मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खास आवडीचे!!!

राघव · · जनातलं, मनातलं
काही काही कलाकृती/प्रसंग अवचित आवडून जातात. ते का आवडले हे सांगण्यासाठीसुद्धा काही वेळा आपल्याकडे शब्द नसतात. त्यांचीच आठवण जागवण्यासाठी हा धागा.. माझ्यापासूनच सुरुवात करतो :) - दिल चाहता है हा माझा खूप आवडता चित्रपट. भावून जातो. कलाकार, वातावरण, छायाचित्रण, पटकथा-संवाद, संगीत-गाणी; सगळं कसं मस्त जमून आलेलं! पण या चित्रपटाचा एक विशेष मला फार आवडतो. त्याची निळाई!! बहुतेक फ़्रेम्समधे हा निळा रंग कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरल्या गेलाय. चित्रपटाच्या कथा-पटकथेच्या प्रकृतीनुसार निळा रंग अगदी चपखल आहेच, कारण त्याने येणारा शीतलतेचा तजेला आपल्याला त्या वातावरणाच्या जवळ घेऊन जातो. पण हाच निळा रंग चित्रपटात डिंपल कपाडियाच्या घरात वापरलाय - प्रकृती बदलून!! Pail निळसर झाक असलेला हा रंग, प्रकाशयोजना एक उदास वातावरण सहज निर्माण करून जातो. जेव्हा जेव्हा हा चित्रपट बघतो तेव्हा तेव्हा अनेक तपशील आणिक कळत जातात. थोडा वेडेपणा आहे परत परत तोच चित्रपट बघण्यात! पण हा वेडेपणा करावासा वाटतो!! :) आणखी एक, सचिन तेंडुलकर ने दोन फील्डर्सना भेदून कव्हर्स मधून मारलेला जमिनीला चिकटून जाणारा चौकार!! तसे बरेच खेळाडू हा फटका सुंदर मारतात. पण सचिन मारतांना सुंदर दिसतो सुद्धा!! किंचित पुढे वाकून, डावा पाय पुढे करत मारलेला हा फटका म्हणजे फक्त हाSSSSय!!! जगात सगळ्यात सोपे काही असेल तर क्रिकेट असे वाटायला लावणारा! तसे त्याचे सगळेच फटके एक से बढकर एक असतात. पण हा म्हणजे अगदी Glorioous आहे, कलाकृती!! :) असे आणखीही बरेच आहेत.. पण आता तुमचे असे काही खास आवडीचे असेल तर वाचावे म्हणतो आधी!! तर, लिहिताय ना? लिहाच! :) मुमुक्षु

वाचने 7061 वाचनखूण प्रतिक्रिया 16

मदनबाण Fri, 01/09/2009 - 13:42
दिल चाहता है हा माझा खूप आवडता चित्रपट. भावून जातो. माझ या चित्रपटामधील सर्वात आवडत गाण... http://in.youtube.com/watch?v=-iGIjDiePKI मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

सोनम Fri, 01/09/2009 - 19:03
तसे बरेच खेळाडू हा फटका सुंदर मारतात. पण सचिन मारतांना सुंदर दिसतो सुद्धा!! काय सही बोलला मुमुक्षु. आम्हाला ही सचिन चे खेळणे पाहायला आवडते.

In reply to by सोनम

भिडू Sat, 01/10/2009 - 16:01
काहि दिवसांपुर्वी बुलेट मोटारसायकल ची एड बघितलेलि आठवते. त्यात सचिन चा कवर ड्राईव दाखवला होता(Bullet Shot).त्यात सचिन shot मारतो आणी फिल्डर ला काहि कळायच्या आत बॉल Boundry ला गेलेला असतो आणि खाली caption येते Everybody makes way for Bullet (सचिन चा बिग फॅन)-भिडू

अनिल हटेला Fri, 01/09/2009 - 15:31
मनापासुन लिहीलं तर छानसा लेख तयार होइल... १)दिल चाहता है ..आणी सचिन अर्थातच सहमत आहे... २) रेहेना है तेरे दिल मे आमच्या आवडत्या चित्रपटापैकी एक .आणी त्यातील एक प्रसंग म्हणाजे आमचा जीव की प्राण... http://www.youtube.com/watch?v=vzxYBzlbuzg पावसाच्या तालावर नाचणार्‍या ४-५ लहानग्या सोबत हिरॉईनची वींट्री ,पार्श्वसंगीत अतीशय सुंदर आणी सुमधुर ,शिवाय ~~~~~~~~~~~~~ एकदा बघाच म्हणजे समजेन.......... (हटेला मॅडी) ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दिपक Fri, 01/09/2009 - 16:01
सचिनचा स्टेट ड्राईव्ह जास्त आवडतो आणि रीव्हस स्विप सचिनचा हा फटका बघा .... का नाही जीव ओवाळुन टाकावा ? पॉन्टींग , द्रविडचा कव्हर ड्राईव्ह .. --दिपक

लिखाळ Fri, 01/09/2009 - 20:02
मला गाण्यातले काही कळत नाही. पण ऐकायला आवडते. एका सवाईच्या कार्यक्रमात गणपती भट यांनी गाईलेली 'देखो सखी बरसन को आये बदरा' ही चीज (या चीजच म्हणत असावेत.) मला एकदम विलक्षण आवडली. गणपती भट हे गायक सुद्धा त्या आधी माहित नव्हते. त्याचे ध्वनीमुद्रण नंतर कधी मिळाले ते अनेकदा ऐकत असे. आता ते ध्व.मु. हाताशी नाही. पुन्हा ऐकले असते आठवण झाली म्हणून. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

In reply to by लिखाळ

राघव Sat, 01/10/2009 - 20:28
तुम्हाला मिळाले तर मलाही जरूर द्याल..मी नाही ऐकलेले हे आधी कधी :( मुमुक्षु

विसोबा खेचर Sat, 01/10/2009 - 00:09
पण आता तुमचे असे काही खास आवडीचे असेल तर वाचावे म्हणतो आधी!! माझे खास आवडीचे - संगीत, खाणे-पिणे, आणि मादक, मनमोहक स्त्रिया! :) तात्या.

रेवा Sat, 01/10/2009 - 00:27
" विजेता" सिनेमा तील, आशा भोसले नी गाईलेल अप्रतिम गाण : " मन आनन्द आनन्द छायो" मला अतिशय प्रिय आहे. www.dhingana.com वर ऐकू शकता. download करण्यासाठी कुणी link देउ शकेल का?

In reply to by रेवा

रेवाताई, हा घ्या 'मन आनंद...'तूनळी' दृक्-श्राव्य दुवा. http://www.youtube.com/watch?v=MGkb-1Rv7Ng अजून एक... जर का तुम्ही 'रियलप्लेयर'ची नविनतम फुकट आवृत्ति डाऊनलोड करून इन्स्टॉल केली तर तूनळीच काय बरेच व्हिडिओ डाऊनलोड करता येईल. बोनसः http://www.youtube.com/watch?v=hIQP-fjkokc बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

रेवा Sun, 01/11/2009 - 12:41
धन्यवाद बिपिन! पण मला फक्त श्राव्य दुवा हवा आहे कारणः १. मला ते मोबाइल वर डाउनलोड करायचे आहे २. यात सत्यशिल देशपांडें च्या आवाजातील कडवे नाही जे इथे आहे. http://www.dhingana.com/play/hindi-old-movie-vijeta/NTk1Nzk=/pop/1

शशिधर केळकर Sat, 01/10/2009 - 04:06
होय, मलाही आठवते ती रेडिओ संगीत सम्मेलनामधे पं. भीमसेन जोशीनी गायलेली ठुमरी खमाज! नाही बने गिरिधारी! माझ्या एका मुंबई दिल्ली राजधानीने केलेल्या प्रवासात एका वॉकमन वरून केवळ हीच एक मैफिल मी ऐकत गेलो होतो. मी ही मैफिल जन्मात विसरणार नाही!

In reply to by शशिधर केळकर

विनायक पाचलग Sat, 01/10/2009 - 16:11
अर्थातच गाणे पण मराठी सलील संदीप आणि अजय अतुल हे आम्हास देवासमान आहेत बाकी शास्त्रेय कडे वळलेलो नाही बघु काय होते ते आणि सचीन म्हणाल तर जो शाळेच्या क्रिकेट संघाचा॑ भरवश्याचा ऑफ स्पिनर होता त्याला सचीन आवडणार नाही असे होइल काय कधी विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

In reply to by शशिधर केळकर

राघव Sat, 01/10/2009 - 20:26
मला गाण्यातले काही कळत नाही. लिखाळरावांसारखेच ऐकायला आवडते. तुम्ही सांगितलेले अण्णांचे गीत(!) मी आधी ऐकलेले आहे. खरेच भारी. काहीही न कळणार्‍या माझी जर अशी अवस्था होत असेल तर ज्यांना कळते त्यांचे काय होत असेल! मुमुक्षु

राघव Sat, 01/10/2009 - 20:14
चांगलंय.. पण जर थोडे विस्तृत लिहिलेत तर आणखी छान होईल.. जसे कलाकृती/प्रसंग.. अन् तो आवडण्याचे, लक्षात राहण्याचे काही एक खास कारण! या पद्धतीने थोडे विस्तृत पणे समजेल :) माझे खास आवडीचे अणखी एक - श्री मिलिंद मुळीक यांचे आपण फॅन! त्यांचे वॉटर कलर्स मधली पेंटीग्स जीवघेणी असतात.. त्यातही खास पावसाळ्याची/नुकताच पाऊस पडून गेलेल्या दृष्याची त्यांची पेंटीग्स म्हणजे पुन्हा हाSSSSSय! उदा. http://www.milindmulick.com/images/home_05.jpg बोले तो एकदम खल्लास!! काय प्रभुत्व आहे या माणसाचं! कमाल!! असाच आणखी एक चित्रकार माझा फेवरिट! जॉन फर्नांडेझ.. उदा. http://www.graceartbooks.com/images/thegallery_5_big.jpg मुमुक्षु