आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - २
९ मे १६१९ ला जेन्स मंक हा डेन्मार्कचा दर्यावर्दी युनिकॉर्न आणि लॅम्प्रे या दोन जहाजांसह नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर निघाला. नॉर्थवेस्ट पॅसेजमधून चीन आणि भारताचा किनारा गाठण्याचा त्याचा बेत होता. डेव्हीसच्या सामुद्रधुनीतून उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमणा करत त्याने ६९ अंश उत्तर अक्षवृत्त गाठलं. फ्रॉबीशरच्या उपसागरातून त्याने हडसनच्या सामुद्र्धुनीत प्रवेश केला. मात्रं या सामुद्रधुनीतून वाट काढण्यास त्याला तब्बल एक महिना लागला. सतत बिघडणारं हवामान आणि जोरदार आर्क्टीक वार्यांमुळे त्याच्या जहाजांची दयनीय अवस्था झाली होती.
मिसळपाव