Skip to main content

प्रकटन

माझी आजी

लेखक rakhee यांनी बुधवार, 07/05/2014 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आजी माझी आजी जिने नुकतीच वयाची ९६ वर्षे पूर्ण केली. हि माझ्या वडिलांची आई ,तिच्यासाठी हा लेख . गोदु आजी म्हटलं कि माझ्या मनात एक करारी व्यक्तिमत्व उभं राहत . लहानपणापासून आजीचा एक दरारा वाटत आला आहे .तिचं व्यक्तिमत्वच तसं आहे. तिचि या वयातही स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय, वाचनाची आवड ,सतत कामात गुंतवून ठेवण्याची आवड सगळंच थक्क करणारं आहे . या वयातही तिने स्वतःला ताज तवानं ठेवलेलं आहे . आम्हा सर्व तरुण मंडळींसाठी ती एक मोठी प्रेरणाच आहे. ती एक fighter आहे . Cancer बरोबरची लढाई तिने सहज जिंकली .

थरार : नको इतका जवळून !!

लेखक चिगो यांनी मंगळवार, 06/05/2014 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
धिक्कार ते अधिकार नावाची माझी लेखमाला मिपावर यायला आता चार वर्ष झालीत. ह्या चार वर्षांत मिपाच्या आणि माझ्या आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. "अधिकारानंतरचं वाचायला उत्सुक आहे" म्हणणारे श्रामो आणि यकु माझे हे अनुभव वाचायला नाहीत, ही बोचही आहेच. पण आयुष्याच्या पुलाखालून वाहणार्‍या ह्या पाण्यात रक्ताचा गढूळ रंग आता मिसळायला पाहतोय म्हटल्यावर विचार केला की चला, काही अनुभव लिहून ठेवुयात..

आव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 06/05/2014 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशाला ज्या अवघड प्रश्नांचा मुकाबला गेल्या काही वर्षांत सातत्याने करावा लागत आहे त्यांत काश्मीरातील, पाक-प्रायोजित छुप्या युद्धाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या विषयावरील, ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांचेसारख्या जाणकार व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक १०-०५-२०१४, शनिवार रोजी, पुण्यात प्रकाशित होत आहे. ह्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी माझेकडूनच करून घेतलेला आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे.

मुंबई गर्ल !

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 05/05/2014 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
परवाचीच गोष्ट. तब्येत बरी नसल्याने ऑफिसला अर्ध्या दिवसाने जात होतो. दुपारची वेळ, प्लॅटफॉर्म क्रमांक ‘१’ वर बेलापूर ट्रेनची वाट बघत उभा होतो. इतक्यात पलीकडल्या रुळावर बोरीबंदरला (आताच्या सीएसटीला) जाणारी ट्रेन लागली. आपल्याला जायचे नाही त्या दिशेची ट्रेन आधी येणे हे नेहमीचेच. मलाही तशी काही घाई नव्हती पण उकाड्याने जीव हैराण झाल्याने फलाटावर फार वेळ ताटकळत उभे राहण्यात रस नव्हता. पण या तप्त वातावरणातही समोरच्या ट्रेनला काही वीर दाराला लटकलेले दिसत होते. रोजचेच असल्याप्रमाणे त्यांच्या आपापसात कुचाळक्या चालू होत्या. आत बसायला जागा असूनही उन्हे झेलत बाहेर दाराला लटकण्याचे ते एक कारण असावे.

महाराष्ट्रातल्या निवडणूकीचे अंदाज

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 03/05/2014 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत... त्यातल्या किती जागा कोणाकडे जातील... सगळ्यांना उत्सुकता आहे याबाबतचा अंदाज वागळेंच्या कार्यक्रमातला वर्तवण्यात आला आहे आपण तो अवश्य पहावा https://www.youtube.com/watch?v=itWhYgG4It0 काँग्रेस-राष्ट्रवादी १६-१८ महायुती - ३०-३२ यात मनसेचा एखादा उमेदवारही असू शकतो- कल्याण सुरेश म्हात्रे सिंधुदुर्गमधल्या लढतीची सगळ्या महाराष्ट्राला उत्कंठा आहे... मुंडेंना ही निवडणूक अवघड जाइल... विदर्भ लाटेमधे वाहून जाईल मावळमधे कुणीही आलं तरी मताधिक्य मात्र अगदी कमी असेल...

चलती का नाम गाडी- ४: प्रदूषण नियंत्रण ( युरो नॉर्मस )

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 02/05/2014 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स आपण सगळ्यांनी कधीतरी दुचाकी किंवा कार नक्कीच चालवलेली असते. दुचाकीवर फिरण्यात जी मज्जा आहे ती चारचाकीतून नाही! मस्त कट मारत अगदी जिथे जायचंय तिथे अगदी पायरीपर्यंत थेट जाता येतं. अलीकडे बाइकच्या दोनच गोष्टी नकोशा वाटतात एक त्यातली असुरक्षितता आणि प्रचंड प्रदूषण!

विविधतेतील एकटा

लेखक जयनीत यांनी मंगळवार, 29/04/2014 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
" तुम्हाला हिंदी येते? " " येते तुटकी फुटकी " " कोकणी येते? " " नाही " " अहिरणी " " अं? " " गोंडी? " " नाही " " तेलगु? " " नाही " " तुळु " " ही कुठली भाषा? " " तमिळ " " नाही " " ओरिया " " नाही " " बांग्ला " " नाही हो नाही " " भारत इतका विविधतेने नटलेला देश आहे अन तुम्हाला तुमची मातृभाषा सोडून कुठलीही दुसरी भाषा धड येत नाही, खंत नाही वाटत? " " वाटते ना! " " कसची? " " इंग्लिश नाही येत ना त्याची! "

मैत्र

लेखक सुवर्णमयी यांनी सोमवार, 28/04/2014 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व फोरम्स वर श्रावण मोडक याच्या लेखनाचे दुवे एकत्रित केलेले आहेत. त्याचे पुस्तक वा ईबुक कालांतराने होणार होतेच. कमीत कमी किमतीची वा फ्री ईबुक्स हा त्यांचा आणि साहित्यसंस्कृतीचा एकमत असलेला सुरुवातीपासूनचा महत्त्वाचा मुद्दा! त्या अनुषंगाने उचलेले हे आणखी एक पाऊल.- श्रावण मोडक यांच्या लेखनातली व्यक्तीचित्र आता ई बुक स्वरूपात उपलब्ध आहेत.लवकरच त्यांच्या कथा आणि काही नोंदी यांचे ईबुकही प्रकाशित होईल. त्याचे सर्व हक्क श्रीमती लीला मोडक यांच्याकडे आहेत.

अचानक ठरलेला दिल्ली कट्टा: एप्रिल २६, दुपारी ४ वाजता.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 25/04/2014 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आजच अचानक दिल्लीत कट्टा करण्याचे ठरले. सध्या विवेक पटाईत, अरूण जोशी आणी मी, शिवाय एकदोन मिपाचे नियमित वाचक, असे मिळाले. आणखी कुणी मिपाकर दिल्लीत रहात असतील, वा सध्या इकडे आलेले असतील, तर अगदी जरूर यावे. कुठे: त्रिवेणी कला संगम, (कॅफेटेरिया) तानसेन मार्ग, (मंडी हाऊस सर्कल जवळ) नवी दिल्ली. 'मंडी हाऊस' नावाचे मेट्रो स्टेशन अगदी जवळच आहे. वेळः दुपारी ४ वाजता. . सुंदर आणि मोकळी जागा आहे, निवांत गप्पा करत बसायला छान.

भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 24/04/2014 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचार मंत्र्यात नाही, भ्रष्टाचार नाही मंत्रालयी, भ्रष्टाचार सोडून देईल, अशी कोणाची स्वकमाई, भ्रष्टाचार मेडीकल बिलात नांदे, भ्रष्टाचार टॅक्सरिटर्नमध्ये कोंदे भ्रष्टाचार ब्ल्याकच्या तिकिटात, भ्रष्टाचार आहे डोनेशनात भ्रष्टाचार शोधूनिया पाही, भ्रष्टाचार सर्वाभूतां ठायी भ्रष्टाचार तिजोरीत ना मावे, स्विसखात्यात ना दावे भ्रष्टाचार आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे तुझ्या-माझ्या जड देही भ्रष्टाचार भरूनिया राही भ्रष्टाचार जरी अवगुण, भ्रष्टाचार सत्तेचे कारण निवडणूक येई, निवडणूक जाई, भ्रष्टाचार आहे तैसा राही ----पगला गजोधर