होयहोय- नाहीनाही
सकाळचे चार वाजले होते. घरातील सर्वच माणसे गाढ झोपी गेली होती. आज कोर्टाच्या कांहीतरी कामासाठी, शामरावला लवकर शहरात पोहचायचे होते.एवढ्या सकाळी एसटी पण असणार नाही,बघू काय वाहन मिळते का! शामरावने आपले सर्व विधी, आधीच आटोपले होते. बरोबर चंची,आडकित्ता,सुपारी सर्व कांही त्यांने आपल्या बरोबर घेतले होते. कंबरेला नेसायचे धोतर त्याने उगीच उशीर नको ,म्हणून हातातच घेतले होते. मळकट पांढरा शर्ट,त्या खाली लंगोटी ,डोक्याला मुडांस असा एकदंरीत त्याचा पेहराव होता. सोप्यात येऊन त्यांने एक मिणमिणता दिवा लावला.
मिसळपाव
