सुरक्षित खिडकी
"सेफ विंडो म्हण्जे काय ग मम्मा"
.........................................
़जेवणानंतरचा बिकानेरी सोहन हलवा रंग दाखवत होता. सी.एस.टी ला ठाणे लोकल ला खिडकी पकडुन हिशोब पुरा करायचा बेत केला. रविवार असल्यामुळे खिडकी सोडता गाडी रिकामी होती. एकुलती एक माझ्यासाठी वाट बघत होती. गाडी सुटायला ५ मिनिटे होती. डुलकी लागतच होती इतक्यात " मम्मा मला विंडो" चा हट्ट कानावर आला. डोळे उघडले. ६ वर्षाचे २.५ फुटाचे १०० वॅट डोळे "फुल्ल अॅटीट्युड" माझ्याकडे रोखुन बघत होते. मी मुकाट्याने समोरच्या बाकावर बसलो. मम्मा आणि मम्माच्या ठम्माने एका सुरात "थँक्यु".
मिसळपाव