खूब-रुयोंसे यारियाँ न गयी..
हसरत मोहानी.. मौलाना हसरत मोहानी हे भारतातले शायर. प्रेमाच्या शायरीसोबत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार्यांपैकी एक ठळक मनुष्य. सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्यांपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचा खास समर्थक.
तुरुंगवास तर खूपच सोसलेला. तुरुंगातही बरंच काव्य केलेलं आहे. त्याच्या फ्रीडम फायटर या अंगापेक्षा आज आत्ता त्याची ही एक गझल इथे आठवण्याची इच्छा होतेय. सगळेच शेर नाही घेत इथे. थोडेसेच.. पण अगदी पुरेसे. यातली अर्थाची समजूत ही निव्वळ एक विशिष्ट एकट्याने ऐकताना झालेली समजूत आहे. शेर वेगवेगळ्या लोकांना खूप वेगळं काहीतरी सांगतात..
मिसळपाव