त्रैराशिक
नमस्कार मिपाकर. इथल्या शतशतशब्द कथा वाचून मला पण काही लिहावसं वाटलं.
त्यात त्रिशतशब्दकथा असा प्रयोग केलाय. व्याकरणाच्या चुकाबद्दल क्षमस्व.
पहिल्या लेखनाचे स्वागत कराल अशी अपेक्षा.
________________________________________________________________________
ह्यालो
बोल ग हिरॉईन
आयक की रव्या. मला कनाय राव्हल्या भेटला होता.
तूच बोंबलत गेली आसचील. आता म्या नाहीना गावात. काय भरोसा नाय तुझा.
हा. तू लै शिटीत सवळाच राह्यलास जनू. मी हाय म्हनून नायतर छप्पन्न फिरतेत माझ्यमागं.
हा म्हैते लै फेरनलवलीची औलाद.
ते जौ दे. पह्यले मला सांग किती मरतोस माझ्यावर?
म्या व्हय? समज बत्तीस जीबी तर आसंन.
मिसळपाव