असलेल्या पहिल्या सुरक्षाकड्यापाशी रांग लावतात. आम्हालाही आमच्या संयोजकाने हा कार्यक्रम बघण्यासाठी दुपारी ४.३० ला तिथे नेले.
मिसळपाव