Skip to main content

लेख

धुळवड

लेखक bharatm यांनी गुरुवार, 05/03/2015 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशचतुर्थी प्रमाणेच कोकणातील आणखी एक मोठा आणि जल्लोषात साजरा होणारा सण म्हणजे 'होळी'. थंडीचे दिवस संपत आल्यावर कोकणी माणसाला शिमग्याची ओढ लागते. 'होळी' या शहरी शब्दापेक्षा 'शिमगा' हा शब्दच कोकणच्या मातीला जुळून जातो. एकंदरीत कोकणापेक्षा तळकोकणातील शिमग्याची प्रथा थोडीशी वेगळी आहे. फाल्गुन पोर्णिमेपासून चालू होणारा हा सण तळकोकणामध्ये साधारणता ५, ७ किंवा ९ दिवस चालतो. पोर्णिमे दिवशी घरोघरी गोड जेवण बनवले जाते. पुरण पोळ्या किंवा शिरवाळे आणि गोड रस हे जेवणाचे पदार्थ असतात. म्हणूनच त्याला 'होळी रे होळी पुरणाची पोळी' असेही म्हटले जाते. शहरामध्ये रंगपंचमी असते तर कोकणातल्या लोकांची 'धुळवड' असते.

वजन कमी करणारा आहार

लेखक बाबा पाटील यांनी बुधवार, 04/03/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
वजन कमी करणारा आहार १) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. २) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी. ३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा. ४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री

बिडी काडी

लेखक सुचिकांत यांनी मंगळवार, 03/03/2015 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मूळ गाव थेऊर(चिंतामणीचे). तसे उरुळी कांचन (जिथे गांधीजींचा निसर्गोपचार आश्रम आहे) पण बालपण थेऊर मधेच गेले. आई-वडील तिथल्याच हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. आम्ही d-type चाळीमध्ये मध्ये रहायचो. साखर कारखान्याने ही चाळ बांधली होती. भरपूर मित्र. गोट्या, सूरपारंब्या, कांदाफोड, क्रिकेट, विष अमृत, लपाछपी, अप्पाराप्पी, शिवाजी म्हणतो, donkey-monkey, विटी दांडू, असे अनेक खेळ आम्ही खेळायचो.

माझ्याबद्दल थोडक्यात

लेखक सुचिकांत यांनी मंगळवार, 03/03/2015 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, हिंदूंच्या तर नाहीच नाही! पण आपला तो बाळासाहेब आणि दुसऱ्याच कार्टं या मानसिकतेच्या विरोधात आहे. मी सर्व धर्मांच्या ठेकेदारांच्या विरोधात आहे. मी अंधश्रद्धेच्या विरोधात आहे. मी whatsapp आणि facebook वर अफवा आणि चुकीचे संदेश पसरवणार्यांच्या विरोधात आहे. माझे स्वातंत्र्योत्तर भारतावर काडीचे सुधा प्रेम नाही, परंतु स्वातंत्र्यपूर्व भारतावर मी मनापासून प्रेम करतो. त्या काळात जन्म झाला असता तर नक्कीच देशासाठी फासावर गेलो असतो.

प्रकोप

लेखक Maheshswami यांनी सोमवार, 02/03/2015 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
२९ सप्टेंबर १९९३ -----------------------------------------१---------------------------------- "गोदावरी जगताप !", नर्सने नाव पुकारताच एकदम भानावर आली ती. अगदी हायसं वाटलं तिला. वाट बघून बघून कंटाळा आला होता. सकाळी नऊ वाजल्यापासनं वाट बघत होती ती. २ तासांनी आत्ता कुठे नम्बर आला होता तिचा. देशपांडे बाईंकडे नेहमी अशीच पेशंटची रीघ असायची. आत घाबरत घाबरतच गेली , देशपांडेबाई मान वर न करताच म्हणाल्या "बस गं , गोदावरी!" "म्याडम, जाउद्या मी उभीच बरी हाय. काय रिझल्ट आला ओ त्या टेष्टचा?" "पेढे दे गोदे ! पेढे ! पोटुशी आहेस तू ! मुल होणार आहे तुला !" आनंद गगनात मावेना गोदावरीचा ते ऐकून.

क्लिकक्लिकाट !

लेखक चिनार यांनी सोमवार, 02/03/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा- बायको रम्य अश्या एखाद्या हिल स्टेशन वर आलेले आहेत. छानशी संध्याकाळ झालेली आहे . गार वारा घोंगावतोय. निसर्ग सौंदर्य अगदी दृष्ट लागण्याइतकं मनमोहक आहे. इतक्या रम्य वातावरणामुळे असेल कदाचित पण नवऱ्याला कधी नव्हे ती बायको सुंदर दिसतेय. अशातच त्याला 'आज मौसम बडा बेईमान हैं' गुणगुणाव वाटतंय. तेवढ्यात ती म्हणते," चल ना फोटो काढू " पुढची पूर्ण संध्याकाळ तो तिचे, स्वत: चे ,त्यांचे फोटो काढतोय. त्या दोघांनी केलेली बेईमानी सहन न होऊन मौसम निसर्गाशी ईमान राखून शांत झालेला आहे ! वरील प्रसंग ओळखीचा वाटतोय का ? या सारखे कितीतरी प्रसंग आजकाल तुम्ही आसपास बघत असाल.

मन अतर्क्य....

लेखक निनाद जोशी यांनी सोमवार, 02/03/2015 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी मन खरंच किती चंचलअसतं. मनाचे झालेले समज,मनाने तयार केलेल्या अनेक दिवसांच्या ओळखी पूर्णपणे बदलायलाकाही क्षणच पुरेसे असतात. आपल्याला सर्वात जवळचा वाटणारा व्यक्ती काही क्षणातचइतका परका होतो कि ज्याच्या बरोबर आपण अनेक गोष्टी शेअर केलेल्या असतात त्यालानुसते समोर पाहायला हि आपल्याला नकोसे वाटू लागते. त्याच्याशी बोलणे तर सोडाचत्याचा आवाज ऐकला तरी आपल्या मनातील कोलाहल जागृत होऊ लागतो. अश्यावेळी मनाला शांतकरणे अगदीच अशक्य होते. हे मनाचे बदलच मानवी मनाला अतर्क्य बनवतात.

बाई, आज रातच्याला वाड्यावर या !!! - भाजपा

लेखक किरण८८७७ यांनी बुधवार, 25/02/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
"बाई, आज रातच्याला वाड्यावर या" निळू फुलेच्या पाटील/सावकारी भूमिकेची आठवण झाली न. बाईंना यावेच लागणार, अन अत्याचार झाल्यावरही कुणाकडे दाद मागायला मार्ग नाही. कारण आगोदरच सांगितलेय कि "आवाज बंद, कुणाकडे काही बोलायचे नाही. हुकुमशाही आहे". काय मार्ग राहायचा त्या बाईंना? वाड्यावर हजेरी लावायची अन मग रडत कडत थोडे दिवस काढायचे अन मग जिवाचे बरेवाईट करून घ्यायचे. मी का सांगतोय हे सगळे? २ दिवसातल्या घडामोडी पाहुन मला हे सर्व आठवले. फरक फक्त इतकाच कि त्या बाई म्हणजे "आपला गरीब शेतकरी" अन सावकार म्हणजे "भाजपा सरकार" .

गुंतागुंत - (पार्ट -२)

लेखक Maheshswami यांनी सोमवार, 23/02/2015 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
पार्ट -१ इथे वाचा.Part-1 "सत्याएन्शी रुपये साठ पैसे झाले साहेब", या वाक्याने जाग आली अभयला. रिक्षात झोपी गेला होता तो. स्टेशनहून ससूनपर्यंत रिक्षा पोचली, तेव्हाच झोप लागली बहुतेक आपल्याला. शंभराची नोट रिक्षावाल्याचा हातात देत म्हणाला "राहू द्या काका वरचे चहा पाण्याला", आणि घराकडे वळला. प्रवासानी अंग शिणून गेलं होतं. काश्मीर पासून पुणे, कितीही नाही म्हटलं तरी थकवणारा प्रवास होता. नेत्राला वाटेत डेक्कन वर ड्रोप करून आला होता. संध्याकाळी भेटायचं पण ठरलं होतं त्याचं. घरी जाऊन आता एक मस्त झोप काढणार होता तो . अकरा वाजता जाग आली.

गुंतागुंत - (पार्ट -१)

लेखक Maheshswami यांनी शनिवार, 21/02/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच , काश्मीरला स्वर्ग म्हणतात ते अजिबात खोटं नाहिये. आरामखुर्चीत बसून अभय विचार करत होता. त्या थंडगार हवेत , बर्फानी आच्छादलेल्या पर्वतांकडे बघत , गरमागरम चहाचे घुटके घेताना किती छान वाटत होतं. निसर्गाचं हे सौंदर्य पाहून, काल दिवसभर केलेल्या प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळून गेला होता. अभयला तर पहाटेपासून झोपच येत नव्हती. सगळी मित्रकंपनी अजून झोपूनच असेल म्हणून तो एकटाच हॉटेलच्या बाहेर येवून तिथल्या गार्डन कैफ़े मध्ये येवून बसला होता. काल रात्रीच बाकी मित्रांसोबत तो जम्मूला आला होता.