थोडे अद्भुत थोडे गूढ - १
प्राचीन काळी उत्तर अमेरीकेतील कॅनडाच्या प्रदेशात ऑन्गीएर्स नावाची एक जमात राहत होती. या जमातीत एक सुंदर तरुणी होती. त्या तरूणीच्या वडिलांनी तिचा विवाह तिच्या मनाविरुद्ध आपल्या जमातीच्या वयोवृद्ध राज्याशी लावून देण्याचा निर्णय घेतला. परंतु तिला हा निर्णय मान्य नव्हता! तिचं एका दुसर्या तरुणावर प्रेम होतं. हा तरुण एका प्रचंड मोठ्या धबधब्याजवळ असलेल्या गुहेत राहत असे. तो गर्जणार्या वार्याचा देव म्हणून ओळखला जात होता!
आपल्या मनातील राजाविषयीचा तिटकारा तिने व्यक्त करताच मोठा गहजब झाला. जमातीतल्या लोकांनी तिला वाळीत टाकण्याची शिक्षा फर्मावली.
मिसळपाव