काल पुन्हा एक न कळणार्या भाषेतला (खरंतर भाषांतला) चित्रपट बघितला आणि पुन्हा एकदा भाषेपलिकडच्या निव्वळ भावनांचा आस्वाद घेता आला. याआधीही अनेकदा झालं आहे आणि याहिवेळी पूर्ण भारावलो आणि घरच्यांना हीच एक कथा दहादा सांगूनहि समाधान झालं नाहि. कोणाला तरी सांगावं असंच वाटत राहिलं म्हणून तडक मिपावर लिहायला बसलो.
तर मी काल बघितला २००२ चा ऑस्कर विजेता चित्रपट "निर्गेन्द्वो इन आफ्रिका". वंश, वर्ण, देश, संस्कृती यांच्या सीमा भेदणारा आणि स्वतःबरोबर प्रेक्षकाच्या मनातील कुंपणांनाहि हलवून सोडणारा हा एक चित्रपट.