आत्महत्या!
आज तो येउन गेला. असे म्हणा ना की येण्याची नुसती वर्दी देउन गेला. आताशा तो असेच करतो, नुसते कळवतो आणि कित्येक दिवस मग तोन्ड्च दाखवत नाही. मग कित्येक दिवस मी नुसता तगमगत रहातो. तो आल्यावर काय करायचे याचे बेत डोक्यात घोळवत!
पण त्याला सहसा सोयर-सुतक नसते त्याचे. तो ही काय करणार म्हणा...आज काल हवाच अशी वहाते की त्याचाही नाइलाज होत असणार. तो येणार म्हटले ना की खूप तरतरी असते पण....मी विचार करतो, आपण किती वेडे आहोत! तो काही आपल्याकरिता खचितच येत नाही. आपण आपले उगीच त्याला अवास्तव महत्व देउन त्याच्या आजुबजूला आपले जीवन जगत रहातो. मी मग निश्चय करतो, ह्या वेळी आपण तसे नाहीच वागायचे जसे नेहमी वागतो.
मिसळपाव