खूब-रुयोंसे यारियाँ न गयी..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
25 Jun 2015 - 2:12 pm

हसरत मोहानी.. मौलाना हसरत मोहानी हे भारतातले शायर. प्रेमाच्या शायरीसोबत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार्‍यांपैकी एक ठळक मनुष्य. सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्‍यांपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचा खास समर्थक.

तुरुंगवास तर खूपच सोसलेला. तुरुंगातही बरंच काव्य केलेलं आहे. त्याच्या फ्रीडम फायटर या अंगापेक्षा आज आत्ता त्याची ही एक गझल इथे आठवण्याची इच्छा होतेय. सगळेच शेर नाही घेत इथे. थोडेसेच.. पण अगदी पुरेसे. यातली अर्थाची समजूत ही निव्वळ एक विशिष्ट एकट्याने ऐकताना झालेली समजूत आहे. शेर वेगवेगळ्या लोकांना खूप वेगळं काहीतरी सांगतात.. तीच तर त्यांची खुमारी. तेव्हा इतरांना काही वेगळा फ्लेवर सापडला तर मोअर द मेरियर..

...

खूब-रुयोंसे यारियाँ न गई
दिलकी बेइख्तियारियाँ न गई

खूबसूरत चेहर्‍यांशी, त्या सुंदर मुखड्यांशी जीव लावणं सुटलं नाही..
हृदयाचं, दिलाचं ओढाळपण सुटलं नाही..

अक्ल ए सब्र ए आश्नासे कुछ न हुआ
शौक की बेकरारियाँ न गई

संयम, धीर वगैरे सगळ्या सगळ्याची अक्कल असूनही काही उपयोग नाही झाला..
आस लागण्यातली, त्या आसुसलेपणातली बेचैनी सुटलीच नाही..

दिनकी सहरानवर्दियाँ न छुटी
शब की अख्तर शुमारियाँ न गई

दिवसाची माझी वाळवंटात तापत रखडत सरकणारी ती सफर चालूच राहिली, ती सफर सुटली नाही
आणि तरीही रात्रीचं माझं ते आसमानातले तारे मोजणं.. तेही सुटलं नाही.

थे जो हमरंग ए नाज उनके सितम
दिलकी उम्मीदवारियाँ न गई

तिचे अन्याय अन अत्याचार तिच्याच रंगरुपाचे होते..तिच्याच चेहर्‍याचे होते... तिच्यासारखेच..
पण.. हृदयाची, दिलाची त्या स्पर्धेतली उमेदवारी, आशा संपली नाही..

तर्ज ए मोमिनमें मरहबा हसरत
तेरी रंगीं निगारियाँ न गई

वा रे हसरत*.. देवाधर्माला कडक पाळून चालण्याच्या तुझ्या या नादात, तुझ्या या मार्गात..
तुझा रंगीबेरंगी नजरिया, हा रंगीलेपणा, ही तुझी रंगीबेरंगी शायरी मात्र सुटली नाही..

* खुद्द शायर

इथे ही "खूब-रूयोंसे" अवश्य ऐका.. दिल के पास जाऊन बसेल. गुलाम अलीसाहेबांची गायकी तर काय बोलावी. चार चांद.

चुपके चुपके रात दिन, आंसू बहाना याद है.. ही आणखी एक गजल. फारच जास्त प्रसिद्ध गझल आहे. किमान गजल ऐकणार्‍यांनीही ती एकदा ऐकलेली असते. तीदेखील हसरतसाहेबांनीच रचलेली आहे. त्याविषयी पुन्हा कधीतरी.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

चुकलामाकला's picture

25 Jun 2015 - 2:18 pm | चुकलामाकला

क्या बात! बहोत खूब!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Jun 2015 - 2:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हायला गवि, तुमचे हे उद्योग माहीत नव्हते..
कडक आहे गझल. येऊ द्या अजुन काही असच असेल पोतडीत तर...

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jun 2015 - 2:31 pm | ज्ञानोबाचे पैजार

गझल अतिशय आवडली
और आनेदो
पैजारबुवा,

इतरही शेर आपले आवडते असणारे येऊ द्या. अर्थ लागलेला नसेल किंवा धूसर असेल तर इथे लावण्याचा प्रयत्न करु. ज्यांना शेरांमधे रमायला आवडतं त्यांना मैफिलीत सर्वोच्च आनंद असतो.

वेल्लाभट's picture

25 Jun 2015 - 3:18 pm | वेल्लाभट

दारावर टक टक झाली असती तर एखादा सहज प्रतिसाद देऊन टाकला असता. इथे लॉकर वर टक टक झालीय.
एक तर ग़ज़ल, त्यात हसरत मोहानी सारख्या जब-याची, त्यात साक्षात दैवत ग़ुलाम अली......

जाउदेच. बर, या अशा अनवट ग़ज़ल ची ओळख, पारख असणारे तुम्ही दर्दी नसाल तरच नवल. सामान्यांची ग़ज़ल चुपके चुपके ला सुरू होऊन आवारगी करून हंगामा ला संपते. आलीच तर दिल में लहर येते. बास.

येउद्यात अजून ठेवणीतल्या.

वेल्लाभट's picture

25 Jun 2015 - 3:19 pm | वेल्लाभट

बाकी माझा पर्सनल फेवरेट अहमद फ़राज़.

गवि's picture

25 Jun 2015 - 3:32 pm | गवि

..वाह माशाल्ला..
.
.
..ये क्या के सबसे बयां दिलकी हालतें करनी
'फराज' तुझको न आयी मोहोब्बतें करनी..

..लाजवाब अद्वितीय शायर..

वानगीदाखल अहमद फराज़ यांची एक आवडती ग़ज़ल..

इससे पहले के बेवफ़ा हो जाए
क्यू न ए दोस्त हम जुदा हो जाए

तू भी हीरे से बन गया पथ्थर
हम भी जाने क्या से क्या हो जाए

तू के यक़्ता था बेशुमार हुआ
हम भी टूटे तो जाबजां हो जाए

हम भी मजबूरियोंका उज्र करें
फिर कहीं और मुब्तिला हो जाए

हम अगर मंजि़ले न बन पाए
मंजिलों तक का रास्ता हो जाए

देर से सोच मे है परवाने
राख हो जाए के हवा हो जाए

मोहब्बत खेल है नसीबों का
ख़ाक़ हो जाए के मियां हो जाए

बंदगी हमने छोड दी है फराज़
क्या करे जब लोग खुदा हो जाए

- अहमद फराज़

चुकलामाकला's picture

25 Jun 2015 - 4:26 pm | चुकलामाकला

ये रसूलों की किताबें ताक़ पर रख दो फराज़,
नफरतों के ये सहीफे उम्र भर देखेगा कौन

आता अहमद फराज शोधणे आले! फक्त गझल समजावी आणि तिचा आस्वाद घेता यावा म्हणून उर्दू शिकायचे मनात आहे. बघू कधी जमेल ते :)

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 9:33 am | विशाल कुलकर्णी

बाकी माझा पर्सनल फेवरेट अहमद फ़राज़.

हाथ मिलाईए जनाब.. , एकही कश्तीके सवार है हम...

जाने किस बात पे उस ने मुझे छोड़ दिया है फ़राज़ !
मैं तो मुफलिस था किसी मन की दुआओं की तरह..

उस शक्श को तो बिछड़ने का सलीका नहीं फ़राज़!
जाते हुए खुद को मेरे पास छोड़ गया

अब उसे रोज सोचो तो बदन टूटता है फ़राज़..
उम्र गुजरी है उसकी याद नशा करते करते

बे -जान तो मै अब भी नहीं फराज..
मगर जिसे जान कहते थे वो छोड़ गया..

जब्त ऐ गम कोई आसान काम नहीं फराज.
आग होते है वो आंसू , जो पिए जाते हैं.

क्यों उलझता रहता है तू लोगो से फराज.
ये जरूरी तो नहीं वो चेहरा सभी को प्यारा लगे.

वेल्लाभट's picture

26 Jun 2015 - 10:54 am | वेल्लाभट

वाह ! बहोत खूब ! वाह !

बज़्म-ए-मिपा मे लफ्ज़-ए-उर्दू के क्या कहने
लज़ीज़ सी मिसळ पर जो तर्री की बात है

चिगो's picture

28 Jun 2015 - 7:05 pm | चिगो

क्यों उलझता रहता है तू लोगो से फराज.
ये जरूरी तो नहीं वो चेहरा सभी को प्यारा लगे.

क्या बात.. माशाल्लाह..

मस्त धागा.एक अशीच साठवणीतली.
ज़िन्दगी से यही गिला है मुझे

ज़िन्दगी से यही गिला है मुझे
तू बहुत देर से मिला है मुझे

हमसफ़र चाहिये हुजूम नहीं
इक मुसाफ़िर भी काफ़िला है मुझे

तू मोहब्बत से कोई चाल तो चल
हार जाने का हौसला है मुझे

लब कुशां हूं तो इस यकीन के साथ
कत्ल होने का हौसला है मुझे

दिल धडकता नहीं सुलगता है
वो जो ख्वाहिश थी, आबला है मुझे

कौन जाने कि चाहतो में फ़राज़
क्या गंवाया है क्या मिला है मुझे.

ही मला आवडते तिच्यातल्या शब्दांसाठी.कारण एकतर ही शायरी वाचतानाच कळत जाते.वाचल्याचा आनंद द्विगुणित करत.शब्दाशब्दाला अडखळत वाचताना ती मजा नाही येत!

वेल्लाभट's picture

25 Jun 2015 - 4:50 pm | वेल्लाभट

सहज सुंदर ! :)

अनंत छंदी's picture

25 Jun 2015 - 5:06 pm | अनंत छंदी

गुलाम अलींनी मशहूर करून टाकलेली " चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" ही गझलही हसरत मोहानींचीच आहे. बाकी मला फराज यांची " शोला था जल बुझा हूं" अतिशय आवडते. फार सुंदर गायलीय मेहदी हसन यांनी.

उगा काहितरीच's picture

25 Jun 2015 - 5:41 pm | उगा काहितरीच

खरं सांगू ? मराठीत टाकले नसते तर शष्प कळाले नसते .शायरी हा प्रकारच झेपत नाही या पामराला.

रमेश आठवले's picture

25 Jun 2015 - 7:14 pm | रमेश आठवले

और आने दो -इर्शाद

नंदन's picture

25 Jun 2015 - 7:46 pm | नंदन

दिनकी सहरानवर्दियाँ न छुटी
शब की अख्तर शुमारियाँ न गई

केवळ!

रातराणी's picture

26 Jun 2015 - 12:32 am | रातराणी

अप्रतिम! नवीन गझलेची इतकी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! चष्मे बद्दूरच्या पहिल्याच सीनमध्ये तिघे मित्र स्मोक करीत रेडियोवर गझल ऐकत आहेत असा सीन आहे. सहज म्हणून शोधली ती गझल आणि सध्या तिच्या प्रेमात आहे.

देख तो दिल के जान से उठता है
ये धुवां सा कहां से उठता है
यूं उठे आह उस गली से हम
जैसे कोई जहां से उठता है
बैठ्ने कौन दे है फिर उसको
जो तेरे आस्तान से उठता है
इश्क़ एक मीर भारी पत्थर है
कब ये कूछ नातवन (?) से उठता हैं

(?) हा शब्द कसा लिहितात?

बाकी all टाइम फेवरीट मध्ये ही पण आहे,

हर एक बात पे कहते हो तुम की तू क्या है
तुम्हीं कहो के ये अंदाज़ ऐ गुफ्तगू क्या है?
रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल
जब आँख से ही न टपका तो फिर लहू क्या है?
चिपक रहा है बदन पर लहू से पैराहन
हमारी जेब को अब हाजत-ऐ-रफू कया है?

पथिक's picture

26 Jun 2015 - 2:18 pm | पथिक

नातवाँ - अशक्त, दुबळा

मुक्त विहारि's picture

26 Jun 2015 - 6:54 am | मुक्त विहारि

आम्ही आपले साध्या सरळ हिंदी भाषेत रमणारे.....

"तेरे बिना जिंदगी़ से कोई शिकवा तो नही

तेरे बिना जिंदगी़ भी कोई जिंदगी़ भे नहीं"

आम्ही आपले साध्या सरळ हिंदी भाषेत रमणारे.....

..मग हिंदी सिनेमांबद्दल भरपूर "शिकवे" क्यूं? ;-)

तशी कारणे बरीच आहेत.

पण त्याबद्दल परत कधी तरी.

सुंदर! खूब-"रुयोसे" ऐवजी खूब-"रुओसे" पाहिजे असं वाटतं.

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 10:07 am | विशाल कुलकर्णी

खाँसाहेबांनी 'खूब-रुयोसे' असाच उच्चार केलेला आहे.

(संपादक मंडळाला विनंती, कृपया वरील प्रतिसाद डिलीट करावा)

दोन्हीही उच्चार बरोबर आहेत. सॉरी.

उर्दू लेखी लिपीचं ज्ञान मला नाही, पण उच्चारी हिंदीसदृश भाषेत हा "य" अनेकदा "अ"च्या जागी गाताना येतो असं दिसतं.

"जरा आंख तो मिला" याचे उच्चारी अनेकदा "जराSSयांख तो मिला" असं होतं.

वेल्लाभट's picture

26 Jun 2015 - 10:44 am | वेल्लाभट

ती गायनातली सोय असावी माझ्या मते. रूढ उच्चार नसावा.

गवि's picture

26 Jun 2015 - 11:30 am | गवि

तेच.. एक्झॅक्टली..

वपाडाव's picture

26 Jun 2015 - 1:49 pm | वपाडाव

गविकाका, येउ द्या...
शिकत आहे.

पैसा's picture

26 Jun 2015 - 10:34 pm | पैसा

मस्त! इथे तर मैफिल सुरू आहे!

जुबेर बिजापुरे's picture

29 Jun 2015 - 10:31 am | जुबेर बिजापुरे

१)मरिझे मोहब्बत उनिहिका फसना
२)आज जाने कि झिद ना करो
वाखु करायच्या रहिल्या.