Skip to main content

लेख

द्वेषाची खाई....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 19/08/2015 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
टिळकांच्या मृत्युनंतर जो खास अंक इंदूप्रकाशने काढला, त्यातील "प्रकाशकाचे दोन शब्द" येथे टाईप करुन टाकतो आहे कारण फोटोमधील अक्षर फार लहान येते व वाचता येत नाही. हे टाकायचे कारण म्हणजे त्यावेळेस सामाजिक व राजकीय वातावरण किती प्रगल्भ व विचारी होते हे समजते. आत्ताच्या जाणत्या राजांबद्दल काय बोलावे ? स्वत:च्या झेंड्याखाली चार टाळकी जमविण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात.

अस्तित्वकण

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 18/08/2015 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच ब्राम्हवृंद, घासुन-पुसून पुरंदरेंच्या पुरस्काराला सपोर्ट करतायत... बरेच मराठे, चिडून-दाबून पुरंदरे या व्यकती/जातीला विरोध करतायत... उर्वरित महाराष्ट्र 'आम्हाला काही घेणं देणं नाही' या तिरहाईत नजरेने या दोघांच्या (टिपिकल) महाराष्ट्रीय भांडनाकडं ‘साहजिक’ पाहतोय... "अरविंद केजरीवाल ऑनलाइन सेना" दिवसभर "वुई वांट मोदी एज अवर पीम" ला शिव्या देण्यात गर्कय... उभे केलेले कारखाने बंद पाडून तिकडं उस्मानाबादेत मोठमोठे साहेब मोठमोठे मोर्चे काढ़तायत... इकडे शेतकरी नेहमी सारखी पावसाची वाट बघतोय, तिकडे मोदी नेहमीसारखं परदेश दौऱ्यावऱ सेल्फ़ी काढतोय... राहुल नितीश लालू नेमाडे आव्हाड राधे माँ भागवत

उडत्या तबकड्या आणि कर्णमय

लेखक दिनु गवळी यांनी सोमवार, 17/08/2015 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - (उडत्या तबकड्या - काल्पनिक कथा) मुंबईला गेलेला करण अजून आला नाही, म्हणून त्याच्या घरचे सर्व जण काळजी करत अंगणात बसले होते. तेवढ्यात करणच्या येण्याची चाहूल लागली. सर्व जण उठून उभे राहिले. करण आल्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला. त्याचे बाबा सदानंद त्याला म्हणाले, "एवढा उशीर का बरं झाला?" तेव्हा करण म्हणाला, "बाबा, आमची बस वाटेत पंक्चर झाली होती, म्हणून यायला उशीर झाला." मग सर्व जण घरात आले. जेवण वगैरे आटोपून सर्व गप्पा मारीत बसले. तसे पाहता करणच्या घरात त्याचे आजोबा, बाबा, आई आणि एक लहान भाऊ दिनू.

विहीर - कथा

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 16/08/2015 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
गावाबाहेरच्या माळाजवळ सदूची चहाची टपरी होती . शेजारच्या रस्त्यावरून जाणारे वाहनचालक , प्रवासी हेच त्याचे गिरहाईक. एरवी मोकळ्या वेळात सदू त्या माळावर चालणारे मुलांचे खेळ , दंगा पाहात बसे . त्या माळावरच एक जुनाट पडकी विहीर होती . एखादी खोडसाळ पोरे जर खेळताना त्या विहीरीच्या फार जवळ जात असेल ,तर , सदू त्या पोरांवर जोरात ओरडत असे " ए पोरांनो , त्या ईहिरीच्या जवळ जाउ नका . आरं , त्या ईहिरीमध्ये सात आसरा हाईती . त्या माणसाला भूलवून पार पाताळात घेऊन जातात . पळा तिथनं " . सदूच्या ओरड्यामूळे आणी त्या विहीरीच्या भीतीमूळे पोरं तिथून लांब पळून जात . आज सदू खूप अस्वस्थ होता .

" शोले " चित्रपटाला ४० वर्ष झाल्याच्या निमित्ताने ..

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 15/08/2015 03:34 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्ट १९७५ - १५ ऑगस्ट २०१५ .. शोले चित्रपटाला ४० वर्षे झाल्याच्या निमित्ताने एक जुना पूर्वप्रकाशित लेख ईथे प्रकाशित करतोय. शोलेच्या मानाने लेख साधासाच आणि छोटासाच आहे, पण त्या निमित्ताने सर्वांच्या शोलेच्या आठवणी ताज्या झाल्या तर उत्तमच :) ................ ................ "तू अजून शोले नाही पाहिलास...???" मी जवळजवळ किंचाळलोच. जेव्हा कोणी शोले न पाहिलेला भेटतो तेव्हा माझी हीच प्रतिक्रिया असते. माझी कशाला, ज्याने ज्याने शोले पाहिला आहे, या चित्रपटावर भरभरून प्रेम केले आहे त्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया अशीच काहीशी असावी.

६५ क्रॉमवेल अ‍ॅवेन्यु, हायगेट, लंडन.

लेखक पद्मावति यांनी शनिवार, 15/08/2015 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन च्या आर्चवे ट्यूब स्टेशन च्या बाहेर येताच हायगेट हिल रोड ने सरळ सरळ चालत आलं की उजव्या हाताला एक रस्ता वळतो हा रस्ता आहे क्रॉमवेल अ‍ॅवेन्यु. एका मध्यमवर्गीय वसाहतीतला हा साधारणसा रस्ता. मुख्य रहदारीपासून जरा आतल्या भागाला असल्यामुळे इथे ट्रॅफिक सुद्धा कमीच असतो. या रस्त्याला वळून उजवीकडे आठ-दहा घरे सोडली की आपण उभे राहतो एका अगदी साध्या सुध्या रूपाच्या एका विक्टोरियन पद्धतीच्या घरासमोर. हे सर्वसामान्य दिसणारे घर मात्र इथल्या बाकीच्या घरांपेक्षा फार वेगळं आहे. या घराला इतिहास आहे तो भारतीय स्वातंत्र्य लढयाचा.

MIDC

लेखक अर्थहीन यांनी बुधवार, 12/08/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
लंच संपवून डेस्क वर येऊन बसतो. अर्थहीन लंच-चा टॉपिक- त्याहून जास्त अर्थहीन असतो. "शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज असते का?" एकजण शहरातला त्यात ताड़-ताड़ बोलत असतो. सगळ्यांना सपशेल निरुत्तर करुन सोडतो. म्हणतो- ते गरीब तिकडं राना-ऊना-पावसात राबतात, कधी लाईट नसते, तर कधी पाणी. तरी आपलं खायचं अन्न पिकवतात. त्यांना हवी ती मदत सरकारने करायलाच हवी. बायोस्कोपची 'बैल' कथा बघुन रडलो होतो मी. मला त्याचं पटतं. (--ती कथा भक्कम होती.) हा शहरातला असून याला कळवळा किती असं मी मनाला म्हणतो. तर मन म्हणतं -खरंय तुझं. ऐकताना मलापण असंच वाटलं याच्याबद्दल.

भाषेरी कुंपण

लेखक अर्थहीन यांनी सोमवार, 10/08/2015 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
लेख दुसरा... हा एक प्रयोग आहे... माहित नाही किती जणांना कनेक्ट होऊ शकेन... प्रतिक्रियांची वाट पाहत आहे... ........भाषेरी कुंपण......... आता मी हळू हळू लिहायला घेतोय. माझ्या नेहमीच्या टेबलवर -नाही- खुर्चीवर बसून. -बसलोय. पेन वही समोर ठेऊन. -ठेवलीय. आता हळू हळू हे आर्टीकल लिहिता लिहिता मी स्वत:च्या सबकॉन्शियस मधे अलगद$$ प्रवेश करेन. -केलाय. मी आज भाषेशी खुप भारदस्त प्रयोग करणार आहे. -करतोय. माझ्या -'इथल्या!' सबकॉन्शियस मधे वडलांना आणणार आहे. -आनलंयही. अन वडलांच्या 'गावच्या' सबकॉन्शियस मधे मी जाणार आहे. -गेलोयही. (मला भाषा हवी तशी वळवता येईल काय?? 'हा' तो प्रयोग. मी यशस्वी होईल??

माझे व्यायामाचे फ़ंडे- २

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 10/08/2015 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझे व्यायामाचे फंडे - २ (कृपया वाचकांनी लेखाच्या तांत्रिक बाबींकडे न पाहता, निव्वळ एक काल्पनिक विनोदी किस्सा म्हणून हा लेख वाचावा, ही विनंती आहे.) आमच्याच शहरातील महानगरपालिकेच्या हॉलमध्ये ही योगासने शिकवली जात होती. योगासनासारख्या आरोग्याशी निगडित गोष्टीसाठी नेमका महानगरपालिकेचा हॉल कसा काय मिळतो कुणास ठाऊक? त्यात भरीस भर म्हणून नेमका हा योगासनाचा वर्ग भाजी मंडईत होता. तिथे असणारी स्वच्छतागॄहे खूपच अस्वच्छ होती. योगासने करताना कधी कांद्याचा तर कधी ढब्बू मिरचीचा, कधी आंब्याचा तर कधी फणसाचा.. सीझनप्रमाणे वेगवेगळे वास येत होते.

पळसधरी (पुण्यनगरी) कट्टा वृतांत

लेखक माझीही शॅम्पेन यांनी रविवार, 09/08/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
(काट्याचा वृतांत लिहिणे हा प्रांत नसताना आणि अंगावर जबाबदारी पडून कसातरी लिहिला आहे , डॉक्टर ,मूवी , कंजूस आणि माप ह्यांनी अजून छायाचित्र क्षण चित्रे / किस्से जरूर टाकावेत) रविवारी सकाळी भल्या पाहते मऊ दुलईतून खिडकीबाहेर पाहिले अजूनही अंधारलेल होत पाउस अगदी कोसळत होता समोरचा येउरचा डोंगरही ढगात लोपला होता , परत मस्त ताणून देऊ का ह्या विचारात होतो इतक्यात लक्ष्यात आल अरे आज "पळसदरी कट्टा" , त्या तीन दिवस आधी डॉक्टर खरेंनी "काय आप्पा" कट्ट्यावर आमंत्रण दिल होत आणि त्यांना सांगूनही टाकल होत येतो म्हणून !!