मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मत

पैशाचे झाड- भाग ४

अतरंगी ·
लेखनप्रकार
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 विनितची तब्येत हळूहळू सुधरायला लागली होती. तोडकं मोडकं का होईना समोरच्याला कळेल असे तो बोलायला लागला होता, शरीराची पण थोडीफार हालचाल करायला लागला होता. विनितला आलेल्या अ‍ॅटॅक नंतर नेहमीच्या मैफिलींमधे जरा खंड पडलाच होता. बर्‍याच महिन्यांनी अचानक एके दिवशी नित्याने प्लॅन बनवला. त्याच्याच घरी पार्टी ठेवली होती. बरेच दिवस झाल्याने सगळेच एकमेकांना भेटायला आतुर होते. वेळात वेळ काढून सगळेच जमले.

पैशाचे झाड भाग :-३

अतरंगी ·
लेखनप्रकार
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 " अभ्या कुठे आहेस?" " गावातच आहे, का रे?" "विनितला पॅरेलेसिसचा अ‍ॅटॅक आलाय, रुबीला नेलंय. " " निघतो लगेच. पंधरा मिनिटात पोचतो.' एकेचाळीसाव्या वर्षी अ‍ॅटॅक यायला विनितची अनुवंशिक जाडी, त्याचे कामाचे स्वरुप, खाण्या पिण्याच्या सवयी, सगळेच कारणीभुत होते. कमी हालचाल, त्यात त्याला व्यायमाची फार आवड नव्हती. सगळेच जमेल तसे धावत पळत रुबीला पोचले. सगळ्यांनाच हा मोठा धक्का होता. रोजच्या बसण्या ऊठण्यातल्या मित्रावर ओढवलेली ही परिस्थिती , त्याची ती अवस्था पाहून सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.

पैशाचे झाड भाग :-२

अतरंगी ·
लेखनप्रकार
पैशाचे झाड भाग : १. https://www.misalpav.com/node/51032 हो नाही करत शेवटी ऐन वेळी कोणाचेही कॅन्सल न होता, कोणतेही विघ्न न येता, ठरल्याप्रमाणे सगळा गृप कोकण ट्रिपला निघाला. बर्‍याच दिवसांनी सगळे जण एकत्र ट्रिपला निघाल्यामुळे थट्टा मस्करीला पार ऊत आला होता. क्षणाक्षणाला हसण्याचे फवारे फुटत होते. नवे- जुने संदर्भ घेऊन एकेकावर धपाधप जोक्स पडत होते. प्रत्येक वेळेस मुले गाडीतच पेग भरायला लागली की आनंदच्या मनात धाकधूक होत होती. अजून नव्या गाडीची नवलाई संपली नव्हती. पाच जणात दोन खंबे कधी संपले पत्ता पण नाही लागला. खंबे संपले तसे सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली.

पैशाचे झाड- भाग १

अतरंगी ·
लेखनप्रकार
"हॅलो" "बोल" " कुठे आहेस?" " घरी" "किती वेळ लागेल?" "का?" "अरे, का म्हणजे? तू येतोएस ना? सगळे थांबले आहेत?" "कोण थांबले आहेत? आणि कुठे?" विनितला कळेचना की, हा असा का बोलतोय? "अरे तू गृपवर मेसेज नाही पाहीले का?" "नाही, माझा स्मार्ट फोन बंद आहे. काय झालं? " "नित्याच्या घरी सगळे बसलोय ये लवकर.." "स्टॉक आहे की घेऊन येऊ?" "अरे तीन खंबे आहेत, सगळे आज लोळत नाहीतर झिम्मा खेळतच घरी जाणार आहेत.

'खास' पुस्तकलेखकांचे अंतरंग

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या साठ वर्षात मराठी साहित्यात अनेक प्रकारची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्रे आणि संकीर्ण अशा साहित्यप्रकारांचा समावेश आहे. प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके काही वाचकांना आवडली व भावली. त्यातली काही खऱ्या अर्थाने गाजली, काही गाजवली गेली तर अन्य काही दुर्लक्षित राहिली. या कालखंडात अनेक लेखकांनी सातत्याने लेखन केले. त्यापैकी काही लेखक खरोखर वाचकप्रिय झाले. अशा लेखकांच्या काही पुस्तकांनी एक साहित्यिक मानदंड निर्माण केला.

कांतारा ए लेजेंड

अनुस्वार ·
कटाक्ष - मुळ‌ कन्नड चित्रपट नाट्य, थरारपट वेळ - २ तास ३० मिनिटे हिंदी परभाषीकरण (डबिंग) ओळख - नावातल्या 'ए लेजेंड' नुसार चित्रपटाची कथा एका आख्यायिकेवर बेतलेली आहे. कर्नाटकातील काही ग्रामीण लोकसंस्कृतींमध्ये आढळणाऱ्या 'भूता कोला' या परंपरेशी संबंधित ही आख्यायिका सांगून चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटात या परंपरेचा केवळ 'कोला' असा उल्लेख असून या कार्यक्रमाच्या उत्सव मुर्तीला 'देव' म्हणतात. हे देव गावातील कुणीही व्यक्ती असू शकते. एरवी सामान्य माणूस म्हणून जगणाऱ्या या व्यक्तीच्या शरीरात 'कोला'च्या वेळी वनदेव संचारतात अशी मान्यता असते.

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

पराग१२२६३ ·
लेखनप्रकार
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

पराग१२२६३ ·
लेखनप्रकार
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.

खरचं गरज आहे का?

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला पेरणा एकदा सुट्टीवर गेलो होतो. टाईमपास म्हणून डॉक्टर मित्राच्या दवाखान्यात बसलो होतो. बऱ्यापैकी गर्दी होती. रोगी येत होते, मित्र त्यांना तपासून औषधे गोळ्या, इंजेक्शन इ. देत होता. मला पण बर्‍यापैकी वैद्यकीय क्षेत्रात अनुभव म्हणून त्याच विषयावर अधून मधून गप्पा चालू होत्या. मित्र रोगी तपासत असताना मी रोडवर येणारे जाणारे बघत आपले मनोरंजन करत होतो. कुणी ओळखीचा आसेल तर हाय,हॅलो. कधी आला,कधी जाणार टाईप विचारपूस.

मला आवडली (न समजार्‍या) इतर भाषेतील गाणी

Trump ·
लेखनविषय:
मिपावरील (खफवरील) पुरंदर चर्चेवरुन गाडी कधी आ आंटेवर पोचली आणि मन अगदी जुन्या आठवणीत निघुन गेले. महाराष्ट्रात अगदी न समजार्‍या गाण्यांनी धुमाकुळ माजवला होता, आणि अजुनही आहे.