Skip to main content

लेख

बॉडीलाईन - ४

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 08/07/2015 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
बॉडीलाईन - , , ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने जार्डीनवर केलेला अखिलाडूवृत्तीचा आरोप मागे घेतल्याने ब्रिस्बेन आणि सिडनी इथे मालिकेतील उर्वरीत दोन टेस्ट खेळल्या जाणार हे निश्चित झालं. अ‍ॅडलेड टेस्टच्या दरम्यान बिल वूडफूल आणि पेल्हॅम वॉर्नर यांच्यादरम्यान झालेली बोलाचाली वॄत्तपत्रांपर्यंत पोहोचवण्यात जॅक फिंगल्टनचाच हात असावा अशी बर्‍याच जणांची खात्री झाली होती. त्यातच अ‍ॅडलेड टेस्टच्या दोन्ही इनिग्जमध्ये फिंगल्टनला भोपळाही फोडता आला नव्हता.

कोळ्याची पोर

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 07/07/2015 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
“माझ्या लहानपणी माझ्या आजीने मला समुद्रातून मासे कसे पकडावेत आणि जीवनात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असावा हे तिच्या दृष्टीने तिने मला शिकवलं.” हल्लीच मी सातबंगल्याच्या फिशरीझ रिसर्च इंन्स्टीट्युटमधे माझ्या एका मित्राच्या मुलाला भेटायला म्हणून गेलो होतो.डॉक्टर शृंगारपुरे, म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा, इथे रिसर्च सायंटीस्ट म्हणून काम करीत आहे असं माझा मित्र मला म्हणाला होता.त्याची भेट झाली,हवी ती बोलणी झाली, आणि मी त्याचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडत होतो,तेव्हड्यात लॉबीमधे एक मुलगी माझ्या जवळून जात असताना माझ्याबरोबर हसली.मी तिला मागे वळून पाहिलं तर तिही मला मागेवळून पहात होती असं दिसलं. तिच्याश

बॉडीलाईन - ३

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 07/07/2015 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
बॉडीलाईन - , अ‍ॅशॅस मालिकेत आतापर्यंत १-१ बरोबरी झाली होती. नाटकाचा तिसरा अंक रंगणार होता तो अ‍ॅडलेडच्या मैदानात! मेलबर्न टेस्टमधील विजयामुळे बॉडीलाईन बॉलिंग सुरवातीला वाटली तितकी धोकादायक नाही असा ऑस्ट्रेलियन प्रेक्षक, पत्रकार आणि क्रीडासमीक्षकांचा ग्रह झाला होता. त्यातच दुसर्‍या इनिंग्जमध्ये ब्रॅडमनने शतक झळकावल्यामुळे तर त्याला बॉडीलाईनवर उपाय सापडला आहे अशी सर्वांची पक्की खात्रीच पटली होती.

गती

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 06/07/2015 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते. काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही. सर्व चराचर सृष्टी सततच बदलत असते.

ऑपरेशन डार्कविंटर (भाग-१)

लेखक डॉन व्हिटो कॉर्लिऑन यांनी सोमवार, 06/07/2015 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
अफगाणिस्तान-कंदाहार पहाटे २.००-२.३० भयानक थंडीच्या त्या रात्री सगळं कंदाहार दुलईमधे गुरफटुन झोपलेलं होतं. अपवाद होता तो कंदाहारपासुन जेमतेम ३ कि.मी. अंतरावर असणार्या एका भग्न हवेलीचा. कोणे एके काळी अंगभर वैभव मिरवलेली ती इमारत आज मात्र साध्या चुन्याच्या रंगाला पारखी झालेली होती. बाहेरच्या दिड-दोन पुरुष उंचीच्या भिंती जागोजागी कोसळलेल्या होत्या. कोणे एके काळी जिथल्या खोल्या तेलबत्तीच्या दिव्यांनी उजळलेल्या असायच्या त्यापैकी बहुतांश खोल्या आता मात्र कायमच्या अंधाराच्या मगरमिठीमधे गारद झालेल्या होत्या.

बॉडीलाईन - २

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 05/07/2015 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
बॉडीलाईन - १ एम सी सी चा संघ ऑस्ट्रेलियात दाखल होताच डग्लस जार्डीनच्या स्वभावाची चुणूक पुन्हा ऑस्ट्रेलियन पत्रकारांना अनुभवण्यास मिळाली. टेस्ट मॅचेस सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक संघांविरुद्ध एम सी सी चा संघ काही सामने खेळणार होता. या सामन्यांपूर्वी पत्रकारांना संघातील खेळाडूंची कोणतीही माहिती देण्यास जार्डीनने ठाम नकार दिला! त्याच्या जोडीला नेहमीच्या पत्रकार परिषदांमध्येही अनेकदा ऑस्ट्रेलियन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यास त्याने नकार दिला!

बॉडीलाईन - १

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 04/07/2015 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
१९७२ मधली एक संध्याकाळ... सिडनीच्या एका उपनगरातील रस्त्यावरुन एक म्हातारा नेहमीप्रमाणे रमतगमत फेरी मारण्यास निघाला होता. रस्त्याने जाणारे अनेक लोक त्या म्हातार्‍याकडे पाहून आदराने अभिवादन करत होते. तो म्हाताराही सर्वांच्या अभिवादनाचा हसतमुखाने स्वीकार करत होता. अर्थात हे रोजच होत असल्याने त्यालाही आता त्याची सवयच झालेली होती. ऑस्ट्रेलियन नागरीकांचा मानबिंदूच होता तो! आपल्या नेहमीच्या रस्त्याने तो जात असतानाच त्याच्याच वयाचा एक दुसरा म्हातारा अनपेक्षितपणे त्याच्यासमोर येऊन उभा ठाकला!

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ५

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 03/07/2015 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १' नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २ नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३ नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४ नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ५ Simple, Free Image and File Hosting at MediaFire चेरबोर्गच्या द्वीपकल्पावर जे छत्रीधारी सैनिक उतरले त्यावरुन जर्मनीच्या अधिकाऱ्यांना आक्रमण सुरु झाले आहे याची कल्पना येण्याची तशी काहीच शक्यता नव्हती पण वस्तुस्थिती तीच होती. ते १२० अमेरिकन छत्रीधारी सैनिक हे रस्ते शोधण्याच्या व सामान टाकण्याच्या जागांवर खुणा करण्याच्या कामगिरीवर उतरविण्यात आले होते. त्या बिचाऱ्यांचे पहिल्यापासूनच हाल झाले. जर्मनीच्या तोफखान्याने त्यांचे दर्शन होताच आकाशात प्रकाश फेकणाऱ्या गोळ्यांचे जाळे विणले व त्या प्रकाशात गोळ्यांचा व तोफांचा अतिभयंकर

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 02/07/2015 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १' नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २ नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३ नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ४ खराब हवामानाने जर्मनीच्या समादेश साखळीत चांगलीच शिथिलता आली. जवळजवळ सगळ्याच मुख्यालयातून ‘आता लगेच काही आक्रमण होत नाही’ असे बोलले जाऊ लागले.