मन अतर्क्य....
मानवी मन खरंच किती चंचलअसतं. मनाचे झालेले समज,मनाने तयार केलेल्या अनेक दिवसांच्या ओळखी पूर्णपणे बदलायलाकाही क्षणच पुरेसे असतात. आपल्याला सर्वात जवळचा वाटणारा व्यक्ती काही क्षणातचइतका परका होतो कि ज्याच्या बरोबर आपण अनेक गोष्टी शेअर केलेल्या असतात त्यालानुसते समोर पाहायला हि आपल्याला नकोसे वाटू लागते. त्याच्याशी बोलणे तर सोडाचत्याचा आवाज ऐकला तरी आपल्या मनातील कोलाहल जागृत होऊ लागतो. अश्यावेळी मनाला शांतकरणे अगदीच अशक्य होते. हे मनाचे बदलच मानवी मनाला अतर्क्य बनवतात. मानसशास्त्राचेकितीही शिक्षण घेतले तरी मानवी मनाला अगदी अचूक ओळखण्याची शक्ती कोणालाही मिळतनाही.
अशावेळेला भूलभुलय्या नावाच्याएका चित्रपटात आलेले वाक्य मला फार आठवून जाते. Psychology is only science without any definition. हर आदमी की सोच अलग, हर ताले की चाभीअलग. एखाद्याला एखादी गोष्ट चुकीची वाटली तर तीच गोष्ट दुसऱ्यालाही चुकीचीच वाटेलअसे नाही. एखाद्या सापाला मारताना पाहून सर्पमित्राला दुख: होते, त्याच गोष्टीचेदुख: एखाद्या सामान्य माणसाला होईलच असे नाही. अश्या ठिकाणी माणसाच्या भावना समजणेफार कठीण जाते. आपण त्या माणसाच्या गतजन्माचा कितीही आधार घ्यायचा ठरवला तरी अनेकवर्षे चहा ज्याला अतीव प्रिय आहे ती व्यक्ती आजही चहालाच पसंती देईल ह्याची शंभरटक्के खात्री द्यायला कोणी तयार होईल का? अगदी जवळची नात्यातली मंडळी असतील तरीत्यांचाही अंदाज काही कारणास्तव चुकीचा ठरू शकतो.
अश्या ठिकाणी नशीब हाfactor समोर येऊ लागतो. ज्याप्रमाणे घाटात अत्यंत सराईतपणे गाडी चालवणाऱ्याचालकाचा अंदाज काही कारणास्तव चुकू शकतो त्याचप्रमाणे मनाचा अंदाज लावणाऱ्याचाअंदाजही चुकू शकतो. ह्याला नशीब समजून सोडून देता आले पाहिजे. नशीब मानवी रूप धारणकेलेल्या देवाला चुकले नाही तर आपण तर सामान्यातिसामान्य आहोत. आपल्याला कसेचुकणार. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे , फळ मिळणे नाही. आपण प्रयत्न करूनवर्तमानात राहावे आणि चुकलेल्या अंदाजांची शिक्षा भविष्यावर सोडावी हेच योग्यआहे......
याद्या
1420
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
ह्म्म्म्म
खरंय ! अतर्क्य हाच एक शब्द