मोहक दरबारी
मोकळ्या हवेत, अगदी नीरव शांततेत चांदण्यांनी भरलेले आकाश न्याहाळताना दुरावलेल्या प्रेयसीचा आठव यावा. तिच्या सहवासात घालविलेला क्षणन् क्षण पुढ्यात उभा राहावा, असे दरबारी कानडाचे रुप वाटते.
हा राग मंद्र आणि मध्यम सप्तकात रमणारा असल्याने यात आतर्तबरोबरच गंभीरताही आहे. दरबारी गतकाळातील आठवणीचे प्रकटीकरण करणारा राग आहे, असे म्हणणे कुणालाही गैर वाटू नये.
या रागाचा अस्सल रूप ऐका मृगनयना रसिक मोहिनी...
http://www.esnips.com/doc/146b7493-f0b9-4d57-be06-6cad9fa0ed11/Mrignayana-rasik-mohini
यातील रसिक मोहिनीतील मंद्र सप्तकातील पंचम-मध्यम पुन्हा पंचम आणि धैवतावरून निषादाला स्पर्श करून षड्जावर विसावणारा स्वर मोहून टाकतो.
कामिनी होती किती मंजूळ मधुरा हे ऐकताना मध्यम पंचममध्ये येणारा धैवत पुन्हा मध्यमावरून पंचमावर येतो. मग हा स्वर गंधारावरून मध्यम आणि रिषभावरून षड्जावर येतो त्यावेळी त्या कामिनीची "रेखीव' मूर्ती समोर उभी राहाते.
ही कामिनी नवयौवन संपन्न आहे. गाण्यात पुढे तिचे केलेले वर्णन खूपच सुरेख आहे.
वर्गीकरण
वसंतराव
In reply to वसंतराव by मिसळभोक्ता
+१
In reply to +१ by घाटावरचे भट
+२
In reply to +२ by श्रावण मोडक
म्हणतो,
In reply to म्हणतो, by अन्वय
ओके...
In reply to +२ by श्रावण मोडक
+३
In reply to +३ by बिपिन कार्यकर्ते
+ ४ वसंतखां जियो!!
मन्जुळ
सुरेख
मजा आली
अरे
अन्वयराव,
In reply to अन्वयराव, by विसोबा खेचर
ग्रेट