Skip to main content

लेख

थरार : नको इतका जवळून !!

लेखक चिगो यांनी मंगळवार, 06/05/2014 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
धिक्कार ते अधिकार नावाची माझी लेखमाला मिपावर यायला आता चार वर्ष झालीत. ह्या चार वर्षांत मिपाच्या आणि माझ्या आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. "अधिकारानंतरचं वाचायला उत्सुक आहे" म्हणणारे श्रामो आणि यकु माझे हे अनुभव वाचायला नाहीत, ही बोचही आहेच. पण आयुष्याच्या पुलाखालून वाहणार्‍या ह्या पाण्यात रक्ताचा गढूळ रंग आता मिसळायला पाहतोय म्हटल्यावर विचार केला की चला, काही अनुभव लिहून ठेवुयात..

कलगीतुरा-भाग ३

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 05/05/2014 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीच्या भागांची लिन्क खाली देत आहे. कलगीतुरा- भाग १ कलगीतुरा- भाग २ बघता बघता तो दिवस उजाडला. जसजशी वेळ जवळ येत चालली तसतशी उत्कंठा शिगेला पोहचली. संध्याकाळी साडे सात वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. पण सकाळपासूनच टी. व्ही. वर सतत कार्यक्रमाच्या जाहीरातींचा मारा चालला होता. मला कार्यक्रमापेक्षा प्रचंड उत्सुकता होती कांतीशेठच्या या व्हेंचर (की अ‍ॅडव्हेंच्रर?) चा आत्तापर्यंतचा ताळेबंद काय झाला असेल! मला रहावेना म्हणून मी कांतीशेठला फोन लावला.

लव्ह - ट्रँगल (Love-Triangle)

लेखक बोबो यांनी सोमवार, 05/05/2014 04:00 या दिवशी प्रकाशित केले.
--------------------------------------------------------------------------------- रिचाचं आणि माझं तसं सारं व्यवस्थित चाललं होतं, रिचा दिवसातला बराच वेळ मला देत असे. त्या व्यतिरिक्त नित्यनियमाने फोनवर बोलणे होत असे . कधी ती फोन करत असे तर कधी मी. पण गेल्या जवळ जवळ वर्षभरात हे चित्र बदललं होतं.आता फक्त मीच फोन करत होतो. आणि पूर्वी तासन तास फोन वर बोलणारी रिचा मात्र फोन उचलल्या पासून "ठेवू का?" चा घोष लावत असे. आजसुद्धा तिच्या फोनची वाट पाहून शेवटी मीच तिला फोन लावला. तिने फोन उचलला, पण पहिलेच वाक्य -"अरे जरा बिझी आहे, नंतर बोलूया का?" मी विचारले "कुणी बरोबर आहे का?" "हो, जतीन आहे.

स्वयंपाक घरातील विठोबा (लोकसत्ता -वास्तुरंग मध्ये प्रकाशीत)

लेखक जागु यांनी शनिवार, 03/05/2014 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्ता-वास्तुरंग मध्ये मी लिहीलेला हा लेख प्रकाशीत झाला आहे. http://www.loksatta.com/vasturang-news/the-most-important-kitchen-equipm... प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे! पण मला माझ्या आवडत्या पाट्यावरवंट्याच्या बाबतीत एक म्हण तयार करावीशी वाटते - पाट्यावरवंट्यावर जिन्नसे रगडिता रूचिरस पाझरे'. हसू नका, पण बिचार्‍या पाट्यावरवंट्यावर मी कुठले गाणे ऐकले नाही, कुठली चांगली म्हण ऐकली नाही, म्हणून हा प्रयत्न. पाट्यावरवंट्याची जोडी दिसायला काळी कुळकुळीत. जणू विठोबारखुमाईची जोडी.

कलगीतुरा - पूर्वार्ध २

लेखक बबन ताम्बे यांनी बुधवार, 30/04/2014 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा लेख खालील लिंकमध्ये वाचणे. कलगीतुरा - पूर्वार्ध कांतीशेठ गेल्यानंतर दार लावायला गेलो तर आमच्या सोसायटीतला त्रस्त समंध गोगटया गॅलरीतून कुचेष्टेने हसत ऊभा होताच. लगेच खवचटपणे " काय दिगूशेठ ? नवीन व्हेंचर का? " असे म्हणत खिदळलाच. या गोगटयाची गॅलरी आणि आमची खिडकी समोरासमोरच आहे. हरामखोराला आमच्या घरातली एकूणएक वित्तंबातमी गॅलरीत बसून कळते. या थेरडयाचे मी शंभर अपराध भरायची वाट बघतोय. मला लगेच वाशाला गाठायचे होते, म्हणून मी गोगटयाकडे दुर्लक्ष केले. मी लगेच वाशाच्या घरी फोन लावला. फोन त्याच्या बायकोने ऊचलला.

कलगीतुरा - पूर्वार्ध

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 28/04/2014 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल पुण्याचा ऊन्हाळा नकोसा झालाय. मला जेव्ह्ढा पुण्याचा हिवाळा प्रिय, तेव्ह्ढाच ऊन्हाळा अप्रिय. सुट्टीच्या दिवशी दुपारी बाहेर जायला नकोसं वाटतं. आज रविवार. इतर वेळी मी घरी नसतो सापडलो पण या उकाडयामुळे घरीच थांबलो होतो. टाईमपास म्हणून टी. व्ही. लावला तर फिरून फिरून त्याच त्याच बातम्या. कारण लोकसभेची निवडणूक ! लोकसभेच्या प्रचाराची सगळीकडे रणधुमाळी चालू होती. प्रत्येक पक्ष, अपक्ष आपलाच उमेदवार्/उमेदवारी कशी जनतेच्या भल्यासाठी आहे हे मतदारांवर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.राष्ट्रीय प्रश्न , विकासाचा अजेंडा यापेक्षा वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्यांना अक्षरशः ऊत आला होता.

'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 25/04/2014 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे. 'श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या. त्या प्रतिज्ञेत आचार्यांच्या मते ईश्वरन सर्व नियामक तर मंडनमिश्रांचे मते फळ देणारे ते कर्मच होय.

आज कुछ तुफानी करते है…

लेखक बोबो यांनी सोमवार, 21/04/2014 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
------------------------------------------------- म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात ते कदाचित खरं असावं. माणसं कधी कधी काही विचित्रच हट्ट करतात. निदान आबांच्या वागण्यावरून तरी मला तसं वाटलं खरं . परवाचाच अनुभव घ्या ना. आबा - म्हणजे दूरच्या नात्यातले आजोबा आमच्याकडे राहायला होते. ते नुसते रहात होते तिथपर्यंत ठीक होतं. एरव्ही त्यांचं वागणं नॉर्मल होतं, पण नंतर एके दिवशी मला जाणवलं त्यांना काहीतरी बोलावंसं वाटतंय. त्यांच्या मनात काही तरी आहे असं मला वाटलं.

गडीमाणस

लेखक मालविका यांनी रविवार, 20/04/2014 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
आमच घर कोकणात असल्याने घरचा मुख्य व्यवसाय हा शेती होता . भातशेती आणि आंबा हेच उत्पन्नाचे मुख्य साधन . त्यामुळे साहजिक घरात गडी माणसांची ये जा असायची . हि मानस घरचाच एक अविभाज्य घटक बनलेली होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . आमच्यकडे "गुण्यादादा"नावाचा एक गडी होता. खर तर वयाने तो माझ्या बाबांपेक्षा सुद्धा १० १२ वर्ष मोठा असेल पण सगळेच त्याला गुण्यादादा म्हणायचे . मी ऐकलय त्याप्रमाणे त्याच्या वयाच्या ८ व्या वर्षपासून तो आमच्याकडे कामाला होता . अत्यंत विश्वासू आणि तेवढाच घरचा हक्काचा असा गुण्यादादा . शेतावर काम करून रंग अगदी काळपट झालेला. मध्यम पण काटक अंगकाठी .

ब्रूक्स-भगत रिपोर्ट- १९६२ चे चीन-भारत युध्ध

लेखक संतोषएकांडे यांनी मंगळवार, 15/04/2014 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
ऑक्टोबर १९६२ साली चीनच्या युध्धात खरा॑ब रीत्या पराजित झाल्या नंतर भारताच्या संरक्षण खात्याने पराजयाच्या कारणांची तपास करण्यासाठी एक विस्तृत रिपोर्ट तैयार करायचं ठरवलं. १९६२ च्या जालंधरच्या ११व्या कॉरच्या कमांडींग ऑफीसर लेफ्टनन्ट-जनरल हेन्डरसन ब्रूक्सला हे काम सोपवीण्यात आलं. त्याने ब्रिगेडीयर पी.एस. भगत यांच्या सहयोगाने विश्लेषणात्मक रिपोर्ट तैयार करून जुलाइ १९६३ला संरक्षण खात्याला सुप्रत केला. ब्रूक्स-भगत रिपोर्ट तत्कालिन सरकारची झोप उडवीणारा होता. युध्धासाठी भारताच्या अपूरत्या तैयारीचे असंख्य दृष्टांत त्यात होते.