जडण-घडण 10
ऑफीसमध्ये जाणं शक्यच नव्हतं. फोन करून कळवलं. शिकवण्या बंद होत्या आठवडाभर, त्यामुळे मुलं नव्हती. खूप चिडचिड व्हायची माझी. असं आजारी होऊन पडून राहणं अजिबात आवडत नव्हतं आणि ऑफीसमधलं काम आवडू लागलं होतं. त्यात हा खंड. आतापर्यंत वर्षभरातून फारतर एकदा, ते सुद्धा तापाचं आजारपण. त्यात सुद्धा दोन दिवसांच्या वर नाहीच. त्यामुळे कांजण्यांचा त्रास जरा जास्तच जाणवत होता.
मग जवळ राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला मॅडम आजारी असल्याचं समजलं. इयत्ता चौथीतला विद्यार्थी. मला बघायला घरी आला. मी झोपले होते. तो आल्यावर डोळे उघडून त्याच्याशी बोलले, अभ्यासाबद्दल विचारलं. उठता मात्र नाही आलं मला, अगदीच गलीतगात्र झाले होते.
मिसळपाव