मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

स्वप्निल टीम: दोन लघु कथा

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
फायनल मॅच होती. राजेशने मैदानात उतरताच पाहिल्याच ओवर मध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार्‍या पहिल्या दोन चेंडूवर बेकफुट वर जाऊन ऑफ साईडला दोन चौकार मारले. या सीझनचे त्याचे पाचशे रन ही पूर्ण झाले. तिसरा चेंडू सरळ आला. राजेश आधीच बेकफुट वर गेला होता. त्याने त्या चेंडूला समोर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बैटला लागला नाही. राजेश ने मागे वळून पाहिले आणि रागात बैट जमिनीवर पटकला. पण त्याच्या काही फायदा होणार नव्हता. त्याचा त्रिफळा उडालेला होता. राजेश आऊट झालेला होता. तो पेवेलियन मध्ये परतला. त्याच्या फ्रेंचाईसच्या मालकिणीने त्याच्या कडे पाहून थंब्स अप केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने

कपिलमुनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भारताच्या सामाजिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली, भारताचे संविधान लिहिले . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अजून एक पैलू म्हणजे त्यांचे इकॉनॉमिक्स या क्षेत्रातील योगदान! त्यांनी या विषयात अनेक डिग्री मिळवल्या आणि त्यांनी यात त्यांची डॉक्टरेट पण मिळवली होती . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय आणि त्याचे भारतीय इतिहासातील महत्त्व आपण या लेखात बघणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान विचारवंत, समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

ढेरी पॉमपॉम - बालकथा

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ढेरी पॉमपॉम ---------------------------------------------------------------------------------- माझी आई मला ना ढेरी पॉमपॉम म्हणते . असं म्हणतात का एखाद्याला ? आता आहे माझी ढेरी पॉमपॉम ! थोडीशी मोठी . थोडीशी गोलगोल . मला नाही आवडत असं . ती ना थोडीशी खोडकर आहे . पण काय करणार ? आईसाहेब आहेत ना . हा शब्द मी कुठून घेतला ? तर - बाबा तिला बाईसाहेब असं म्हणतात . अन गंमत सांगू ? - खरं तर बाबांची ढेरी तर जाम पॉमपॉम आहे . मग ती त्यांना असं म्हणत नाही ते . पण मी म्हणते बरं का बाबांना - ए ढेरी -ए पॉमपॉम ! पण ते ना माझ्यावर रागवत नाहीत . पण एकदा गंमत झाली . आई त्यांनाही म्हणाली - ढेरी पॉमपॉम !

राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन २

माहितगार ·
लेखनप्रकार
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. परवा भाबडीची आई देवा घरी गेली. खरे म्हणजे पुण्यात स्लो लर्नर भाबड्या मुलांसाठी विद्याज्योती नावाची एक विशेष शाळा आहे, तिथे त्यांना समाजात सामावून घेण्यासाठी साजेसे शिक्षण सॉफ्ट स्कील व व्होकेशनल शिक्षण उपलब्ध आहे. विद्याज्योती शाळेबद्दलच्या या युट्यूब डोक्युमेंटरीनुसार दर शंभरातील पाच व्यक्ती स्लोलर्नर असू शकतात.

शंतनू नायडू- ध्यास घेतलेला माणूस

मार्गी ·
लेखनप्रकार
✪ शंतनू नायडूची प्रेरणादायी मुलाखत ✪ वाचनासाठी पुरस्कार देण्याची वेळ येऊ नये ✪ "मला रतन टाटांबद्दल प्रश्न विचारू नका!" ✪ मुंबई बूकीज- निसर्गात वाचण्याची चळवळ ✪ पुस्तकं डोनेट करणं सोपं, पण मांडीवर घेऊन वाचनाची गोडी लावणं कठीण ✪ Good fellows India – नातवंड भाड्याने देतो! ती वेळ आलेली आहे ✪ रतन टाटा माझ्यासाठी "डंबलडोर" होते! ✪ आई शिक्षिका. पण घरी शिक्षिका व शाळेत आई ✪ आई म्हणते, मराठी मुलगी मिळाली तर बरं होईल! सर्वांना नमस्कार. काही‌ दिवसांपूर्वी लोकमत साहित्य पुरस्कार कार्यक्रमामध्ये टाटा मोटर्समधील जनरल मॅनेजर शंतनू नायडूची मुलाखत बघितली! शंतनू नायडू! आदरणीय रतन‌ टाटांचा तरूण मित्र!

ग्रोकबद्दलची किरकिर आणि तरूणांमधील कॅन्सर

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ग्रोकबद्दलची किरकिर आणि तरूणांमधील कॅन्सर ========================= भारतीय समाजात अजुनही ए०आय० बद्दल जी किरकिर चालू आहे, त्यामुळे मी खूप व्यथित झालो आहे. त्यात "ग्रोक" या ए०आय० वर बरेच जण चिखलफेक करत असल्याने मला ग्रोक बद्दल उत्सूकता निर्माण झाली आणि तथ्य शोधायला सुरुवात केली. माझ्या ग्रोक बरोबरच्या संवादात त्याने मला कोणतीच तर्‍हेवाईक उत्तरे दिली नाहीत, पण त्याने केलेल्या "लिटरेचर सर्व्हेने" मी अचंबित झालो. नेमके याच वेळेस माझ्या ओळखीच्या एका डॉ०नी मला एका सेमिनारमध्ये व्याख्यान देणार असल्याचे सांगितले.

शुक्र दोन वेळेस दिसण्याची दुर्मिळ स्थिती (50 अंश उत्तरेवरील मिपाकरांसाठी)

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शुक्र दोन वेळेस दिसण्याची दुर्मिळ स्थिती (Wonderful dual visibility of Venus!) नमस्कार. आपल्याला माहितीच आहे की, शुक्र पहाटेचा तारा किंवा संध्याकाळचा तारा (an evening star or a morning star) म्हणून ओळखला जातो. कारण तो एक तर पहाटे दिसतो किंवा संध्याकाळी दिसतो. पण ही स्थिती एकदा एकच असते. जर शुक्र संध्याकाळी सूर्यानंतर मावळत असेल, म्हणजे संध्याकाळी दिसत असेल, तर सकाळी सूर्य शुक्राच्या आधी उगवेल व त्यामुळे शुक्र पहाटे दिसू शकणार नाही. आणि जर शुक्र सूर्याच्या पूर्वेला असेल, तर फक्त तो पहाटेच दिसेल. पण एका दुर्मिळ स्थितीमध्ये शुक्र दोन वेळेस दिसू शकतो.

अंतराळ स्थानक बघण्याचा सोहळा आणि लखलखत्या तार्‍यांची मांदियाळी!

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. ८ मार्चच्या शनिवारी लोणावळ्याच्या जवळ अंजनवेल ऍग्रो टूरीझम इथे मी व माझा मित्र गिरीश मांधळे- आम्ही आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेतला. महिला दिनी अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स असलेलं स्पेस स्टेशन बघण्याचा थरार सर्वांनी अनुभवला! त्याशिवाय शुक्राची कोर, गुरूच्या उपग्रहांचा लपंडाव, चंद्रावरचे कित्येक विवर, पहाटेच्या आकाशातले तारकागुच्छ, आकाशगंगेचा दुधाळ पट्टा, सकाळी ट्रेकिंग व ध्यान आणि समारोपाला सूर्य डागाचं निरीक्षण अशी खूप पंचपक्वान्नांची मेजवानी तिथे मिळाली. त्या अनुभवाचं हे शब्दचित्र आपल्यासोबत शेअर करत आहे.

नववधू प्रिया मी..

सर्वसाक्षी ·
लेखनप्रकार
साधारण पस्तीस वर्षे झाली असतील या गोष्टीला विजा लग्न ठरल्याची बातमी घेऊन आला. आमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वात लहान. गेल्या पाचेक वर्षात एकेक करून जवळपास सगळ्यांची लग्न होऊन गेली होती. नेहमी प्रमाणे सर्वांनी मुलगी कोण कुठली काय करते अशी सरबत्ती केली. वर पार्टीची मागणी होतीच. सगळ्यांनाच हुरूप आला, एक नवा कार्यक्रम मिळाला. त्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे सबकुछ मित्र मंडळी सांभाळायची. सर्वांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं सर्वांचे आईवडील आपल्या मुलांच्या मित्रांना घरचेच समजायचे. लग्न पार पडणं ही सामूहिक जबाबदारी असायची आणि ती हौसेने पार पाडली जायची.

बाजाराचा कल : १० मार्चचा आठवडा

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : १० मार्चचा आठवडा ==================== मागच्या भाकीतात क्लेमास्पेस डायग्रॅममध्ये मार्केट वर जाण्याची शक्यता १००% दाखवली होती, तसेच मार्केट डुबकी मारून स्थिर होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे मार्केटने अगोदर तळ गाठला आणि मग उसळी मारली. माझ्या अल्पमती प्रमाणे मार्केटने सध्या तरी तळ गाठला आहे, पण हे माझे वैयक्तिक मत आहे. काही तज्‍ज्ञ अजूनही घसरगुंडीची शक्यता असल्याचे सांगत आहेत. पुढच्या तिमाहीने निराशाजनक आकडे दाखवले तर कदाचित हे शक्य आहे.