Skip to main content

लेख

|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 04/06/2015 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
सुरजमल जाट आया भाऊके दरबार ।। श्री. बिका यांचा पानिपतवरचा लेख वाचला आणि मला त्या पुस्तकाची आठवण झाली. बहिण सोनेपतला तीस वर्षे राहिली असल्यामुळे तिच्याकडे अनेक वेळा जाणे झाले. व त्याच मुक्कामांमधे पानिपत व आजुबाजूची गावेही बघता आली. एक दिवस मेव्हण्याबरोबर असेच सोनेपतमधे बाजारात फिरत असताना मागून हाका ऐकू आल्या, ‘‘गोडबोले साब ! गोडबोले साब !’’ मेव्हण्याने मागे वळून पाहिले तर तो त्यांच्या बालग्रामसाठी जेथून पुस्तके विकत घेत होता त्या दुकानावा मालक आम्हाला बोलावित होता... ‘‘हां कहो गुप्तजी क्या हाल है ?’’ मेव्हणा. ‘‘अरे साब आपको एक चीज दिखानी थी.’’ ‘‘हा दिखाओ !

राजमहालातला एक दिवस

लेखक चिनार यांनी गुरुवार, 04/06/2015 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीच्या 'संसदेतील एक दिवस' आणि 'शेतातील एक दिवस' या दोन लेखांच्याच धरतीवर हे पुढील लेखन प्रकाशित करत आहे. वरील दोन लेखांचे दुवे खाली दिले आहेत. शेतातला एक दिवस संसदेतला एक दिवस आज सकाळपासूनच विकासपुरुष आपल्या भव्य प्रासादात अस्वस्थपणे चकरा मारत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण दिसत होता.

बालपण

लेखक Hrushikesh Marathe यांनी बुधवार, 03/06/2015 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
असंच एकदा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलो. चालता चालता नजर रस्त्याबाजूच्या एका छोटयाश्या इमारतीवर गेली. ती छोटी इमारत दुसरं तिसरं काही नव्हे तर एक शाळा होती. शनिवारचा दिवस होता, अर्थात सकाळची शाळा. तो तास खेळाचा होता बहुतेक. छोटयाश्या मैदानाच्या एका कोपऱ्यात काही मुली घोळका करून उन्हात उभ्या होत्या, काही उत्साही मुलं शाळेच्या आवाराची साफसफाई करत होते. काही जण झाडांना पाणी घालत होते. तर काही मुलं आबाधुबीच्या नावाखाली आपले हात साफ करत होती. हे सगळं पाहताना दोन क्षण सुखावलो.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

फाटक्या

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 28/05/2015 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
३-४ दिवस मस्त सुट्टी जुळून आली होती . . आणि पुढे आम्ही टाकली होती . . गेले ८ महिने निस्ते काम काम काम याच्यातच घालवले होते . अगदी रविवारी पण काहीना काही काम काढून एक्स्ट्रा पैसा मिळवण्याच्या मागे होतो . पण आता कंटाळा नुसता भरून राहिला होता सगळी कडे . सो . बेंगलोर ला जायचं ठरलं . कॉलेज ची १-२ कार्टी होतीच तिथे . त्यांना फोनाफोनी झाली . आणि २ दिवस बेंगलोर -मैसूर ट्रीप . आणि एक दिवस त्यांच्या रूम वर बसून ओल्ड मंक आणि तंदुरी चिकन ची आराधना . असा फक्कड प्रोग्राम ठरला होता . . त्याप्रमाणे बुधवार संध्याकाळी मी न आकीब बस मध्ये चढलो होतो . हा माझा शाळेपासूनचा मित्र . .

वेगळ्याचं वेगळं नशीब

लेखक विनीत संखे यांनी सोमवार, 25/05/2015 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही पुस्तकं एक अजब गोष्ट आहे. मानवाच्या सर्व संभाषिक प्रकारांमधला सर्वात जास्त "हेकेखोर" प्रकार आहे हा … खरंच !!! माझे विचार, माझ्या संवेदना, माझा न्याय आणि माझाच निवाडा… माझ्या भिंगांमधूनच जग पहा … नाही आवडलं तर वेळीच प्रतिक्रिया द्यायची सोय नाही … पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय तर शक्यच नाही … लेखकाला सगळं छापून आल्यावर मग प्रतिक्रियांची पत्र , इमेल पाठवून काय उपयोग?

वैनी........२ (अंतीम)

लेखक चुकलामाकला यांनी शुक्रवार, 22/05/2015 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
त्यानंतर मधून मधून संध्याकाळी परड्यात वैनी दिसू लागली . कधी विहिरीवर पाणी भरताना तर कधी झाडताना . ती दिसली की आम्ही मोठ्ठ्यानं गलका करू, "वैनी अंजीर , वैनी अंजीर ." ती बिचारी अंजीर ओच्यात वेचून घेऊन येई . आमचा अंजीरांचा खुराक पुन्हा सुरु झाला . काही दिवसात आमची आणि वैनीची गट्टी जमली. अलीकडे बळवंतराव लवकर घरी येई . मग तो आणि वैनी फिरायला बाहेर पडत. ती दोघं निघाली की इकडे सरूच्या तोंडाचा पट्टा चालू होई , " आता आइसक्रीम खातले , आमका नाय देवचे . परवा ह्यो गुळयाचे भजे घेऊन इल्लो . खोलीत जाऊन दोघा गुपचूप खाय होती . आमका एक पण देउक नाय , माका वास इलो.

फ्रॅन्झ काफ्का....आदरांजली-१ : निवाडा....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/05/2015 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire फ्रॅन्झ काफ्का..... ३ जुन १९२४ रोजी फ्रॅन्झ काफ्काचा त्या काळातील असाध्य रोगाने म्हणजे टी.बीने मृत्यु झाला. अजून एका महिन्याने त्याचा ४१वा वाढदिवस साजरा झाला असता. त्याच्या मृत्युनंतर सापडलेल्या अनेक चिठ्याचपाट्यात त्याने त्याच्या जिवलग मित्राला, मॅक्स ब्रॉडला लिहिलेली पत्रे सापडली.

डोक्क्यात जाणारी सेल्समनशिप

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 14/05/2015 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
सेलिंग किंवा मार्केटिंग हे एक स्किल आहे; जे सगळ्यांना जमत नाही. एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी समोरच्या माणसाला प्रवृत्त करणं, हे मला तरी महाकठीण काम वाटतं. नॉट माय चहाचा कप. आज बाजारात तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तरी तुमच्यापुढे अनेक पर्याय असतात. बरं, स्पर्धा इतकी आहे की कंपन्याही आपली वस्तू विकली जावी (मग ती कशीही असो काहीही असो) हा एककलमी कार्यक्रम घेऊन शर्यतीत उतरलेल्या असतात. त्यांचे मोहरे असतात ते म्हणजे सेल्समन. ग्राहक म्हणून तुमचा अधिक संबंध येतो तो या 'सेल्समन' नावाच्या प्रजातीतील व्यक्तींशी. कुणाचीही हेटाळणी करायचा उद्देश नाही, त्यामुळे हलकेच घ्या (take it easy).