Skip to main content

लेख

घेई छन्द मकरंद - होमिओपॅथीचा भाग २ रा

बुधवार, 18/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
. काली फॉस उर्वरीत भाग.आणखी काही औषधे मस्तिष्का संबंधीची याचं संदर्भातील विशेष +++++ ४ ) Aethusea-------- Fool”s Parsley या औषधाविषयी थोडंस डॉ. क्लार्क यांनी “डिक्शनरी ओफ़ प्रेकटीकल मटीरि-यल मेडीका मध्ये म्हटलं आहे, या औषधाचे दुसरे नाव एवढे सार्थ आहे की “”हे औषध मुर्खाचे”च आहे, परमेश्वराने मेंदूत अक्कल भरली तेंव्हा हा पाल्य गैरहजर असावा, कारण काहीं म्हणता कांहीही आकलन करण्याची, समजून धेण्याची पात्रताच या मुर्खाकडे नसते.

बीज अंकुरे अंकुरे (शेतातील बालपण)

लेखक जागु
मंगळवार, 17/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी. माझे बालपण आमच्या शेताच्या सहवासात बागडण्यात गेले. आई-वडील दोघेही नोकरी सांभाळून शेती करायचे. माझी आई प्रार्थमिक शिक्षिका, वडील मुंबईत प्रीमियर कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यांनी शेती सांभाळायची म्हणून कायम नाइट शिफ्ट केली. घरात माझा मोठा भाऊ व आजी असे आमचे कुटुंब होते. शेतकरी आणि शेत हे दोन्ही एकरूप झाले म्हणजे मोतीदार धान्याचे पीक शेतात डोलू लागते. आमच्या शेतात तांदळाचे पीक दरवर्षी रुबाबात मिरवत असे. मे महिन्याच्या दाहक उन्हात मातीची ढेपळं खडखडीत वाळून शेतातील जमिनीला भेगा पडल्याने आकाशाकडे पाण्याच्या आशेने 'आ' वासून पावसाच्या प्रतीक्षेत असतात.

घेई च्छन्द मकरंद -- होमिओपॅथीचा !! [भाग-१]

गुरुवार, 12/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आपलं शरीर हे मुख्यतः पाणी, सेंद्रीय पदार्थ तथा बारा निरींद्रीय क्षार युक्त असंख्य पिंडपेशींनी तयार झालेले आहे, निरींद्रीय क्षारांमुळे या पेशी तयार होत असतात, अन रक्ताभिसरणाने पोसल्या जातात, याशिवाय साखर, चरबी, पांडूर- Albumin, हे कर्बयुक्त सेंद्रीय पदार्थ असून चुना-Calcium, लोह-Iron, potashium, Natrum, Scical, हे ख-निज क्षार निरींद्रीय – कार्बन विरहित असतात.निरींद्रीय क्षारांचे प्रमाण अल्प असलं तरी अचेतन सेंद्रीय पदार्थापासून लक्षावधी विशिष्ठ पिंडपेशीसमुह निर्माण करत असतात. याचं कारणामुळे या बारा क्षारांना अनन्य साधारण महत्व आहे, त्याचाच अभ्यास करणें आहे.

दुखरी नस...!

लेखक वटवट
मंगळवार, 10/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळची वेळ... मला ही संध्याकाळची वेळ खूप आवडते... काय होतं देव जाणे पण खूप हळवं वाटतं... म्हणजे दरवेळेस मनात दुःख, वेदनाच असायला हवी असं नाही पण तरीही फार भावनिक व्हायला होतं... ज्या गोष्टींचा आपण संपूर्ण दिवसात कधीच विचार करत नाही त्या गोष्टी आठवू लागतात... काही गोष्टींचे संदर्भ बदलतात..तर काही गोष्टींचे संदर्भ अजून पक्के होतात... संध्याकाळची वेळ ही आत्म्यानं जागं व्ह्यायची वेळ असते. आपलं खरं आस्तित्व काय आहे? आपण नक्की कोण आहोत? आपले नक्की कोण आहेत? आपण नक्की कोणाचे आहोत? ह्या सगळ्या गोष्टींचा त्रयस्थ दृष्टीकोनातून विचार करायचा असेल तर संध्याकाळच्या वेळेसारखी दुसरी कुठलीही वेळ नाही...

अनप्रेडीक्टेबल भाग्यश्री...!!

लेखक वटवट
सोमवार, 09/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर कोणीही जन्माला येताना त्याचा असा स्वतःचा पिंड घेऊन येतो तर काहीजणांचा पिंड घडला जातो. हे घासून घासून गुळगुळीत झालेलं वाक्य घासून घासून गुळगुळीत होऊ पहाणार्या आयुष्याच्या प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक कोपर्यावर, हमरस्त्यावर आणि आडवाटेवर तर हमखास भेटतंच भेटतं. कधी कधी हे असंच भेटतं तर कधी कधी अगदी कडकडून भेटतं…. आता भेटतं त्याला मी काय करणार?? भेटतं तर भेटतं. आणि मला तर खूपदा भेटलंय. पण काहीजणांच्या बाबतीत प्रचंड संभ्रम पडतो कि ह्यांचा पिंड हा जन्मतःच असा कि नंतर घडला… आणि ह्या प्रश्नाला उत्तर त्या व्यक्तीकडे असेलच ह्याची खात्री नाही. आणि मिळालंच तरी ते खरं असेलच ह्याचीही खात्री नाही….

येक ब्येणं…. गण्या…।

लेखक वटवट
मंगळवार, 03/06/2014 या दिवशी प्रकाशित केले.
वेडीच माणसं इतिहास घडवतात… इतिहास घडतो तो वेड्याच माणसांकडून.…. इतिहास जर घडवायचा असेल तर कुठलं ना कुठलं वेड हे रक्तात मुरवून घ्यावंच लागतं.… वगैरे वगैरे विधानं वक्तृत्व स्पर्धेतून हमखास उच्चारली जातात. अगदी तारस्वरात जर ही विधानं केली गेली तर हमखास टाळ्या पण मिळतात. आणि कदाचित बक्षीसं पण मिळतं. पण दैनंदिन जीवन जगताना आपण जी वेडी माणसं बघतो, ती सगळीच काही इतिहास घडवत नाहीत. हां… तसं पहायला गेलं तर प्रत्येकच माणूस इतिहास घडवत असतो पण त्याची दखल इतरांनी घ्यावी अशी व्यक्तिमत्वं थोडीच. मुळात इतिहास बितिहास गेला खड्ड्यात मला जसं जगायचंय तसंच मी जगणार.… अशीच काही मंडळी असतात, त्यापैकी आमचा गण्या.

मिपाकरांच्या आशीर्वादाने...

लेखक वडापाव
शुक्रवार, 30/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो... मिपावर गेली काही वर्षं जिलब्या पाडून, त्या तुम्हाला बळेबळे खायला लावून, त्या कशा झाल्यायत याबद्दलच्या तुमच्या दिलखुलास आणि मोकळ्या प्रतिक्रिया माझ्या 'धाग्यांच्या' पदरात पाडून घेऊन, पुढच्या जिलब्या त्यातल्या त्यात 'ब-या' कशा होतील याचा सातत्याने प्रयत्न करून झाल्यानंतर, आता मी लोकप्रभा साप्ताहिकात अधूनमधून लिहायला सुरुवात केलेली आहे... म्हणजे मी तसा सतत लिहीतच असतो, पण ते अधून मधून माझ्या लेखनाची, छपाईसाठी निवड करतात एवढंच. तर या लोकप्रभा साप्ताहिकात आलेल्या माझ्या दोन लेखांचे दुवे मी इथे जोडतोय. यातल्या एका लेखाचा दुवा मी या आधी काही दिवसांपूर्वी ख. फ.

आमच्या शेजारचे आजी-आजोबा…!

लेखक वटवट
गुरुवार, 29/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
_____________________________________________________________________________________________ "काय मग?… कसं वाटतंय नवीन घर?" नुकतंच आम्ही आमचं घर बदललं होतं. घर अजून नीट लावलंही नव्हतं.. हिची आतल्या खोलीत झाशीच्या राणीच्या अवतारात साफसफाई चालू होती आणि आमच्या अंगात नक्षलवादी संचारले होते. अश्या एकंदर युद्धाच्या वातावरणात दारावरची कडी वाजली. साधारण सत्तरीतले आजोबा हातात काठी, डोळ्यावर चष्मा, पांढरा कुर्ता, धोतर आणि चेहर्यावर प्रसन्न हसू अश्या पेहरावात दारात उभे.. "आज उठल्या उठल्या दारात हा टेम्पो दिसला आणि कळालं आपण आलात ते" "हो ना कालच आलो.. अजून सफाईच चालू आहे..

कलगीतुरा- भाग ५

सोमवार, 19/05/2014 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीच्या भागांची लिंक खाली देत आहे. कलगीतुरा- भाग १ कलगीतुरा- भाग २ कलगीतुरा- भाग ३ कलगीतुरा- भाग ४ "त्यादिवशी तू तुझ्या दोस्ताला माझ्याकडे घेऊन आला. त्याचे कमिशन ठरल्यानंतर त्यानी तुला लगेच कटवला. मला म्हटला दिग्याला मी लगेच कटवला कारण तीन तिघाडा काम बिघाडा नको.