Skip to main content

प्रकटन

गती

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 06/07/2015 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते. काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही. सर्व चराचर सृष्टी सततच बदलत असते.

होठोंपे मुहब्बत के फ़साने नहीं आते

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 03/07/2015 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
गविशेटांनी जो सिलसिला सुरू केला, त्यात आपणही भर घालावी असा मोठ्या धैर्याने निर्धार करतो आहे. अहमद फराज़, फैज़, हसरत झालेत. तेंव्हा एका आणखी वेगळ्या शायरची एक ग़ज़ल व जमेल तसा अर्थ इथे देतो आहे. :) ते शायर म्हणजे बशीर बद्र. अयोध्येत जन्म झालेल्या या शायरने अनेक ग़ज़ल, नज़्म लिहिल्या. तशी सोपी भाषा आणि सामान्यतेतील असामान्यता टिपण्याची हातोटी यामुळे बशीर बद्र यांना लोकप्रियता मिळाली. त्यांचे अनेक शेर म्हणजे मास्टरपीस आहेत.

आयुष्य आणि करीअर...

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 02/07/2015 03:32 या दिवशी प्रकाशित केले.
career
चिनार यांच्या माझं करीयर मार्गदर्शन (!) या लेख व प्रतिसादांवरून सुचलेले व कायम साचलेले विचार आणि निरिक्षण (काही चुकत असेल तर अवश्य सांगा): एखाद्या विद्याशाखेचं पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर 'आता काय करू?' हा प्रश्न जर उभा राहत असेल तर आडातच समस्या आहे असं माझं मत आहे. दहावीचा निकाल लागेपर्यंत लोक्स निर्धास्त असतात. "पुढे काय करणार?" असं विचारल्यावर "किती मार्क्स मिळतात त्यावर ठरवू" असं उत्तर देतात.

ना गंवाओ नावक ए नीमकश..

लेखक गवि यांनी बुधवार, 01/07/2015 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
फैझ अहमद फैझ. फराझसोबत साधारण समकालीन असलेला हा आणखी एक पाकिस्तानातला शायर. शायरच नव्हे, तर तो आणखीही बरंच काही होता, या शायराचं नाव साहित्याच्या "नोबेल"साठी अनेकदा स्पर्धेत होतं. जागतिक शांततेसाठीही कायकाय मिळालं त्याला. पण अबोव्ह ऑल, आपल्यासाठी तो एक "दिल के पास" असलेला शायरच. त्याची एक गझल इक्बाल बानूच्या हेलावून टाकणार्‍या आवाजात ऐकली आणि ती कायमची मनात वसतीला आली. तिचे शब्द एव्हाना मला समजले आहेत.. पण.. नेमकं कोणाला उद्देशून आणि कोणत्या परिस्थितीत हे शब्द इतके आर्तपणे म्हटले जाताहेत हे अजूनही कळत नाही. वेगवेगळे अर्थ लागल्यासारखे वाटतात पण वाळूसारखी सटकून जाणारी गजल आहे हेच खरं.

धुंदी कळ्यांना! भाग-२

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 30/06/2015 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ "सांग काय आहे तुझी अट?" अभि म्हणाला. "अभि, मला माझ्यावर झालेल्या रेपची केस पुन्हा ओपन करायची आहे. तू म्हणशील मागच सगळं विसरून नवी सुरुवात करू ,पण अभि मी नाही करू शकत आता अशी सुरुवात. मला आता हेही माहित नाही की मला जे साध्य करायचं आहे ते मिळणार आहे की नाही, पण एवढं नक्की माहितीये की एकदा ही केस पुन्हा सुरु झाली की मला मागे वळून नाही पाहता येणार. माझ्याशी निगडीत किती तरी गोष्टी बाहेर सगळ्या जगाला माहित होतील, तुला मान्य असेल अशा मुलीसोबत पुन्हा संबंध ठेवणे? मला तुझ्याकडून होकाराची अपेक्षा नाहीये अभि. तू नाही म्हणालास तरी काही हरकत नाही.

आमचेही प्रवासवर्णन…

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 29/06/2015 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
Jack_Bauer भाऊंचे उसगावच्या दौर्‍याचे प्रवास वर्णन वाचून आम्हालाही आमी लिहीलेल्या एका प्रवासवर्णनाची आठवण झाली. तेव्हा मुक्तपिठ नामक मुक्तपिठल्यावर गाजत असलेल्या कुणा काकुंच्या अमेरिकेचे प्रवासवर्णन वाचून आम्हालाही प्रेरणा झाली होती. (प्रवासवर्णन लिहिण्याची प्रेरणा) आता ते इथे टाकावं की नको, पोस्टू की नको करत एकदाचं पोस्टूनच टाकलं. ******************************************************** मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. आम्ही (आम्ही म्हणजे अस्मादिक आणि सौभाग्यवती) चक्क झोप्या मारुतीच्या देवळामागे असलेल्या भाजी मंडईत आतपाव मिरच्या आणि कोथिंबीर-कडीपत्ता आणावयास गेलो होतो.

"मालवून टाक दीप"

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 29/06/2015 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
ती संध्याकाळ मंतरलेली…। या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे. १) "मालवून टाक दीप" हे गाणे तसे लहानपणापासून कधीमधी ऐकायला येत असे. परंतु त्याचा खोल अर्थ केंव्हा कळला ते असे. आमचे लग्न ठरले होते १९९२. तेंव्हा (होणारी) बायकोचे माहेर पनवेलला. ते खरेदी साठी दागिने बनवण्यासाठी पुण्याला येत असत. असे दोन वेळेस ते ५- ५ दिवस पुण्यात आलेले होते. माझी नोकरी चालू होतीच ए एफ एम सी मध्ये आणि एम डी पण चालू होते. तेंव्हा सोलापूर रोड ला मला दीड खोलीचे क्वार्टर्स मिळालेले होते. चार वाजता मी डिपार्टमेंट मधून सुटत असे. चहा घेऊन तयार होऊन सेंट बिंट मारून तयार होत असे.

रिटर्न गिफ्ट

लेखक रातराणी यांनी रविवार, 28/06/2015 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज तोही आला होता त्याच्या आईबरोबर. ठिगळ लावलेला शर्ट आणि मळकी पँट.

खूब-रुयोंसे यारियाँ न गयी..

लेखक गवि यांनी गुरुवार, 25/06/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
हसरत मोहानी.. मौलाना हसरत मोहानी हे भारतातले शायर. प्रेमाच्या शायरीसोबत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार्‍यांपैकी एक ठळक मनुष्य. सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्‍यांपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचा खास समर्थक. तुरुंगवास तर खूपच सोसलेला. तुरुंगातही बरंच काव्य केलेलं आहे. त्याच्या फ्रीडम फायटर या अंगापेक्षा आज आत्ता त्याची ही एक गझल इथे आठवण्याची इच्छा होतेय. सगळेच शेर नाही घेत इथे. थोडेसेच.. पण अगदी पुरेसे. यातली अर्थाची समजूत ही निव्वळ एक विशिष्ट एकट्याने ऐकताना झालेली समजूत आहे. शेर वेगवेगळ्या लोकांना खूप वेगळं काहीतरी सांगतात..