Skip to main content

लेख

पारंपारिक प्रतिस्पर्धी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 10/02/2015 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर अजुन बरोब्बर ५ दिवसांनी, रविवार, १५ फेब्रुवारी २०१५ रोजी, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासुन बघा, २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे.

एक इंटर्व्ह्युचा दिवस

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 09/02/2015 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
ऑक्टोबर २०१४ ची गोष्ट आहे, माझ्या कंपनीमधे ज्युनिअर इंजिनिअर (१ ते ३ वर्षं अनुभवी लोकांसाठी) लेव्हल साठी इंटर्व्यु होते. माझ्याही विभागासाठी ही भरती असल्यामुळे मी, माझे बॉस आणि एच.आर. असे इंटर्व्ह्यु घ्यायला बसलो होतो. ज्युनिअर लेव्हलची भरती असल्यानी पगाराची रेंज ठरलेली होती (१२,५०० ते १७,५०० रुपये). ६ उमेदवार आलेले होते. एकेकाची टेक्निकल मुलाखत वगैरे घेउन मग एच.आर. पगाराचा आकडा त्यांच्या आधीच्या सॅलरी स्लीप पाहुन आणि एकुण मुलाखतीवरुन "निगोशिएट" करत होती.

नरहरी सोनार हरीचा दास

लेखक देवदत्त परुळेकर यांनी शनिवार, 07/02/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया). त्यांना भावपूर्ण आदरांजली. वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते. वाड्‌.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो. यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता.

सबप्राईम क्रायसीस्,दलाल स्ट्रिट आणी........

लेखक जेपी यांनी गुरुवार, 05/02/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
सबप्राईम क्रायसीस- साल होत २००५ साहेब दुसर्‍यांदा सिएम झाले.पण पुन्हा सिएम होण सोप नव्ह्त.स्पर्धा तिव्र होती,साहजीकच सायबांना भक्कम किमंत मोजावी लागली.साहेब त्याला गुतंवणुक समजुन कशी वसुल करता येईल याचा विचार करु लागले. थोड्याच काळात एक एक सरकारी कार्यालय गावात येऊ लागत.त्या सोबतच नव्या माणसांची गावात भर पडु लागली. नव्या लोकांसाठी जागेची मागणी वाढु लागली.गावा तस लहान त्यामुळे फारशी जागा नव्हती.त्यामुळे २००८ येता येता गाव आडवतिडव पसरु लागल. साल २००९, २६/११ घडल आणी सायबांच पद गेल.गावात निराशा पसरली.पण साहेब धोरणी होते आणी त्यांची गुंतवणुक अजुन वसुल झाली नव्ह्ती.त्यांनी आणखीन गु

दुष्काळ आणी पॅकेज: काही किस्से ३ (अंतिम)

लेखक जेपी यांनी बुधवार, 04/02/2015 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ ================================================================================== वेळ:- मागच्या काळात कधी तरी.. एके काळी 'गरीब ग्राहकानां अन्न परवडावे' या मिषाने सरकार पध्दतशीरपणे शेतीमालाचे भाव पाडत असे.लेव्ही लावणे.तसेच मोक्याच्या वेली स्वतःची कोठारे उघडुन पुरवठा वाढवणे,आपल्या शेतकर्‍यांवर निर्यात बंदी लादणे आणी प्रसंगी तोटा सोसुन शेतमाल आयात करणे..

वै. विष्णुबुवा जोग महाराज

लेखक देवदत्त परुळेकर यांनी बुधवार, 04/02/2015 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
विष्णुबुवा जोग महाराज यांची आज पुण्यतिथी (गुरुप्रतिपदा) त्यांना भावपूर्ण आदरांजली. ते नाशिकला रामकुंडावर स्नानासाठी गोदावरीमध्ये उभे राहिले. तीरावरील तीर्थोपाध्याय संकल्प सांगू लागला - " पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव: ॥ बुवा एकदम त्याच्यावर खेकसले. "मी पापीही नाही, पापकर्मीही नाही ! दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा, एवढा हा संकल्प उच्चाराल, तर खबरदार !" कोण होते हे बुवा ? या दुर्लभ संत पुरुषाला विष्णुबुवा जोग या नावाने ओळखतात.

आशावाद

लेखक मित्रहो यांनी बुधवार, 04/02/2015 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
“काय आज तुझी बाई नाही आली का? “नाही” “२६ जानेवारी, नॅशनल हॉलीडे का?” “तिला तिच्या मुलांना फिरायला घेउन जायचे आहे” “काय?” “हो तीन चार महीन्यातून एकदा मुलांना कुठेतरी फिरायला घेउन जायला सुट्टी घेते.” मी अवाक. खरे म्हणजे मुलांना फिरायला घेउन जाणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते आपण ते नेहमीच करतो परंतु कामवाली बाई ही मुलांना फिरायला घेउन जायला नियमित सुट्टी घेते हे जरा नवीन होते. त्यामुळे आश्चर्य वाटले पण तसा विचार केल्यास ही फार आशादायी अशी घटना होती.

मराठी दिनानिमित्त लघुकथा स्पर्धा

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 01/02/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख. ..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत. या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील. १. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात. २.

दुष्काळ आणी पॅकेज:काही किस्से २

लेखक जेपी यांनी रविवार, 01/02/2015 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळ आणी पॅकेज;काही किस्से १ वेळः साल २००५ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दुष्काळग्रस्तांनसाठी १०७५ कोटीचे पॅकेज जाहिर केले.एकीकडे हे पॅकेज जाहीर झाले व दुसरीकडे सरकारने कापसाच्या हमीभावावर दिला जाणार २०% बोनस रद्द केला.त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांना पहिल्या वर्षी १७०० कोटी,दुसर्‍या वर्षी १४०० कोटी तर तिसर्‍या वर्षी १५०० कोटीचा फटका बसला.