फटकळपणा आणि फटकारणं.
"दुसर्याला चांगलंच फटकारायला मिळाल्याची एखाद्याला संधी मिळाली की त्याला मात्र बरंच समाधान वाटत असतं. हे असं का?" मी प्रो.देसायाना विचारलं.
आता खरंच गरम व्हायला लागलं आहे. पण एक बरं आहे की बाहेर पडल्यावर सावलीत मात्र खूप थंड वाटतं. तळ्यावरचा हा आमचा बसायचा बाक एका गुलमोहरच्या झाडाखाली ठेवला आहे. मला तांबड्या गुलमोहरचं झाड आवडतं.ती तांबडी फुलं झाडाला खूप शोभा आणतात.
आज प्रो.देसाई माझ्या अगोदरच तळ्यावर येऊन आमच्या रोजच्या बाकावर माझी वाट बघत बसले होते. त्यांच्या हातात एक पुस्तक होतं.माझी खात्री होती की स्वतः वाचून झाल्यावर ते पुस्तक ते मला वाचायला देतात.
मिसळपाव
हिंदी चित्रपटसृष्टीला ज्या अनेक संगीतकारांनी सजविले त्या प्रत्येकाची शैली स्वतंत्र होती. मदनमोहन यांचे वेगळेपण अगदी ठळकपणे डोळ्यात भरते. मदनमोहन हे आर्मीमध्ये काही वर्षे सर्विस केल्यामुळे शिस्तप्रिय आणि अचूक कामासाठी प्रसिद्ध होते. गजलसम्राट म्हणून ते ओळखले जायचे. अनेक नितांतसुंदर अजरामर गाणी विशेषत गजल्स त्यांनी आपल्याला दिलीत.
हिंदी चित्रपट गीते आवडत नाहीत असे म्हणणारा विरळाच. जसे मला आंबा आवडत नाही असे म्हणणारा असेल इतकी ही गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग होऊन बसलेली असतात.