महाभारताची वेगळी कथा...
लेखनप्रकार
आज थोडं वेगळं लिहू का... माझं वाचन नियमीत सुरू असतं. मुख्यत्वे मराठी आणि बऱ्यापैकी इंग्रजी. शिवा ट्रायॉलॉजी वाचल्यानंतर पौराणीक साहित्य वाचायला आवडू लागलं. पुराणातल्या माहिती नसलेल्या अनेक गोष्टी जाणून घ्यायची ओढ लागली आणि हाती लागेल तसं बरंच काही वाचत गेले. अशीच एक कथा. फार कमी लोकांना माहिती असावी, म्हणून इथे लिहावी, असं वाटलं.
ही गोष्ट आहे कौरव-पांडवांची. पंडुच्या मृत्युनंतर पाच पांडवांना घेऊन कुंती हस्तिनापुरात परतलेली. वनात जन्मलेले, लहानाचे मोठे होणारे पाचही पांडव जरासे दांडगटच. युधिष्ठीर त्यातल्या त्यात शांत, सौम्य. साधारण तसेच नकुल-सहदेव. अर्जुन पितामह भिष्मांच्या कौतुकाने स्वत:च्या आणखी कौतुकात रमलेला तर भीम आपल्या अद्वितीय शक्तीच्या अहंकारात बुडालेला.
कौरव-पांडव खरं तर भावंडंच. ती सुद्धा समवयस्क. एकत्र खेळ, वाद विवाद आणि भांडणंही रोजचीच ठरलेली. एके दिवशी खेळताना असंच काही भांडण झालं आणि कौरव रडत-रडत पितामह भिष्मांकडे आले. पितामहांनी मुलांना जवळ घेतलं आणि रडण्याचं कारण विचारलं. कौरवांनी उत्तर देत सांगितलं, त्या पांडवांनी आम्हाला चिडवलं... विधवेचे पुत्र म्हणून...
भिष्म चकित झाले. त्यांनी विचारलं, कोण चिडवत होतं तुम्हाला? कौरव उत्तरले, ते पाचही जण. अगदी युधिष्ठीर सुद्धा...
आता पितामहांच्या भुवया आक्रसल्या. मी बोलतो त्यांच्याशी, असं म्हणून कौरवांना पाठवून दिलं आणि स्वत: विचारात गढले. युधिष्ठीर सत्यच बोलणार, याची खात्री होती. काही वेळ विचार करून पितामहांनी तातडीने गुप्तहेरांना योग्य त्या सूचना देऊन गांधार देशी रवाना केलं.
अल्पावधीत परतलेल्या गुप्तहेरांकडून कळलं, ते अचंबित करणारं होतं. गांधारीच्या जन्म पत्रिकेत पहिल्या पतीच्या मृत्युचा योग होता. त्यावर तोडगा म्हणून गांधारीचा विवाह एका बोकडाशी करायचा आणि नंतर त्या बोकडाचा बळी द्यायचा, असा तोडगा राज ज्योतिषाने सुचवला. अतिशय गुप्त पद्धतीने हा विधी पार पडला. यथावकाश गांधारी धृतराष्ट्राशी विवाहबद्ध झाली. मात्र तिच्या पहिल्या विचित्र विवाहाची कल्पना कुरू कुलात कोणालाही देण्यात आली नाही.
हा वृत्तांत ऐकून पितामह संतापले. त्यांनी गांधारीला बोलावून घेतलं आणि विचारलं. गांधारीने घाबरत संकोचत सारं काही मान्य केलं. क्षमायाचनाही केली. चेहरा शक्यतो निर्वीकार ठेवत पितामहांनी तिला जायला सांगितलं. फसवणुकीने संतापलेल्या पितामहांनी गांधार देशी सैनिकांची तुकडी पाठवली. गांधारीचे वडील आणि तिन्ही भावांना कैद करून हस्तिनापुरात आणलं. झाल्या गोष्टीची शहानिशा केली आणि त्या चौघांनाही तळघरात डांबलं. गांधारीने खूप विनवण्या केल्या, पण पितामहांनी त्यांना मुक्त करण्यास ठाम नकार दिला.
त्या चौघांनाही जेमतेम जिवंत राहता येईल, इतकंच अन्न देण्याचा पितामहांचा आदेश होता. थेट हत्येचं पातक नको होतं. ही बाब काही काळाने गांधारीच्या पित्याच्या लक्षात आली. त्याने खूप विचार केला आणि आपल्या तिन्ही मुलांशी संवाद साधला. आपल्यापैकी किमान एकाला तरी जगवायचा प्रयत्न करू. आपल्यावरच्या अन्यायाचा बदला घेण्याचा शेवटचा प्रयत्न करू.
मुलांनी सहमती दर्शवली आणि सर्वानुमते धाकट्या शकुनीला जास्तीत जास्त अन्न देऊन जगवण्याचं ठरलं. कालांतराने शकुनीच्या दोन्ही भावांचे निधन झालं. प्रत्येक भावाच्या निधनानंतर गांधारीने विलाप केला, पितामहांची करूणा भाकली. पण ते द्रवले नाहीत.
होता-होता गांधारीच्या पित्याचा अंत जवळ आला. त्यांनी शकुनीला जवळ बोलावलं. जवळचा एक ओंडका मागून घेतला आणि सर्व त्राण एकवटून त्या ओंडक्याने शकुनीच्या पायावर वार केला. शकुनी पंगु झाला, चिडला. पित्याने अतिव प्रेमाने पुन्हा त्याला जवळ बोलावलं. म्हणाला, आता माझा शेवट जवळ आलाय. माझ्यानंतर तुला वाचवण्यासाठी गांधारी शर्थीचे प्रयत्न करेल. तू शक्यतो जिवंत राहशील. पण तुझं उरलेलं आयुष्य आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आहे, हे लक्षात असू देत. तुझा हा मोडलेला पाय, प्रत्येक पावलावर तुला या कर्तव्याची आठवण करून देत राहील...
थोड्याच वेळात गांधार नरेशही मरण पावला. दोन भावांच्या मृत्युनंतर पित्याच्याही मृत्युने गांधारी कोसळली. शकुनीला अभय द्या किंवा मलाही त्याच पद्धतीने मरू द्या, असं म्हणत पितामहांच्या पावलांवर कोसळली. पितामहांना तोवर आपल्या वागण्याच्या योग्यायोग्यतेबाबत संदेह वाटू लागला होता. त्यांनी शकुनीला अभय दिलं... शकुनी हस्तिनापुरातच वाढू लागला... आणि पुढे सर्वज्ञात महाभारत घडलं...
** काही महिन्यापूर्वी कुठेशी वाचनात आलेली ही कथा. आठवली तशी लिहून काढलीय.
वाचने
21233
वाचनखूण
प्रतिक्रिया
59
ऐकावे ते नवलच छान आहे कथा
In reply to ऐकावे ते नवलच छान आहे कथा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
काय राव.. दोन इकडच्या
वेगळी म्हणुन वाचायला चांगली
In reply to वेगळी म्हणुन वाचायला चांगली by मृत्युन्जय
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
अवांतर
In reply to अवांतर by बॅटमॅन
पण मग तो रथी असणे शक्य नाही
In reply to पण मग तो रथी असणे शक्य नाही by प्रचेतस
रथी, महारथी, अतिरथी
In reply to रथी, महारथी, अतिरथी by चित्रगुप्त
रथी म्हणजे रथारूढ योद्धा आणि
In reply to रथी म्हणजे रथारूढ योद्धा आणि by प्रचेतस
अतिरथी हा महारथींपेक्षा
In reply to अतिरथी हा महारथींपेक्षा by मृत्युन्जय
अर्धरथी म्हणजे ज्याला रथातुन
In reply to अतिरथी हा महारथींपेक्षा by मृत्युन्जय
प्रतिसाद आवडला रे.
In reply to पण मग तो रथी असणे शक्य नाही by प्रचेतस
महाभारतात शकुनी पंगू असल्याचा
अजून काही...
In reply to अजून काही... by विकास
हाडांचा वापर करून फासे...
In reply to हाडांचा वापर करून फासे... by आगाऊ कार्टा
वाचावे ते नवलंच.
In reply to हाडांचा वापर करून फासे... by आगाऊ कार्टा
ही पण हरदासी कथाच.
रोचक कथा...
देवदत्त पटनाईक
In reply to देवदत्त पटनाईक by विकास
जर शकुनीला कौरवांचा इतका
In reply to जर शकुनीला कौरवांचा इतका by प्रसाद१९७१
ईंटर्नल हॅकर्स
इथेही जन्म पत्रिका आणि
In reply to इथेही जन्म पत्रिका आणि by धन्या
उपरोक्त कथेला महाभारतात
गंमत म्हणून महाभारतातील
सर्वप्रथम कथा आवडली.
In reply to सर्वप्रथम कथा आवडली. by एस
इरावती कर्वे यांच्या 'युगांत'
In reply to इरावती कर्वे यांच्या 'युगांत' by प्रचेतस
माझे मत
In reply to माझे मत by एस
मस्त!
In reply to माझे मत by एस
अभ्यासपूर्ण प्रतिसाद !
In reply to माझे मत by एस
प्रतिसाद अतिशय आवडला.
In reply to माझे मत by एस
स्वॅप्स, प्रतिसाद आवडला. बरेच
एकही - & आय रिपीट एकही
लिपीचा पुरावा सापडलेला नाही. लिपी कसलीही असो, संस्कृत असो नैतर तमिळ असली तरी ठीक, अगदी चिनी असली तरी चालेल, पण कुठली तरी मिळू द्या!!! पण नाही. सापडलेलंच नाही. त्यामुळे एका बाजूला रामायणमहाभारतागत ग्रंथ आणि दुसर्या बाजूला तुटक उत्खनने हे इतकेच आपल्यासमोर आहे. या दोहोंची सांगड घालणे हे महाकर्मकठीण काम असून त्याला आत्ता आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अजून टनावारी उत्खनने व्हायला हवीत तेव्हा कुठे आपण याबद्दलचा विदा ठीकठाक प्रमाणात आपल्याकडे आहे असे म्हणू शकतो. तूर्त काहीच विदा नाही म्हणण्यासारखा. उत्खनन करून जी मातीची भांडी सापडतात त्यावरून काळ सांगितला की संपलं इतकंच चाललंय. बाकी काही कुणी करत नाहीये. हडप्पा संस्कृतीच्या लिपीचा उलगडा होणे आणि विशिष्ट ठिकाणी उत्खनने आजवर झालीत त्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणे हे झाल्याशिवाय, रामायण आणि महाभारत यांना इतिहासात खरेच काही आधार आहे की नाही हे सांगणे अशक्य आहे. माझे वैयक्तिक मत आहे की अशा घटना घडणे अगदी शक्य आहे, फक्त अतिरंजित पार्ट वगळून. पण त्याला पुरावा पाहिजे...In reply to स्वॅप्स, प्रतिसाद आवडला. बरेच by बॅटमॅन
कोणत्या प्रकारचे पुरावे?
In reply to कोणत्या प्रकारचे पुरावे? by चित्रगुप्त
गुड क्वेश्चन चित्रगुप्तजी.
In reply to गुड क्वेश्चन चित्रगुप्तजी. by बॅटमॅन
वल्ली आणि बॅटमॅन, धन्यवाद.
In reply to गुड क्वेश्चन चित्रगुप्तजी. by बॅटमॅन
पुरावा
In reply to पुरावा by चित्रगुप्त
कुरुक्षेत्र एरियातील उत्खननात
In reply to कुरुक्षेत्र एरियातील उत्खननात by बॅटमॅन
प्रतिसाद आवडला रे.
In reply to प्रतिसाद आवडला रे. by प्रचेतस
धन्स रे.
In reply to धन्स रे. by बॅटमॅन
नागनिकेचा इ.स.पू. २१० च्या
In reply to नागनिकेचा इ.स.पू. २१० च्या by प्रचेतस
धन्यवाद रे. इतका जुना शिलालेख
In reply to धन्यवाद रे. इतका जुना शिलालेख by बॅटमॅन
अगदी
In reply to अगदी by प्रचेतस
अगदी अगदी. एमपीमध्ये अशा काही
In reply to अगदी अगदी. एमपीमध्ये अशा काही by बॅटमॅन
राम
In reply to राम by एस
ओह अच्छा, धन्यवाद. देवगड नसून
In reply to ओह अच्छा, धन्यवाद. देवगड नसून by बॅटमॅन
बरोबर
In reply to बरोबर by एस
ओह ओक्के. कनिंगहॅमने नाव
In reply to कुरुक्षेत्र एरियातील उत्खननात by बॅटमॅन
उत्खननातील पुरावे
In reply to उत्खननातील पुरावे by चित्रगुप्त
हा हा हा, अगदी अगदी.
कथा...
कथा आवडली, लिहायची पद्धत तर
हीहीही!
In reply to हीहीही! by पैसा
अतिरेकी प्रतिसादै ओ पैसातै.
In reply to अतिरेकी प्रतिसादै ओ पैसातै. by arunjoshi123
लै फेमस मेसेज होता!
नविनच कथा कळली.छान लिहिलय
महाभारतावरील सचित्र लेख
कथा आवडली. पण ही अभ्यासातून
चर्चाविषय व एकुणच चर्चा रोचक
खरी असो वा खोटी रोचक कथा,
माझ्याही माहितीत भरपूरच भर पडली.
ओंडक्याने शकुनीच्या पायावर